नाशिक जिल्हा शिक्षाणाच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती साधत आहे. सर्व स्तरांवर शिक्षणाची उपलब्धता वाढली असून गुणवत्तापूर्ण शिक्षण व तांत्रिक शिक्षणावर भर दिला जात आहे. सरकारी योजना व शासकीय तसेच खाजगी संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नातुन शैक्षणिक विकासाची गती वाढली आहे. मुलींच्या शिक्षणाप्रती विशेष लक्ष देवून साक्षरतेचा स्तर अधिकाधिक सुधारला जात आहे. यामुळे नाशिक महाराष्ट्रातील शैक्षणिक दृष्टिकोनातुन उन्नत जिल्हांपैकी एक मानला आहे.
नाशिक जिल्हातील विविध शासकीय व स्वयंप्रेरित योजना विद्यार्थ्यांना शिक्षणात सहकार्य देण्यासाठी राबवल्या जात आहेत. योजना अंतर्गत विद्यार्थी लाभाचा योजना , शालेय पोषण आहार, मोफत शालेय साहित्य, एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती योजना, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रि.मॅट्रीक शिष्यवृत्ती, राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, भारत सरकारची संस्कृत विषयाची योजना, राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान, योजना, सर्वांना मोफत शिक्षण तसेच अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी व विद्यार्थींनीसाठी मराठी भाषा फाऊंडेशन योजना, बेगम हजरत महल शिष्यवृत्ती इत्त्यादी. केंद्र व राज्यशासनाच्या विविध योजना दिल्या जातात. यामुळे शैक्षणिक साक्षरता सूधारत असून , सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकांच्या विद्यार्थ्यांनाही शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होत आहे.

