- वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
जिल्हा परिषद म्हणजे काय?
जिल्हा परिषद ही जिल्हा स्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्था असून ग्रामीण विकासाशी संबंधित विविध शासकीय योजना व सेवा राबवते.
जिल्हा परिषदेची मुख्य कार्ये कोणती?
शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, ग्रामीण विकास, महिला व बालकल्याण, समाजकल्याण इ. सेवा पुरवणे.
जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात?
मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) हे जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख असतात.
जिल्हा परिषद अंतर्गत कोणकोणते विभाग आहेत?
सामान्य प्रशासन, शिक्षण, आरोग्य, बांधकाम, पाणी व स्वच्छता, समाजकल्याण, महिला व बालविकास, पशुसंवर्धन इ.
जिल्हा परिषदेच्या सेवा ऑनलाइन उपलब्ध आहेत का?
होय. विविध अर्ज, तक्रार नोंदणी, योजना माहिती व सूचना अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
आर्थिक माहिती कुठे पाहता येईल?
वेबसाइटवरील Budget / Finance / RTI (Proactive Disclosure) विभागात आर्थिक माहिती उपलब्ध आहे.
कर्मचारी व अधिकारी यांची माहिती कुठे मिळेल?
पदनिहाय अधिकारी/कर्मचारी माहिती संबंधित विभागांच्या स्वतंत्र वेबपेज (URL) वर दिलेली आहे.
RTI अंतर्गत माहिती कशी मिळवता येईल?
RTI अधिनियम 2005 अंतर्गत अर्ज करून किंवा वेबसाइटवरील RTI Section मधील माहिती पाहता येते.
तक्रार कशी नोंदवावी?
ऑनलाइन तक्रार प्रणाली, लोकशाही दिन किंवा संबंधित विभागाशी संपर्क साधून.
महत्त्वाच्या सूचना व परिपत्रके कुठे मिळतात?
वेबसाइटवरील Notice / Circular / Downloads विभागात.