बंद

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

    • प्रारंभ तारीख : 17/09/2025
    • शेवट तारीख : 31/12/2025
    • ठिकाण : Zilla Parishad Nahik
    महाराष्ट्र शासनाच्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या उपक्रमाच्या माध्यमातून शाश्वत विकास ध्येये २०३० च्या दिशेने ग्रामीण विकासाचा नाव अध्याय सुरू हॉट आहे. हे अभियान पारदर्शक व तत्पर प्रशासन, सामाजिक न्याय, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, शेती, पर्यावरण संवर्धन, महिला व बालकल्याण, उपजीविका विकास आणी लोकसहभाग यांसारख्या ग्रामीण विकासाच्या प्रत्येक क्षेत्राला स्पर्श करणारे आहे.
    या अभियानाचा मुख्य गाभा “सर्वाना सोबत घेऊन चला” असा आहे. शासन निर्णयानुसार हे अभियान १७ सप्टेंबेर तो ३१ डिसेंबर २०२५  या कालावधीत संपूर्ण राज्यात राबविले जाणार असून, शासनाने ठरविलेल्या ०७ प्रमुख घटक- १. सुशासनयुक्त पंचायत, २. सक्षम पंचायत, ३. जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गांव, ४. मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, ५. गांव पातळीवरील संस्था सशक्तीकरण, ६. उपजीविका विकास व समाजिकय न्याय, ७. लोकसहभाग व लोकचळवळ ह्या घटकांवर ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांचे कार्यप्रदर्शन तपासले जाईल.
    या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्यात सकारात्मक स्पर्धा घडवून आणणे, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थाना तालुका, जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर पुरस्कार देणे, शासनाच्या विविध योजनांचे प्रभावी अभिसरण करून शेवटच्या घटकांपर्यंत सेवा पोहोचविणे, सहसा-प्रशासन, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांच्यात भागीदारी भवन निर्माण करणे ही उद्दिष्टे आहेत.
    या अभियानामुळे नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक गावात सर्वांगीण विकास सध्या होईल. “एकही गांव मागे राहणार नाही” ही भूमिका यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचयाती तसेच स्थानिक संस्था व नागरिक यांचे सक्रिय सहकार्य आवश्यक आहे.
    1. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांची मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत पंचायत समिती बागलाण येथे भेट. दि. २६-११-२०२५
    2. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांची बागलाण तालुक्यास भेट. सोमपूर ग्रामपंचायतीतील ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले’ अभ्यासिकेचे उद्घाटन. दि.28-11-2025
    3. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ओमकार पवार यांचा पंचायत समिती देवळा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत दौरा. दि. २६-११-२०२५
    4. ग्रामपंचायत भेंडी तालुका कळवण जिल्हा नाशिक मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अनुषंगाने 350 ग्रामस्थांचा अभियानात सहभाग_२६-११-२०२५
    5. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अनुषंगाने सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी गट विकास अधिकारी रविकांत सानप यांचा दौरा.दि. २६-११-२०२५
    6. ग्रामविकास विभागाचे मा.प्रधान सचिव यांची प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांची पाहणी.
    7. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार कळवण येथे आढावा बैठक.
    8. मा.श्री.महेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) जिल्हा परिषद नाशिक यांची पंचायत समिती त्र्यंबकेश्वर येथे भेट. २५-११-२०२५
    • ग्रामपंचायत विल्होळी ता. जि. नाशिक
      आज दिनांक १३/ ११/२०२५ गुरुवार रोजी सायंकाळी ८:०० वा.नाशिक तालुक्याच्या कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी मा.डॉ. सोनिया नाकाडे मॅडम, स.गटविकास अधिकारी श्री. सूर्यवंशी साहेब, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) श्री. सोनवणे साहेब यांनी ग्रामपंचायत विल्होळी येथे भेट देऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत चालू असलेल्या कामकाजाबाबत व करावयाच्या कामाबाबत मार्गदर्शन व सूचना केल्या तसेच केलेल्या कामकाजाबद्दल माहिती घेतली व काही उपक्रमाची पाहणी केली ग्रामपंचायतने काल मा. गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत खालील उपक्रम पूर्ण केले. (अधिक वाचा)
    • मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सभेसाठी मा गटविकास अधिकारी सोनावणे मॅडम तसेच विस्तार अधिकारी सोनावणे साहेब यांनी ग्रामपंचायत जुनिबेज येथे मुक्कामी येऊन सभा घेतली व मार्गदर्शन केले.(अधिक वाचा)

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान पुस्तिका

    अभियान अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची ध्वनीचित्रफीत

    1. दुगावंची अनेमिया मुक्त गावाकडे वाटचाल.
    2. मुख्यमंत्री पंचायतराज नाशिकची घोडदौड.
    3. ग्रामपंचायत गारमाल येथे स्वच्छता अभियान_20-11-2025
    4. ग्रामपंचायत लहवीत येथे वनराई बंधारा व दिव्यांग्याना udid कार्ड काढणे बाबत मार्गदर्शन_20-11-2025.
    5. वनोलीत वाचनालयाचे आयपीएस सागर भामरे यांच्या हस्ते उद्घाटन.
    6. जिल्हा परिषद पालखेड बंधारा तालुका दिंडोरी शाळेसाठी HAL कडून सीएसआर च्या माध्यमातून तीन कोटी रुपये निधी_२५-११-२०२५.
    7. हरसुल ग्रामपंचायतीने श्रमदानातून बांधला वनराई बंधारा!
    8. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान-लोकवर्गणीला सरसावले गांवकरी_२६-११-२०२५
    9. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान_श्रमदानातून जलसंधारण कामांना गती.
    10. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान-दिव्यांगांचा निधी घरी जाऊन वाटप_२३-११-२०२५
    11. थकीत करावर ५० टक्के सवलत!
    12. एकलहरेत स्मशानभूमी व धार्मिक स्थळांची स्वच्छता.
    13. आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर.
    पहा(3 MB)