बंद

    नाशिक जिल्हा परिषद व जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग आयडी कार्ड मोहीम शुभारंभ.

    • प्रारंभ तारीख : 20/11/2025
    • शेवट तारीख : 31/12/2025
    • ठिकाण : जिल्हा परिषद नाशिक व अंतर्गत तालुके.

    ⭐️ स्वावलंबी नाशिक मोहीम ⭐️
    🔴 स्वावलंबी नाशिक मोहीम-प्रत्येक दिव्यांगाच्या हातात UDID कार्ड 🔴

    ⭐️ मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून विशेष मोहिमेला प्रारंभ ⭐️

    दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांचे सक्षमीकरण करणे आणि शासनाच्या सर्व योजनांचा प्रत्यक्ष लाभ वेळेत मिळवून देणे हे नाशिक जिल्हा परिषदेचे प्राधान्य असून, याच उद्देशाने “स्वावलंबी नाशिक” ही व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार २१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबन प्रणालीद्वारे दिव्यांगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र मिळणे बंधनकारक आहे. परंतु वेळेत प्रमाणपत्र न मिळाल्याने अनेक दिव्यांगांना शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित रहावे लागते. या समस्येची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला वेगाने, सुलभपणे व त्यांच्या तालुक्याच्या पातळीवरच दिव्यांगत्व प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याच्या हेतूने “प्रत्येक दिव्यांगाच्या हातात UDID कार्ड” ही विशेष मोहीम आकारास आली आहे.

    या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींची तपासणी, निदान आणि दिव्यांगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी जिल्हा परिषद नाशिक, जिल्हा सामान्य रुग्णालय नाशिक व दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकानिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. RBSK टीममधील तज्ञ डॉक्टर्समार्फत तपासणी करण्यात येऊन केंद्र शासनाच्या स्वावलंबन प्रणालीवर अर्ज करण्यात येणार आहे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली जात आहे.

    या उपक्रमाचा शुभारंभ दि. २० नोव्हेंबर २०२५ रोजी दिंडोरी तालुक्यात जिल्हा परिषद शाळा दिंडोरी येथे झाला. पुढील काही दिवसांत सर्व तालुक्यांमध्ये ही शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. प्रत्येक शिबिरात प्राथमिक तपासणी, तज्ज्ञांचे प्रत्यक्ष परीक्षण, ऑनलाईन नोंदणी व UDID कार्ड प्रक्रियेचा समावेश असणार आहे.

     

    कॅम्पच्या दिवशी लाभार्थ्याकडे खालील कागदपत्रे व बाबी अनिवार्यपणे उपलब्ध असाव्यात, जेणेकरून प्राथमिक तपासणीनंतर पात्र लाभार्थ्यांचे नोंदणी प्रक्रियेचे तात्काळ पूर्णत्व साधता येईल:
    1.आधार-लिंक मोबाईल क्रमांक (OTP मिळण्यासाठी सक्रिय)
    2.राशनकार्डची मूळ प्रत
    3.आधारकार्डची मूळ प्रत
    4.पासपोर्ट साईज फोटो

    व्हिडिओ

    छायाचित्र उपलब्ध नाही