जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक)
जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक) हा विभाग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्थापनासाठी कार्यरत आहे. या विभागामार्फत शासनाच्या शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी, गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थी-केंद्रित उपक्रम तसेच शाळांच्या शैक्षणिक व प्रशासकीय बाबींचे नियोजन व देखरेख केली जाते.
मुख्य कार्ये :
जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळांचे प्रशासन.
शिक्षकांची नेमणूक, बदली व सेवा विषयक कार्यवाही.
शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी (नवोदय योजना, ई-लर्निंग, डिजिटल स्कूल इत्यादी).
सर्वसामान्य वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाशी जोडून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न.
शाळांमध्ये भौतिक सुविधा, पाठ्यपुस्तके, शालेय पोषण आहार व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे.
शिक्षणात गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रशिक्षण, कार्यशाळा व नवोपक्रम राबविणे.
उद्दिष्टे :
“प्रत्येक बालकाला दर्जेदार प्राथमिक शिक्षण” हा हेतू साध्य करणे.
शिक्षणाद्वारे सामाजिक, सांस्कृतिक व बौद्धिक विकासाला चालना देणे.