महाराष्ट्र शासनाच्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या उपक्रमाच्या माध्यमातून शाश्वत विकास ध्येये २०३० च्या दिशेने ग्रामीण विकासाचा नाव अध्याय सुरू हॉट आहे. हे अभियान पारदर्शक व तत्पर प्रशासन, सामाजिक न्याय, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, शेती, पर्यावरण संवर्धन, महिला व बालकल्याण, उपजीविका विकास आणी लोकसहभाग यांसारख्या ग्रामीण विकासाच्या प्रत्येक क्षेत्राला स्पर्श करणारे आहे.
या अभियानाचा मुख्य गाभा “सर्वाना सोबत घेऊन चला” असा आहे. शासन निर्णयानुसार हे अभियान १७ सप्टेंबेर तो ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत संपूर्ण राज्यात राबविले जाणार असून, शासनाने ठरविलेल्या ०७ प्रमुख घटक- १. सुशासनयुक्त पंचायत, २. सक्षम पंचायत, ३. जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गांव, ४. मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, ५. गांव पातळीवरील संस्था सशक्तीकरण, ६. उपजीविका विकास व समाजिकय न्याय, ७. लोकसहभाग व लोकचळवळ ह्या घटकांवर ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांचे कार्यप्रदर्शन तपासले जाईल.
या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्यात सकारात्मक स्पर्धा घडवून आणणे, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थाना तालुका, जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर पुरस्कार देणे, शासनाच्या विविध योजनांचे प्रभावी अभिसरण करून शेवटच्या घटकांपर्यंत सेवा पोहोचविणे, सहसा-प्रशासन, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांच्यात भागीदारी भवन निर्माण करणे ही उद्दिष्टे आहेत.
या अभियानामुळे नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक गावात सर्वांगीण विकास सध्या होईल. “एकही गांव मागे राहणार नाही” ही भूमिका यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचयाती तसेच स्थानिक संस्था व नागरिक यांचे सक्रिय सहकार्य आवश्यक आहे.

