ऐतिहासिक वैशिष्ट्ये : सिन्नर हे नाशिक जिल्ह्यातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक शहर असून ते मुख्यतः प्राचीन गोंदेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे, जे १२ व्या शतकातील भूमिज शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. या शहराला गवळी राजा राजगोविंद यादवाने वसवले असून, ते ऐतिहासिकदृष्ट्या यादव आणि पेशवेकालीन समृद्धीचे केंद्र होते. सिन्नरला ‘सिंदिनगर’, ‘सेऊणपूर’ आणि ‘श्रीनगर’ अशा नावांनीही ओळखले जायचे आणि त्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्येही आढळतो.
औंढा किल्ला : सह्याद्रीची उत्तर दक्षिण रांग इगतपूरी परिसरातून थळघाटाच्या पूर्वेकडे जाते. याच रांगेला कळसूबाई रांग म्हणतात. या रांगेचे दोन भाग पडतात. एक म्हणजे अलंग, मदन, कुलंग आणि कळसूबाई, तर पूर्वेकडील औंढा, पट्टा, बितनगड, आड, म्हसोबाचा डोंगर. वृक्षतोडी मुळे हा सर्व परिसर उजाड झालेला आहे. मात्र एसटी ची सोय आणि भरपूर पाऊस यामुळे ग्रामीण जीवन बरेच सुखी झालेले आहे. औंढा किल्ल्यावरचा भाग म्हणजे एक सुळकाच आहे. औंढा किल्ला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या नैऋत्येस आणि देवळालीच्या दक्षिणेस १० मैलांवर आहे.
सामाजिक वैशिष्ट्ये : सिन्नरचे सामाजिक वैशिष्ट्य त्याच्या प्राचीन ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशात आहे, जसे की यादवकालीन गोंदेश्वर मंदिर आणि मध्ययुगीन तटबंदी, तसेच या शहराने कामगार वस्तीतून उद्योजकतेकडे केलेले स्थित्यंतर, ज्यामुळे सामाजिक एकोपा आणि आर्थिक समृद्धी वाढली आहे. सिन्नर नाशिक जिल्ह्याच्या राजकारणातही एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे.
भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक माहिती :
भौगोलिक वैशिष्ट्ये :सिन्नर शहर नाशिक जिल्ह्याच्या आग्नेय दिशेस, नाशिक पुणे रस्त्यावर वसलेले आहे.
उंची – शहराची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ६५१ मीटर (२,१३६ फुट) आहे.
भूभाग – सिन्नर हे महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम महाराष्ट्रातील एक शहर आहे. नाशिक जिल्ह्यातील नकाशावर हे शहर निफाड व दिंडोरी यांच्या दक्षिणेला आहे.
सांस्कृतिक वैशिष्ट्ये :सिन्नर सांस्कृतिक वैशिष्ट्ये प्रामुख्याने ऐतहासिक वारसा, उत्कृष्ठ मंदिर आणि मराठा साम्राज्याशी असलेले संबंध यावर आधारित आहेत. येथील गोंदेश्वर मंदिर हे १२ व्या शतकात बांधलेले हेमाडपंती शैलीतील एक उत्कृष्ठ उदाहरण असून ते शैवपंचायतन परंपरेचे प्रतिक आहे. या व्यतिरिक्त, शहरात भैरवनाथ मंदिर, शैनेश्वर मंदिर आणिभव्य महागणपतीची मूर्ती यासारखी धार्मिक स्थळे आहेत, ज्यामुळे सिन्नर धार्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.
प्रमुख सांस्कृतिक वैशिष्ट्ये–
गोंदेश्वर मंदिर – हे सिन्नरचे सर्वात महत्वाचे सांस्कृतिक वैशिष्ट्ये आहे. हे मंदिर १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधले होते. हे मंदिर पाच मुख्य मंदिराचा समूह असल्याने शैवपंचायतन मंदिर (शिव, पार्वती, गणपती, सूर्य आणिविष्णू) या परंपरेचे प्रतिक आहे. या मंदिराची स्थापत्यकला उत्कुष्ठ असून त्यात गुंतागुंतीचे कोरीवकाम केले आहे.
सिन्नरमध्ये गोंदेश्वर मंदिरासोबत अनेक लहानमोठी मंदीर आहेत.
भैरवनाथ मंदिर – हे सिन्नर शहराचे ग्रामदैवत असलेले मंदिर आहे, ज्यांच्या जिर्णोदधार करण्यात आले आहे.
महागणपती मूर्ती – येथे एक भव्य गणपतीची मूर्ती आहे.
इतर –
गारगोटी संग्रहालय नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरात वसलेले गारगोटी संग्रहालय हे भारतातील एकमेव खासगी खनिज व रत्न संग्रहालय आहे. या संग्रहालयात विविध प्रकारची नैसर्गिक खनिजे, रत्ने, क्रिस्टल्स, झिरकॉन्स आणि दुर्मिळ दगडांचे अप्रतिम नमुने पाहायला मिळतात. हे संग्रहालय “क्रिस्टल वर्ल्ड” या नावानेही प्रसिद्ध आहे आणि नाशिकमधील शैक्षणिक तसेच पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे स्थळ मानले जाते.
संग्रहालयातील वैशिष्ट्ये:
- नैसर्गिकरित्या बनलेले गारगोटी खनिज (geodes)
- विविध रंगातील क्रिस्टल्स – हिरवे, जांभळे, निळे, पांढरे
- अमेथिस्ट, अगेट, जास्पर, झिरकॉन, ॲपेटाइट यांसारखी दुर्मिळ रत्ने
- शोभिवंत आणि शिक्षणवर्धक प्रदर्शन
- सजावटीच्या वस्तू, हस्तकला, आणि रत्नांच्या गोंडस कलाकृती