बंद

    पाणी व स्वच्छता विभाग

    • Capture
      श्री. दीपक शामराव पाटील

      प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन

      (संपर्क क्र. ८३२९०१७२६२)

    •                            विभागाविषयी थोडक्यात 

      स्वच्छ भारत अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यात राबवलेले विविध स्वच्छता उपक्रम

      स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नाशिक जिल्ह्यात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी खालील उपक्रम राबविण्यात आले. शाश्वत स्वच्छ गाव ठेवणे, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, शौचालय वापर, प्लास्टिक व्यवस्थापन, तसेच वैयक्तिक स्वच्छता यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

      . स्वच्छता ही सेवा उपक्रम

      • १ ऑगस्ट २०२४ ते २ ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत जिल्हयात स्वच्छतेविषयी जनजागृती वाढवण्यासाठी स्वच्छता ही सेवा मोहिम राबविण्यात आली.
      • संपूर्ण जिल्ह्यात श्रमदान, स्वच्छता मोहिमा आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
      • या मोहिमेंतर्गत गृहभेट उपक्रम, खाऊ गल्लींमध्ये स्वच्छतेविषयक जनजागृती, पथनाटय कार्यक्रम, स्वच्छता प्रतिज्ञा, रॅली, सवच्छ भारत अभियानाच्या उपांगांची दुरुस्ती, स्वच्छता ज्योत, टाकाऊ पासून टिकाऊ उपक्रम, एक झाड आईच्या नावे उपक्रम, चित्रकला व रांगोळी स्पर्धा आदि उपक्रम राबविण्यात आले.
      • यावर्षी शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीमधील २ अस्वच्छ ठिकाणे निवडून त्यांची कायमस्वरुपी स्वच्छता करण्याचे निर्देश दिले होते.
      • त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमधील २ ठिकाणांची निवड करुन शासनाच्या पोर्टलवर त्यांचे इव्हेंट क्रियेट करण्यात आले.
      • २ ऑक्टोंबर रोजी स्वच्छ भारत साजरा करण्यात येऊन या सर्व ठिकाणांची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली.
      • गावोगावी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी सहभाग घेतला.
      • दैनंदिन स्वरुपात स्वच्छतेविषयक जनजागृती करण्यात आली.

      . मंदिर स्वच्छता मोहीम

      • जिल्हयात १७-१-२०२४ ते १९-१-२०२४ या कालावधीत मंदिर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
      • जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात राबविण्यात आलेल्या या अभियानात मंदिराची साफसफाई करणे, मंदिर परिसराची स्वच्छता करणे, प्रमुख मंदिरामध्ये रोषणाई करणे यासारखे उपक्रम राबविण्यात आले. जिल्हयातील ग्रामीण भागातील सर्व गावांमध्ये सदरचे अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले.
      • जिल्हयातील ग्रामीण भागातील सर्व मंदिरांची स्वच्छता करण्यासाठी जिल्हयात मंदिर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
      • धार्मिक स्थळे व मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
      • या मोहिमेत जिल्हयातील सर्व ग्रामंपंचायतींनी सहभागी होऊन मंदिरांची स्वच्छता केली.
      • या मोहिमेला जिल्हयात चांगला प्रतिसाद मिळाला.
      • मंदिराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ व प्लास्टिकमुक्त करण्यात आला.
      • मंदिरांना रंगरंगोटी व विद्यूत रोषणाई करण्यात आली.
      • यामध्ये १७ व १८ जानेवारी २०२४ या कालावधीत जिल्हयातील प्रत्येक गावातील मंदिराची ग्रामस्थ, वारकरी मंडळ, भजरी मंडळ, मंदिर व्यवस्थापन समिती यांच्या सहभागातून स्वच्छता करण्यात आली.

      जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेले उपक्रम

      • शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जल जीवन मिशन योजनेबाबत प्रचार प्रसिध्दी व्हावी या साठी निंबध,चित्रकला आणि वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
      • जल रथ उपक्रम : पाण्याची बचत करणेबाबत जल रथ संपुर्ण जिल्हयात पाणी बचत,पाण्याचे जतन,जल पुर्नभरण याबाबतचे संदेश असणारी माहिती देण्यात आली
      • डीजीटल वॉल उपक्रम : पाणी बचत जल जीवन मिशन योजना व स्वच्छ भारत प्रचार प्रसिध्दी साठी संपुर्ण जिल्हयात डीजीटल वॉल पेंटीगव्दारे उपक्रम राबविण्यात आले.
      • जल जीवन मिशन कार्यशाळा गुरुदक्षिणा हॉल येथे आयोजित करण्यात आली
      • विविध पुरस्कारर्थींना पारितोषिक प्रदान करण्यात आली
      • माझी वसुंधरा कार्यशाळा गुरुदक्षिणा हॉल येथे आयोजित करण्यात येऊन माझी वसुंधरा बाबत जल,वायु,अग्नि,आकाश,पृथ्वी या घटकांबाबत उपक्रमांची माहिती मा.विभागीय आयुक्त यांचे कार्यालयामार्फत देण्यात आली.
      • विधी न्याय प्राधिकरण यांच्या वतीने आयोजित शिबीरामध्ये पाणी गुणवत्ता संनियत्रण आणि जल जीवन मिशन योजना याबाबत स्टॉल लाऊन प्रचार प्रसिध्दी करण्यात आली.
      • पाणी गुणवत्ता व ग्रामपाणीपुरवठा व स्वच्छता समिती या बाबत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
      • संत गाडगेबाबत ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करुन सन 20-21,21-22,22-23,23-24 चे पुरस्कार वितरीत करण्यात आले.
      • जागतिक जल दिन तसेच जागतिक शौचालय दिन साजरा करण्यात आले.
      • सेवा देणारे ॲप – जिल्हयातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणी निष्कर्ष बघण्यासाठी             

         सिटीझन कॉर्नर लिंक- https://ejalshakti.gov.in/JJM/citizen_corner/villageinformation.aspx

                                           विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना

    • जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन हा जिल्हा परिषदेमध्ये प्रकल्प संचालक तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता विभाग) हे या विभागाचे प्रमुख आहेत. वैयक्तिक शौचालय बांधकाम, सार्वजनिक शौचालय बांधकाम, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, गोबरधन, मैलागाळ व्यवस्थापन, प्लॉस्टिक वेस्ट मॅनेजमेंट व स्वच्छतेविषयक विविध विषयावर प्रशिक्षण व जनजागृती उपक्रम या विभागामार्फत राबविले जातात.

    उद्यिष्टे

    जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन या विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व जल जीवन मिशन या केंद्र शासनाच्या महत्वाच्या योजना गावपातळीवर राबविल्या जातात.

    स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या केंद्र पुरस्कृत योजनेतून पात्र लाभार्थ्यांना रुपये 12,000/- वैयक्तिक शौचालय प्रोत्साहन अनुदान या विभागामार्फत देण्यात येते. तसेच, सार्वजनिक शौचालय बांधकाम व घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प गावपातळीवर राबविले जातात.

    जल जीवन मिशन या केंद्र पुरस्कृत योजनेतून वैयक्तिक नळजोडणी नसलेल्या कुटूंबाला वैयक्तिक नळजोडणी देण्यात येते.

    जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन या विभागामार्फत स्वच्छतेविषयक विविध विषयांची प्रशिक्षणे व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात.

    वैयक्तिक शौचालय योजना-

    ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना ₹12,000 अनुदान उपलब्ध करुन दिले जाते.

    लाभार्थी गट: SC, ST, BPL, APL, भूमिहीन, अपंग, महिला प्रमुख कुटुंबे, लघु व अत्यल्प भूधारक

    अर्ज करण्याची प्रक्रिया ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा sbm.gov.in या संकेतस्थळाद्वारे करता येते.

    आवश्यक कागदपत्रे:

    बांधकाम पूर्ण झाल्याचा दाखला व फोटो.

    SBM पोर्टलवर नाव नोंदणी.

    ग्रामपंचायतचा ठराव, आधार कार्ड, बँक पासबुक.

    सार्वजनिक शौचालय योजना-

    बसस्थानक, बाजारपेठ, देवस्थान आदी ठिकाणी सार्वजनिक शौचालय उभारणीसाठी निधी.

    ₹3,00,000 पर्यंत खर्च: यामध्ये ₹2,10,000 SBM (ग्रामीण), ₹90,000 15व्या वित्त आयोगातून.

    ग्रामपंचायतीने प्रस्ताव सादर करणे आवश्यक.

    घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन (ODF+)-

    गावात ODF Plus स्थिती मिळवण्यासाठी शोषखड्डे, खतखड्डे, ड्रेनेज व्यवस्था, कचरा संकलन.

    निधी वितरण: 70% SBM अंतर्गत आणि 30% 15व्या वित्त आयोगातून.

    गावातील लोकसंख्या व कुटुंबसंख्येनुसार आराखडे तयार करणे आवश्यक.

    प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन केंद्र-

    जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत ग्रामीण भागातील प्लॅस्टिक कचऱ्याचे शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन केंद्र कार्यरत आहे. या केंद्रांवर आसपासच्या गावांमधील ग्रामपंचायतींकडून संकलित प्लॅस्टिक कचरा नियमितपणे आणला जातो.

    उद्दिष्टे:-

    ग्रामीण भागातील प्लॅस्टिक कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण व पुनर्वापर

    पर्यावरण संवर्धनास हातभार

    स्वच्छता व प्लॅस्टिकमुक्त गाव निर्मिती

    मुख्य कार्यप्रणाली:-

    ग्रामपंचायत स्तरावर प्लॅस्टिक कचरा गोळा करणे

    केंद्रावर प्लॅस्टिक कचऱ्याचे वर्गीकरण व प्रक्रियाकरण

    पुनर्वापरयोग्य प्लॅस्टिक याचे संबंधित उद्योगांना पुरवठा

    अपुनर्वापरयोग्य प्लॅस्टिकचा सुरक्षित निपटारा

    फायदे:-

    स्वच्छ व आरोग्यदायी गाव

    पर्यावरण संरक्षण

    स्थानिकांना रोजगाराच्या संधी

     “माझी  वसुंधरा अभियान”

                    महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय विभाग यांच्या वतीने माझी वसुंधरा अभियान हे २ ऑक्टोबर २०२०  जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागात राबवले जाते. या मध्ये पर्यावरणपूरक आणि स्वच्छ सुंदर  गावे निर्माण करणे हा प्रमुख उद्देश आहे . पृथ्वी ,अग्नि ,जल ,वायु ,आकाश ही  ५  तत्वे मानवाशी निगडीत आहे याच  तत्वावर आधारीत या मध्ये कामे केली जातात . पृथ्वी या तत्वात आपण वृक्ष लागवड ,अग्नि तत्वात सौर उर्जेचा वापर ,जल तत्वात जल स्त्रोत बळकट करणे ,वायु तत्वात हवेचे प्रदूषण कमी करणे ,आणि आकाश तत्वात ई प्लेज घेणे व पर्यावरण जनजागृती ई . च्या अनुषंगाने पूरक कामे केली जातात . अभियांनाचा कालावधी हा दरवर्षी ५ जून पासून सुरू होतो. काही तांत्रिक अडचण असल्यास अभियान कालावधी ची तारीख घोषित केली जाते.

                     पृथ्वी ,अग्नि ,जल ,वायु ,आकाश  या ५ ही तत्वात उत्कृष्ट काम करण्याऱ्या ग्राम पंचायंतीना रोख बक्षीसे  दिली जातात. या अभियानात एकूण १३८०० गुण हे पाच तत्वासाठी ठरवण्यात आले असून विविध निकषानुसार पूर्तता केल्यास  गुणांकण देण्यात येते . तसेच MIS प्रक्रिया काल मर्यादेत पूर्ण  केल्यास २०० अतिरिक्त गुण ग्राम पंचायातीस दिले जातात.   सदर प्रक्रिया ऑन लाइन MIS द्वारे पार पाडली जाते तसेच समितीद्वारे  प्रत्यक्ष भेट देऊन झालेल्या कामाचे मूल्यांकन केले जाते . दिनांक ५ जून या जागतिक पर्यावरण दिनी या अभियानाचे निकाल  घोषित केले जातात.मा. मुख्यमंत्री व इतर मंत्री महोदय यांच्या उपस्तीथी मध्ये या अभियानाचे  पुरस्कार प्रदान करण्यात येतात.  नाशिक जिल्हा परिषदेने या अभियानात उत्कृष्ट कामगिरी केलेली असून राज्य आणि विभागस्तरावर अनेक  पारितोषिक मिळवलेले आहेत. तसेच नाशिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याने राज्यस्तरावर गौरविण्यात आले आहे.

    “संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान”

                    संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान हे महाराष्ट्र सरकारने ग्रामीण भागातील स्वच्छता सुधारण्यासाठी सुरू केलेले एक महत्त्वाकांक्षी अभियान आहे. या अभियानाची प्रेरणा संत गाडगेबाबा यांच्याकडून घेतली आहे, जे स्वच्छता, समाजसुधारणा आणि पर्यावरण रक्षणाचे महान प्रतीक मानले जातात.

    संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान हा ग्रामीण भागातील स्वच्छता सुधारण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. यामुळे गावातील आरोग्य, स्वच्छता, आणि पर्यावरण सुधारणा झाली असून, लोकांमध्ये स्वच्छतेबद्दलची जबाबदारी निर्माण झाली आहे. संत गाडगेबाबांच्या शिकवणींना अनुसरून हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासात मोठे योगदान देत आहे.

    1. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान परिचय:-

    घरांची, गावांची व परिसराची स्वच्छता व्हावी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे आरोग्यमान व पर्यायाने जीवनमान उंचवावे या उद्देशाने ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमांतर्गत जे कार्यक्रम आखण्यात येतात त्या कार्यक्रमांची परिणामकारक अंमलबजावणी करून गावातील स्वच्छतेची परिस्थिती सुधारण्यासाठी ग्रामस्थांचा उत्स्फुर्त सहभाग व सहकार्य घेवुन ग्रामिण स्वच्छतेमध्ये सातत्य राखणे.

    1. अभियानांत सहभाग निवड प्रक्रिया:-

    ग्रामपंचायतींनी परिशिष्ट 1 नुसार आवेदन व माहिती आणि परिशिष्ट-2 नुसार स्वयं मुल्यांकन करुन संबंधित गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे सादर करणे.

    परिशिष्ट-2 मधील निकषानुसार प्रत्येक जिल्हा परिषद गटातील सर्व ग्रामपंचायतींची तपासणी होवुन गुणांकन होते. जिल्हा परिषद गटस्तरीय अंतिम तपासणी परिशिष्ट-1 मधील माहिती व परिशिष्ट-2 मधील निकषानुसार होवुन त्याचे गुणंकन केले जाते. यामध्ये संबंधित प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये सर्वात जास्त गुण प्राप्त करणाऱ्या पहिल्या दोन ग्रामपंचायतींची निवड होते. जिल्हास्तरीय अंतिम स्पर्धा यामध्ये जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटातील सर्वात जास्त गुण प्राप्त करणाऱ्या फक्त 1 ते 9 ग्रामपंचायतींची निवड केली जाते. परिशिष्ट-1 मधील माहिती व परिशिष्ट-2 मधील निकषानुसार तपासणी होते व गुणंकण केले जाते. या गुणांकणानुसार जिल्हा स्तरावर प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक दिले जातात. तसेच 3 ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कार दिले जातात. जिल्हा स्तरावरील प्रथम व व्दितीय क्रमांक प्राप्त ग्रामपंचायती विभास्तरीय स्पर्धेसाठी पात्र होतात.

    1. 60 हजारापासुन 50 लाखापर्यंत बक्षिसे
    .क्र. पुरस्कार स्तर पुरस्कार रक्कम
    प्रथम द्वितीय तृतीय
    1 जिल्हा परिषद गट रु.60 हजार —- —–
    2 जिल्हा स्तर रु.6 लक्ष रु.4 लक्ष रु.3 लक्ष
    3 विभाग स्तर रु.12 लक्ष रु.9 लक्ष रु.7 लक्ष
    4 राज्य स्तर रु.50 लक्ष रु.35 लक्ष रु.30 लक्ष
    1. असे असतील विशेष पुरस्कार
    .क्र. पुरस्काराचे नाव ‍निवडीचे निकष बक्षिस रक्कम
    1 स्व. वसंतराव नाईक पुरस्कार- घनकचरा, सांडपाणी व मैला गाळ व्यवस्थापन शासन निर्णयातील परिशिष्ट-2 मधील अ.क्र.3,4 व 5 मधील एकूण 56 गुणांपैकी जास्त गुण प्राप्त करणारी ग्रामपंचायत जिल्हा स्तर रु. 50,000/-
    विभाग स्तर रु. 75,000/-
    राज्य स्तर रु. 3,00,000/-
    2 डॉ. बाबसाहेब आंबेडकर पुरस्कार- पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन शासन निर्णयातील परिशिष्ट-2 मधील अ.क्र.1 मधील एकूण 34 गुणांपैकी जास्त गुण प्राप्त करणारी ग्रामपंचायत जिल्हा स्तर रु. 50,000/-
    विभाग स्तर रु. 75,000/-
    राज्य स्तर रु. 3,00,000/-
    3 स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार- शौचालय व्यवस्थापन शासन निर्णयातील परिशिष्ट-2 मधील अ.क्र. 2 मधील एकूण 67 गुणांपैकी जास्त गुण प्राप्त करणारी ग्रामपंचायत जिल्हा स्तर रु. 50,000/-
    विभाग स्तर रु. 75,000/-
    राज्य स्तर रु. 3,00,000/-

    सहभागी होण्यासाठी ग्रामपंचायतींनी काय करावे.

    स्वच्छतेच्या बाबी वैयक्तीक स्वच्छता, शौचालय बांधकाम व वापर, घनकचरा विलगीकरण व व्यवस्थापन, सांडपाणी  व्यवस्थापन  मासिक पाळी कचरा व्यवस्थापन,मैलागाळ व्यवस्थापन प्लास्टीक कचरा व्यवस्थापन,पाणी पुरवठा व परीसर स्वच्छता ‌या बाबी कृती कार्यक्रमामध्ये समाविष्ट कराव्यात.

    कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने सार्वजनिक व वैयक्तीक ठिकाणांची स्वच्छता, शासकीय मालमत्तांच्या करावयाच्या दुरुस्त्या व कृती पुर्तता व झालेलया कामांची SBM- MIS वर नोदी कराव्यात.

     “स्वच्छ भारत अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यात राबवलेले विविध स्वच्छता उपक्रम”

    स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नाशिक जिल्ह्यात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी खालील उपक्रम राबविण्यात आले. शाश्वत स्वच्छ गाव ठेवणे, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, शौचालय वापर, प्लास्टिक व्यवस्थापन, तसेच वैयक्तिक स्वच्छता यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

    . स्वच्छता ही सेवा”

    • १ ऑगस्ट २०२४ ते २ ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत जिल्हयात स्वच्छतेविषयी जनजागृती वाढवण्यासाठी स्वच्छता ही सेवा मोहिम राबविण्यात आली.
    • संपूर्ण जिल्ह्यात श्रमदान, स्वच्छता मोहिमा आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
    • या मोहिमेंतर्गत गृहभेट उपक्रम, खाऊ गल्लींमध्ये स्वच्छतेविषयक जनजागृती, पथनाटय कार्यक्रम, स्वच्छता प्रतिज्ञा, रॅली, सवच्छ भारत अभियानाच्या उपांगांची दुरुस्ती, स्वच्छता ज्योत, टाकाऊ पासून टिकाऊ उपक्रम, एक झाड आईच्या नावे उपक्रम, चित्रकला व रांगोळी स्पर्धा आदि उपक्रम राबविण्यात आले.
    • यावर्षी शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीमधील २ अस्वच्छ ठिकाणे निवडून त्यांची कायमस्वरुपी स्वच्छता करण्याचे निर्देश दिले होते.
    • त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमधील २ ठिकाणांची निवड करुन शासनाच्या पोर्टलवर त्यांचे इव्हेंट क्रियेट करण्यात आले.
    • २ ऑक्टोंबर रोजी स्वच्छ भारत साजरा करण्यात येऊन या सर्व ठिकाणांची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली.
    • गावोगावी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी सहभाग घेतला.
    • दैनंदिन स्वरुपात स्वच्छतेविषयक जनजागृती करण्यात आली.

    . मंदिर स्वच्छता मोहीम”

    • जिल्हयात १७-१-२०२४ ते १९-१-२०२४ या कालावधीत मंदिर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
    • जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात राबविण्यात आलेल्या या अभियानात मंदिराची साफसफाई करणे, मंदिर परिसराची स्वच्छता करणे, प्रमुख मंदिरामध्ये रोषणाई करणे यासारखे उपक्रम राबविण्यात आले. जिल्हयातील ग्रामीण भागातील सर्व गावांमध्ये सदरचे अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले.
    • जिल्हयातील ग्रामीण भागातील सर्व मंदिरांची स्वच्छता करण्यासाठी जिल्हयात मंदिर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
    • धार्मिक स्थळे व मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
    • या मोहिमेत जिल्हयातील सर्व ग्रामंपंचायतींनी सहभागी होऊन मंदिरांची स्वच्छता केली.
    • या मोहिमेला जिल्हयात चांगला प्रतिसाद मिळाला.
    • मंदिराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ व प्लास्टिकमुक्त करण्यात आला.
    • मंदिरांना रंगरंगोटी व विद्यूत रोषणाई करण्यात आली.
    • यामध्ये १७ व १८ जानेवारी २०२४ या कालावधीत जिल्हयातील प्रत्येक गावातील मंदिराची ग्रामस्थ, वारकरी मंडळ, भजरी मंडळ, मंदिर व्यवस्थापन समिती यांच्या सहभागातून स्वच्छता करण्यात आली.

    ३) “जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेले उपक्रम”

    • शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जल जीवन मिशन योजनेबाबत प्रचार प्रसिध्दी व्हावी या साठी निंबध,चित्रकला आणि वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
    • जल रथ उपक्रम : पाण्याची बचत करणेबाबत जल रथ संपुर्ण जिल्हयात पाणी बचत,पाण्याचे जतन,जल पुर्नभरण याबाबतचे संदेश असणारी माहिती देण्यात आली
    • डीजीटल वॉल उपक्रम : पाणी बचत जल जीवन मिशन योजना व स्वच्छ भारत प्रचार प्रसिध्दी साठी संपुर्ण जिल्हयात डीजीटल वॉल पेंटीगव्दारे उपक्रम राबविण्यात आले.
    • जल जीवन मिशन कार्यशाळा गुरुदक्षिणा हॉल येथे आयोजित करण्यात आली
    • विविध पुरस्कारर्थींना पारितोषिक प्रदान करण्यात आली
    • माझी वसुंधरा कार्यशाळा गुरुदक्षिणा हॉल येथे आयोजित करण्यात येऊन माझी वसुंधरा बाबत जल,वायु,अग्नि,आकाश,पृथ्वी या घटकांबाबत उपक्रमांची माहिती मा.विभागीय आयुक्त यांचे कार्यालयामार्फत देण्यात आली.
    • विधी न्याय प्राधिकरण यांच्या वतीने आयोजित शिबीरामध्ये पाणी गुणवत्ता संनियत्रण आणि जल जीवन मिशन योजना याबाबत स्टॉल लाऊन प्रचार प्रसिध्दी करण्यात आली.
    • पाणी गुणवत्ता व ग्रामपाणीपुरवठा व स्वच्छता समिती या बाबत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
    • संत गाडगेबाबत ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करुन सन 20-21,21-22,22-23,23-24 चे पुरस्कार वितरीत करण्यात आले.
    • जागतिक जल दिन तसेच जागतिक शौचालय दिन साजरा करण्यात आले.

    प्रस्तावना
    माहितीचा अधिकार अधिनियम–२००५ या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे शासकीय / निमशासकीय यंत्रणांवर चांगले नियंत्रण आले आहे. तसेच या कायद्यामुळे शासकीय कामकाज कसे होत आहे, शासनाच्या जनकल्याणाच्या विविध योजनांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते, त्यातील विविध स्तरावरील टप्पे / प्रक्रिया याचीही माहिती सर्व सामान्य जनतेला खुली होणार आहे. तसेच शासनाचा कारभार जसजसा पारदर्शक होत जाईल तसतशी जनतेच्या मनातील संदिग्धता कमी होत जाईल. तसेच दप्तर दिरंगाई आणि भ्रष्टाचार यालाही आपोआपच आळा बसेल.

    या अधिकारात खालील बाबींचा समावेश आहे:
    • काम, कागदपत्रे, नोंदी यांची तपासणी करणे.
    • कागदपत्रे किंवा नोंदी यांच्या प्रमाणित प्रती मिळवणे तसेच त्यांची टिपणे काढणे.
    • साहित्याच्या प्रमाणित प्रती मिळवणे.
    • माहिती छापील प्रत (प्रिंटआऊटस्), सीडी, फ्लॉपी, टेप्स, व्हिडिओ रेकॉर्डस् किंवा इतर कोणत्याही ईलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मिळवणे.

    विभागाचे नाव व संपर्क क्रमांक :– जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद, नाशिक

    Landline No.– 0253-2943031

    E-mailnbazpnashik1@gmail.com