बंद

    पंचायत समिती, त्र्यंबकेश्वर

    • रविकांत सानप
      श्री. रविकांत रामचंद्र सानप

      गट विकास अधिकारी (उ. श्रे.)

      (संपर्क क्र. ९८८१२६४४९०)

    • हेमंत bachhav
      श्री. हेमंत गोकुळ बच्छाव

      सहायक गट विकास अधिकारी

      (संपर्क क्र. ९४२३६९७६२९)

    भौगोलिक स्थान व क्षेत्रफळ:  त्र्यंबकेश्वर तालुका हा  महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक तालुका आहे.

    त्र्यंबकेश्वराचे मंदिर हे येथील मुख्य आकर्षण असून ते अतिशय भव्य आणि सुंदर आहे. काळ्या पाषाणात बांधल्या गेलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार पहिले बाजीराव पेशवे यांच्या काळात करण्यात आला होता. मंदिरातील लिंग हे इतर शिवलिंगांसारखे नसून पाण्याच्या धारेत तीन वेगवेगळ्या मुद्राधारी आकृती दिसून येतात. दर सोमवार देवाची पालखी असते व या पालखीत शिवाची धातूची मूर्ती स्थानापन्न असते. त्र्यंबकेश्वर तालुका हा  महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक तालुका आहे. त्र्यंबकेश्वर  तालुकयाचे क्षेत्रफळ : 895.85 चौ.किमी आहे

    २) लोकसंख्या: भारताच्या २०११ च्या जनगणनेनुसार

    लोकसंख्या पुरुष स्त्री एकुण
    अ) अनु.जाती 3593 3381 6974
    ब) अनु.जमाती 65680 65084 130764
    क) इतर 9855 8774 18629
    एकुण 79128 77239 156367

     

    ३) हवामान: त्र्यंबकेश्वर  येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते. जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मिमी पर्यंत असते.

    ) राजकीय माहिती :  त्र्यंबकेश्वर तालुका हा  नाशिक जिल्ह्यातील तालुका आहे. त्र्यंबकेश्वर (अ.जा. राखीव) विधानसभा मतदार संघ आहे. हा तालुका नाशिक लोकसभा मतदार संघात येतो. गावपातळीवर ग्रामपंचायती, तर शहरात नगरपरिषद कार्यरत आहे. तालुक्याच्या कारभारावर देखरेख करण्याची जबाबदारी गटविकास अधिकारी (BDO) व   जिल्हा परिषद, नाशिक यांच्याकडे आहे.

    5) भौगोलिक स्थान: त्र्यंबकेश्वर हे शहर भारत देशाच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात नाशिक पासून २८ कि.मी. अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. मुंबई पासून १६५ कि.मी.अंतरावर असून जाण्यसाठी कसारा घाटातून इगतपूरी मार्गे तसेच भिवंडी – [[वाडा] मार्गे खोडाळ्यावरून जाता येते. हे शहर समुद्रसपाटीपासून ३००० फूट उंचीवर आहे. याच ठिकाणी शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर या नांवाने प्रसिद्ध आहे.

    ६) पार्श्वभूमी: त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय/मुख्य प्रशासकीय केंद्र आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी अर्ध सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनीनिर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत. येथे निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर आहे. गोदावरी नदीचा उगम येथेच झाला. []

     

    अ.नं. पदनाम अधिकारी/कर्मचारीयांचे नांव दुरध्वनी क्रमांक/फॅक्स इमेल पत्ता
      १ गटविकास अधिकारी (उ.श्रे.) श्री . रविकांत रामचंद्र सानप nsktrambak@gmail.com प.स. त्र्यंबकेश्वर
    सहाय्यक गट विकास अधिकारी श्री . हेमंत गोकुळ बच्छाव nsktrambak@gmail.com प.स. त्र्यंबकेश्वर
    बालविकास प्रकल्प अधिकारी-१ (त्र्यंबकेश्वर) श्रीम. मंगला शांताराम भोये nsktrambak@gmail.com

     

    प.स. त्र्यंबकेश्वर

    बालविकास प्रकल्प अधिकारी-२  (हरसुल) श्रीम. मंगला शांताराम भोये nsktrambak@gmail.com प.स. त्र्यंबकेश्वर
    गटशिक्षण अधिकारी श्री. मोठाभाऊ रामचंद्र चव्हाण nsktrambak@gmail.com प.स. त्र्यंबकेश्वर
    उपअभियंता लपा  श्री. दीपक विजय महाजन nsktrambak@gmail.com प.स. त्र्यंबकेश्वर
    उपअभियंता ग्रापापू श्री. रोहित गोविंद राठोड nsktrambak@gmail.com प.स. त्र्यंबकेश्वर
    उपअभियंता इवद श्री. सतिश साहेबराव दराडे nsktrambak@gmail.com प.स. त्र्यंबकेश्वर
    पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. योगेश् संपतराव मेहरे nsktrambak@gmail.com प.स. त्र्यंबकेश्वर
    १० तालुका वैद्यकीयअधिकारी डॉ. मोतीलाल बाजीराव पाटील nsktrambak@gmail.com प.स. त्र्यंबकेश्वर
    ११ कृषि अधिकारी श्री. महेश‍ बाबुराव नागपुरकर nsktrambak@gmail.com प.स. त्र्यंबकेश्वर
    • कृषी विभाग, पंचायत समिती त्र्यंबकेश्वर अंतर्गत योजना माहिती :

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सदर योजना अनुसूचित जातीच्या संवर्गाकरिता राबविण्यात येते योजनेअंतर्गत

    1. नवीन सिंचन विहीर पॅकेज
    2. जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज
    3. शेततळे अस्तरीकरण पॅकेज चा लाभ प्रामुख्याने देण्यात येतो

    बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्राअंतर्गत) व (क्षेत्राबाहेरील) सदर योजना ही अनुसूचित जमातीच्या संवर्गाकरिता राबविण्यात येते यामध्ये

    1. नवीन सिंचन विहीर पॅकेज
    2. जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज
    3. शेततळे अस्तरीकरण पॅकेज चा लाभ प्रामुख्याने देण्यात येतो

    योजनेच्या अटी व शर्ती: शेतकऱ्याकडे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा सक्षम प्राधिकार्‍याचा जातीचा दाखला असणे आवश्यक

    1. शेतकऱ्याकडे किमान क्षेत्र 0.40 ते जास्तीत जास्त 6.0 हे. असावे
    2. अधिक संपर्कासाठी कृषी अधिकारी (विघयो) पंचायत समिती त्र्यंबकेश्वर यांच्याशी संपर्क करावा
    3. जिल्हा परिषद सेस योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50% किंवा मर्यादित अनुदानावरती कृषी अवजारे बी बियाणे डीबीटी द्वारे खरेदी अनुदान योजना
    4. राष्ट्रीय बायोगॅस विकास व खत व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत बायोगॅस सयंत्रास अनुदान देणे
    5. नैसर्गिक आपत्ती जळीत झालेल्या शेतकऱ्यांना जिल्हा परिषद सेस अंतर्गत मर्यादित अनुदान योजना.

     

    प्रधानमंत्री / शबरी / रमाई/ मोदी/PM-JANMAN आवास घरकुल योजना पंचायत समिती, त्र्यंबकेश्वर

    अ.क्र. कार्यक्रमाचे नाव रमाई घरकुल योजना
    1 लाभार्थी पात्रते संबंधी अटी व शर्ती ग्रामसभे द्वारे मंजुरी देण्यात आलेले लाभार्थी ज्यांच्याकडे पक्के घर उपलब्ध नाही तसेच यापूर्वी कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
    2 पात्रता ठरविणे साठी आवश्यक असलेली कार्यपद्धती १) लाभार्थी अनुसूचित जातीचा असावा लाभार्थ्यांचे मासिक उत्पन्न १००००/- पेक्षा कमी असावे. ३) कुटुंबात यापूर्वी कोणासही लाभ मिळालेला नसावा. ४) लाभार्थ्यांस ग्रामपंचायतीने ग्रामसभेवर मंजुरी देण्यात यावी. ५ स्वतःचे मालकीची मिळकत असावी किंवा संमती पत्र दाखलकरण्यात यावे.
    3 लाभ मिळविण्याची कार्यपद्धती पात्र लाभार्थीना यांना त्यांच्या ग्रामपंचायतीस प्राप्त उद्दिष्ट्या प्रमाणे ग्रामपंचायत निहाय प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर प्राप्त झाल्या नंतर मा. सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग, नाशिक यांचेकडून प्रस्ताव       तपासून लाभार्थी पात्र करण्यात येतो त्यानंतर मा. प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा, नाशिक यांचेकडून प्रशासकीय मंजुरी दिल्यानंतर लाभार्थ्यास रक्कम रुपये १7००००/- (अक्षरी रुपये एक लाख सत्तर हजार मात्र) तीन ते चार हप्त्या मध्ये पंचायत समिती कार्यालया मार्फत वाटप करण्यात येते.
    4 कार्यक्रमा मध्ये विस्तृत माहिती मिळणाऱ्या लाभाची विस्तृत माहिती रुपये १7००००/- (अक्षरी रुपये एक लाख सत्तर हजार मात्र) घरकुल बांधकाम करण्यासाठी शासनामार्फत अदा करण्यात येते. त्याच प्रमाणे प्रति दिन 31६ रुपये याप्रमाणे ९० दिवसांची मजुरी रुपये 28440/- अक्षरी रुपये आठठावीस हजार चारशे चाळीस  मात्र) मजुरी शासनामार्फत अदा करण्यात येते
    5 अनुदान वाटपाची कार्यपद्धती

    प्रथम हप्ता अनुदान House Sanctioned.

    व्दितीय हप्ता अनुदान Plinth Level.

    तृतीय हप्ता अनुदान Lintal Level..

    6 सक्षम अधिकाऱ्याचे पदनाम चौथा हप्ता / अंतिम हप्ता अनुदान Completed
    7 विनंती अर्जा सोबत लागणारे शुल्क निशुल्क
    8 कार्यपद्धती संदर्भात तक्रारी निवारणासाठी गट विकास अधिकारी, पंचायत समिती त्र्यंबकेश्वर.
    9 संबंधित अधिकाऱ्याचे पदनाम गट विकास अधिकारी, पंचायत समिती त्र्यंबकेश्वर .

     

    महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियान

    अ.क्र. कार्यक्रमाचे नाव अनुदान नियम व अटी कार्यपद्धती
    १) महाराष्ट्रराज्य ग्रामीण जीवनोन्नतीअभियान (MSRLM) खेळतेभांडवल समूहाच्या मूल्यांकनानुसार- १.समूहकिमान ३ माहिने जुना असावा गावातील कार्यरत ICRP मार्फत व प्रभाग समन्वयक समुहाचे मुल्यांकन करून प्रस्ताव तालुका कक्षाला मागणी सदर केली जाते.त्या नंतर जिल्हा कक्षावरून थेट समूहाच्या खात्यातनिधी वर्ग केला जातो
      राज्य शासन -१५०००

    २.कागदपत्रे

    गटाचेपासबुक

    आधारकार्डवयक्तिकपासबुक ई.RF मुल्यांकनफार्म

      केंद्रशासन-१५०००  
    समूहांना कर्ज पुरवठा किमान १लाख कमाल २० लाखापर्यंत १ कर्जमागणी अर्ज गावातील कार्यरत ICRP मार्फत व प्रभाग समन्वयक समुहाचे मुल्यांकन करून प्रस्ताव तालुका कक्षाला कर्ज मागणी सदर केली जाते.नंतर समुहाचे बँक कर्ज प्रस्ताव पोर्टल वरऑनलाईन केले जातात.व त्यानंतर समूहाच्या ऐपती नुसार बँक समूहाला कर्ज देते
        २.समुहाचेबँक पासबुक
        ३.आधारकार्ड
        ४.वयक्तिकपासबुक
        ५.पासपोर्टसाईझफोटो
        ६.ग्रुपफोटो
        ७.समुहाचेलेखे
    समुदाय गुंतवणूक निधी (CIF) समुदाय गुंतवणूक निधी-६००००/- सूक्ष्म गुंतवणूक आराखडा (MIP) ग्राम संघातून ६ महिने जुन्या समुहाचे सूक्ष्म गुंतवणूक आराखडा तयार केला जातो.संबंधित समूह ग्राम संघाकडे CIF निधी मागणी आर्ज करतो .ग्राम संघाची MIP उपसमिती मागणी प्रस्ताव तपासून ग्राम संघाच्या मासिक सभेत मान्यते साठी ठेवते.ग्राम संघाची मान्यता मिळाल्यावर सदर ग्राम संघ प्रभाग संघास मागणी सादर करतो.प्रभाग संघाच्या मासिक सभेत मंजुरी मिळाल्यावर तालुका अभियान कक्षाकडे मागणी सादर केली जाते.नंतर तालुका कक्षातून ऑनलाईन पद्धतीने CIF मागणी जिल्हा कक्षाला सादर केली जाते.जिल्हा कक्ष प्रभाग संघाच्या बँक खात्यात निधी वर्ग करतो.त्यानंतर प्रभाग संघ संबंधित ग्राम संघाच्या बँक खात्यात निधी वर्ग करतो.ग्राम संघातून समूहाला व समुहातून समूह सदस्याला निधी वर्ग केला जातो.

     

    पशुसंवर्धन विभागयोजना, पंचायत समिती, त्र्यंबकेश्वर

    राज्यस्तरीय नाविन्य पूर्ण योजनेंतर्गत राज्यातील ग्रामीण भागात दुध उत्पादना सचालना देण्यासाठी दुधाळ देशी / दुधाळ संकरीत गायी/ म्हशींचे गट वाटप करणे.

    • लाभार्थी प्राधान्य : महिला बचत गटातील लाभार्थी,अल्पभूधारक, सुशिक्षित बेरोजगार
    • लाभ: २ दुधाळ देशी / २ दुधाळ संकरीत गायी / २म्हशींचे गट वाटप करणे,सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थीना गटाच्या किंमतीच्या ५० टक्केआणिअनुसूचित जाती व जमातींच्या लाभार्थीना गटाच्या किंमतीच्या ७५ टक्के अनुदान,
    • गट किंमत: रु.७०,०००/- प्रती गाय, रु.८०,०००/-प्रती म्हैस २ दुधाळ देशी /२ दुधाळ संकरीत गायी- रु. १५६८५०/-२ म्हशींचा गट रु.१७९२५८/-

     

    योजनेचे नावराज्यस्तरीय नाविन्य पूर्ण योजनेंतर्गत अंशत: ठाणबद्ध पद्धतीने शेळी /मेंढी पालनाव्दारे शेतकयांना पूरक उत्पन्न मिळवून देणे.

    • योजना कालावधी :२०११ ते आजपर्यंत, २५.०५.२०२१ पासून सुधारित स्वरुपात
    • लाभार्थी प्राधान्य दारिद्र्य रेषेखालील, अत्यल्पभूधारक, अल्पभूधारक,सुशिक्षित बेरोजगार,महिला बचत गटातील लाभार्थी
    • लाभ १० शेळ्या/ मेंढ्या व १ बोकड/ नर मेंढायांचे गट वाटप, सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थीना गटाच्या किंमतीच्या ५० टक्के आणि अनुसूचित जाती व जमातींच्या लाभार्थीना गटाच्या किंमतीच्या ७५ टक्के अनुदान, उस्मानाबादी /संगमनेरी या जातीच्या शेळ्या व बोकड तसेच मडग्याळ किंवा दख्खनी मेंढ्या अथवा अन्य स्थानिक मेंढ्या गटांचे वाटप करण्यात येते.
    • गट किंमत:उस्मानाबादी/ संगमनेरी शेळी रु.१०३५४५/-,स्थानिक शेळी रु.७८२३१/-,मडग्याळ मेंढ्या रु.१२८८५०/-, दख्खनी व स्थानिक मेंढ्या रु.१०३५४५/-

     

    योजनेचे नाव१००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपाना द्वारे कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करणे

    • योजना कालावधी : २०१३ ते आजपर्यंत.
    • लाभार्थी प्राधान्य:अत्यल्प भूधारक, अल्पभूधारक,सुशिक्षितबेरोजगार, महिला बचत गट किंवा उपरोक्त तीन मधील वैयक्तिक महिला लाभार्थी
    • लाभ एकूण प्रकल्पाची किंमत रु. २,२५,०००/-, पक्षीगृह (१०००चौ.फूट) स्टोररूम,पाण्याची टाकी,निवासाची सोय,विद्युती करण इ.साठी एकूण किंमत रु. २,००,०००/-तर उपकरणे, खाद्याची /पाण्याची भांडी, ब्रुडर इ.बाबत रक्कम रु. २५,०००/- सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थीना गट किंमतीच्या ५० टक्के आणि अनुसूचित जाती व जमातींच्या लाभार्थीना प्रकल्प किंमतीच्या ७५टक्के अनुदान

     

    योजनेचे नाव: जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत अनु .जाती उपयोजना(विघयो)/आदिवासी उपयोजना/आदिवासि क्षेत्राबाहेरील उपयोजना अंतर्गत दुभत्यागाई /म्हशी गट वाटप करणे

    • योजना कालावधी : २०११ते आजपर्यंत, २७.०४.२०२३पासून सुधारती स्वरुपात
    • लाभार्थी प्राधान्य: दारिद्र्य रेषे खालील, अत्यल्पभूधारक, अल्पभूधारक,सुशिक्षित बेरोजगार महिला बचत गटातील लाभार्थी.
    • लाभ-२ दुधाळ देशी /२ दुधाळ संकरीत गायी / २म्हशींचे गट वाटप करणे, अनुसूचित जाती व जमातींच्या लाभार्थीना गटाच्या किंमतीच्या ७५टक्के अनुदान,
    • गट किंमत: रु.७०,०००/-प्रती गाय, रु.८०,०००/-प्रती म्हैस २ दुधाळ देशी /२ दुधाळ संकरीत गायी- रु. १५६८५०/- २म्हशींचा गट रु. १७९२५८/-

     

    योजनेचे नावजिल्हा वार्षिक योजने अंतर्गत अनु .जाती उपयोजना(विघयो)/आदिवासी उपयोजना/आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना अंतर्गत अंशतःठाणबंद पद्धतीने १०शेळी + बोकड / १०मेंढ्या + १नर मेंढा गट वाटप करणे.

    • योजना कालावधी :२०११ ते आजपर्यंत, २५.०५.२०२१ पासून सुधारित स्वरुपात
    • लाभार्थी प्राधान्य –दारिद्र्य रेषेखालील, अत्यल्पभूधारक, अल्पभूधारक, सुशिक्षित बेरोजगार,महिला बचत गटातील लाभार्थी
    • लाभ१० शेळ्या/मेंढ्या व १ बोकड / नर मेंढायांचे गट वाटप, अनुसूचित जाती व जमातींच्या लाभार्थीना गटाच्या किंमतीच्या ७५ टक्के अनुदान, उस्मानाबादी/संगमनेरी याजातीच्या शेळ्या व बोकड तसेच माडग्याळ किंवा दख्खनी मेंढ्या अथवा अन्य स्थानिक, स्थानीक यांचे गटांचे वाटप करण्यात येते.
    • गट किंमत: उस्मानाबादी / संगमनेरी शेळी रु.१०३५४५/- स्थानिक शेळी रु.७८२३१/-,माडग्याळ मेंढ्या रु.१२८८५०/-दख्खनी व स्थानिक मेंढ्या रु.१०३५४५/-

     

    योजनेचे नाव :जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजने अंतर्गत एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम: १०० एक दिवसीय पिल्ले वाटप.

    • योजना कालावधी: २०१०ते आजपर्यंत, २०.०१.२०२३पासून सुधारित स्वरुपात
    • लाभार्थी प्राधान्य– दारिद्र्य रेषेखालील, भूमिहीन शेतमजूर, मागासवर्गीय, अल्प वअत्यल्पभूधारक
    • लाभसर्वप्रवर्गांसाठी ५०% अनुदान, एक दिवसीय १००पिल्ले वाटप गट किंमत रु.२९,५००/-

     

    योजनेचे नाव : जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेअंतर्गत एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम: २५+ तलंग गट वाटप

    • योजना कालावधी: २०१० ते आजपर्यंत, २०.०१.२०२३ पासून सुधारित स्वरुपात
    • लाभार्थी प्राधान्य – दारिद्र्य रेषेखालील, भूमिहीन शेतमजूर, मागासवर्गीय, अल्प व अत्यल्प भूधारक
    • लाभसर्वप्रवर्गांसाठी ५०% अनुदान, २५ + ३तलंगा गट वाटप –गट किंमत रु.१०,८४०/-A

     

    तालुका आरोग्य विभाग पंचायत समिती त्र्यंबकेश्वर आरोग्य विभागाशी संबंधित योजना :

    कुटुंब नियोजन: या योजनेत, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर महिला आणि पुरुषांच्या टीएल शस्त्रक्रिया केल्या जातात. यामध्ये महिला लाभार्थ्यांना (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील) रु.६००/-, इतर सामान्य लाभार्थ्यांना रु.२५०/- आणि पुरुष लाभार्थ्यांना रु.१५००/- मानधन म्हणून दिले जाते.

    आयुष्मान भारत: या योजनेअंतर्गत, आशा स्वयंसेविका मार्फत गाव पातळीवरील सर्व लोकांना आयुष्मान कार्ड दिले जातात. या योजनेअंतर्गत जर तुम्ही खाजगी रुग्णालयात उपचार घेतले तर तुम्हाला ५,००,०००/- रुपये दिले जातात आणि औषधोपचार आणि शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात.

    मातृत्व अनुदान योजना: ही योजना आदिवासी भागात राबविली जाते, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील इतर श्रेणीतील गर्भवती मातांना रु. ४००/- मानधन दिले जाते. ४)     जननी सुरक्षा योजना: या योजनेअंतर्गत ज्या गर्भवती मातांची प्रसूती संस्थात्मक आहे त्यांना ७००/- रुपये आणि ज्यांची प्रसूती घरी आहे त्यांना ५००/- रुपये अनुदान दिले जाते.

     

    एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प त्र्यंबकेश्वर -१/२

    नाविन्यपूर्ण उपक्रम

    अ.क्र. नाविन्यपूर्ण संकल्पना                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                            राबविलेले उपक्रम
    टाकाऊ पासून टिकाऊ THR च्या रिकाम्या गोन्यांपासून बालकाच्या नावाने स्वतंत्र पिशवी तयार करणे
    बाहुली घर सामाजिक भावनेचा विकास
    बाल कोपरा कमी वजनाच्या बालकांच्या वजनवाढी साठी प्रयत्न
    स्तनपाना बाबत प्रशिक्षण IIT चे प्रशिक्षण व्हिडीओ दाखून मार्गदर्श करणे
    परसबाग परसबागेद्वारे शेवगा भाजीपाला लाऊन पोषण आहारात वापर करणे
    स्त्री जन्माचे स्वागत स्त्री जन्म वृद्धीसाठी मुलगी जन्माला आलेल्या मातेचे स्वागत करणे,कौतुक करणे
    आहार प्रशिक्षण THR पासून आहाराचे प्रशिक्षण करून दाखविणे
    पाक कृती प्रदर्शन पाक कृती प्रदर्शनाद्वारे विविध रानभाज्यांचे महत्व पटऊन देणे

    प्रस्तावना
    माहितीचा अधिकार अधिनियम–२००५ या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे शासकीय / निमशासकीय यंत्रणांवर चांगले नियंत्रण आले आहे. तसेच या कायद्यामुळे शासकीय कामकाज कसे होत आहे, शासनाच्या जनकल्याणाच्या विविध योजनांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते, त्यातील विविध स्तरावरील टप्पे / प्रक्रिया याचीही माहिती सर्व सामान्य जनतेला खुली होणार आहे. तसेच शासनाचा कारभार जसजसा पारदर्शक होत जाईल तसतशी जनतेच्या मनातील संदिग्धता कमी होत जाईल. तसेच दप्तर दिरंगाई आणि भ्रष्टाचार यालाही आपोआपच आळा बसेल.

    या अधिकारात खालील बाबींचा समावेश आहे:
    • काम, कागदपत्रे, नोंदी यांची तपासणी करणे.
    • कागदपत्रे किंवा नोंदी यांच्या प्रमाणित प्रती मिळवणे तसेच त्यांची टिपणे काढणे.
    • साहित्याच्या प्रमाणित प्रती मिळवणे.
    • माहिती छापील प्रत (प्रिंटआऊटस्), सीडी, फ्लॉपी, टेप्स, व्हिडिओ रेकॉर्डस् किंवा इतर कोणत्याही ईलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मिळवणे.

     

    अनुक्रमांक शीर्षक वर्णन डाउनलोड
    1 माहितीचा अधिकार अधिनियम २००५, कलम ४ नुसार १ ते १७ मुद्यांची माहिती. माहितीचा अधिकार अधिनियम २००५, कलम ४ नुसार १ ते १७ मुद्यांची माहिती-पंचायत समिती, त्र्यंबकेश्वर (पहा/डाउनलोड करा)

    त्र्यंबकेश्वर: हे नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय/मुख्य प्रशासकीय केंद्र आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी अर्ध सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनीनिर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत. येथे निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर आहे. गोदावरी नदीचा उगम येथेच झाला. []

    श्री त्र्यंबकेश्वर मंदिर (इतिहास)

    दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंझ याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालये बांधली. त्यांतील एक हे शिवालय आहे.

    ती शिवालये अशी : गोदावरी नदीच्या उगमाशी त्र्यंबकेश्वर, वाकी नदीच्या उगमाशेजारचे त्रिंगलवाडीतले शिवालय, धारणा नदीच्या उगमाशेजारचे -तऱ्हेळे येथे, बाम नदीच्या उगमाशेजारचे – बेलगावला, कडवा नदीच्या उगमाशेजारचे – टाकेदला, प्रवरा नदीच्या उगमाशेजारी – रतनवाडीतील अमृतेश्वर, मुळाउगमस्थानी असलेल्या – हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर, पुष्पावतीजवळ – खिरेश्वरातील नागेश्वर, कुकडीजवळ्च्या – पूरमधील कुकडेश्वर, मीना नदीच्या उगमाशेजारच्या – पारुंडेतील ब्रह्मनाथ, घोड नदीच्या उगमस्थानी – वचपे गावातील सिद्धेश्वर आणि भीमा नदीजवळचे -भवरगिरी. ही सर्व मंदिरे शिल्प सौंदर्याने नटलेली आहेत, कोरीव कलेने सजलेली आहेत. यातच त्र्यंबकेश्वराच्या मंदिराचा समावेश आहे.डोंगरामधून लहान असा एक रस्ता आहे.

    नानासाहेब पेशवे यांनी इ.स. १७५५१७८६ या कालावधीत [[नागर स्थापत्यशैली]त श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नव्याने बांधवले. भारत सरकारने या मंदिराला दिनांक ३० एप्रिल, इ.स. १९४१ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे.[] मंदिराच्या चहूबाजूस दगडी तटबंदी आहे. कळसावर पाच सुवर्णकलश असून ध्वजा पंचधातूंची आहे. कलश आणि ध्वजा अण्णासाहेब विंचुरकरांनी अर्पण केली आहे. मंदिराच्या बाजूस असलेल्या कुशावर्त तीर्थाचा जीर्णोद्धार होळकरांचे फडणीस असलेल्या पारनेरकरांनी केला.

    “गोदावरीतटी, एका ठायी नांदताती, ब्रह्मा, विष्णू, महेश वैकुंठचतुर्दशी, त्रिपुरीपौर्णिमा आणि महाशिवरात्रीस, भक्त लोटती, भावे भजती त्रिनेत्र ज्योतिर्लिंगास त्र्यंबकेश्वर महती जगती वर्णावी किती ॥ १० ॥

    ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. श्रावणी सोमवारांना त्र्यंबकेश्वरी लक्षावधी भाविक हजेरी लावतात. श्रावण महिन्यातील पहिल्या तीन सोमवारी त्र्यंबकेश्वरास भाविकांची गर्दी वाढत जाते.

    त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चारही बाजूंना कोट बांधलेला असून त्याच्या पूर्व बाजूस मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाला लागूनच गावातला प्रमुख रस्ता आहे. तर दक्षिण बाजूलाही आणखी एक छोटा दरवाजा आहे.

    येथील कुशावर्तात स्नान करण्यासाठी भाविक भारतवर्षातून हजेरी लावतात. येथे ब्रह्मगिरी हे महाराष्ट्रातले उंचीने दुसऱ्या क्रमांकाचे स्थळ(?) आहे. निवृत्तीनाथांची यात्राही येथे भरते.

    गावात अनेक प्राचीन देवळे आहेत. त्यावरील कोरीवकाम पाहण्याजोगे आहे. गावामध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. नाशिकहून दर तासाला बसगाड्यांची सोय आहे. येथून ठाणे जिल्ह्यातील जव्हार येथे जाणारा नयनरम्य असा घाट रस्ता आहे.

    या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. मुख्यतः तांदूळ व नाचणी ही पिके घेतली जातात. ग्रामीण आदिवासींसाठी हे बाजाराचे गाव आहे. आदिवासी संघटना या भागात आदिवासींच्या हक्कांसाठी काम करीत असतात. मठांना इनाम मिळालेल्या जमिनी बहुधा येथील आदिवासी कसतात.

     

    ब्रह्मगिरी – ब्रम्हगिरी प्रदक्षिणा (फेरी) ( त्र्यंबकेश्वर / नाशिक)

    त्र्यंबकेश्वर – १२ ज्योतिर्लिंगापैकी एक, भाविक इथे महादेवाचे दर्शन घेतात, कुशावर्तात अंघोळ करतात, काही पूजा अर्चा ज्या फक्त इथेच होतात त्या करतात, त्यातले काही जण पाठीमागे असलेल्या ब्रह्मगिरी वर शंकराच्या जटा पाहून परत येतात. पण मुळात या ब्रह्मगिरी पर्वतावर खूप काही आहे, या पर्वताला पौराणिक , ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्व आहे. आजच्या भटकंती मध्ये संपूर्ण ब्रह्मगिरी, आणि ब्रह्मगिरीच्या जोडकिल्ला दुर्गभांडार पाहणार आहोत तसेच मेटघरचा किल्ला म्हणजेच ब्रह्मगिरीच्या पाठीमागच्या बाजूने हत्तीदरवाजा गडाचे अवशेष पाहत खाली उतरू. आणि गडाला वळसा घालून पुन्हा त्र्यंबकेश्वर. थोडक्यात काय तर संपूर्ण ब्रह्मगिरी प्रदक्षिणा .

    ब्रह्मगिरी :

    त्र्यंबकेश्वर मंदिरामागे आडवी पसरलेली एक लांबच लांब डोंगररांग दिसते, हाच तो ब्रह्मगिरी पर्वत. या रांगेचा उजवीकडील भाग हा मूळ डोंगररांगे पासून थोडा वेगळा झालेला भासतो, एका नैसर्गिक भिंतीने हा उजवीकडील डोंगर मूळ ब्रह्मगिरी शी जोडला गेला आहे. हा ब्रह्मगिरीच्या जोडकिल्ला दुर्गभांडार. त्र्यंबकेश्वर मंदिर आणि कुशावर्तचे दर्शन घेतेले कि आपण ब्रह्मगिरी पर्वताच्या रस्त्याला लागतो, रस्ता व्यवस्थित बांधीव पायऱ्यांचा आहे, खरेतर हे बांधकाम अलीकडचे आहे. १९०८ मध्ये दोन शेठजीनी त्याकाळी ४०००० रुपये खर्च करून या पायऱ्या बांधल्या होत्या, हा मार्ग आजच्या तारखेला खूप चांगल्या स्थितीत आहे. पुढे कातळात कोरलेल्या पुरातन पायऱ्या दर्शनी पडतात, हा पर्यायांचा मार्ग दगडात कोरून काढलेल्या दरवाजा ओलांडून आपल्यला ब्रह्मगिरी वर प्रवेश देते. पर्वताच्या माथ्यावर येताच आपल्याला एका वाड्याचे अवशेष दिसतात आणि बाजूलाच एक छोटेसे पाण्याचे टाके, हा वाडा मोरोपंत पिंगळे यांचा आहे असे सांगितले जाते , तर थोड्या अंतरावर दारुकोठार ही दिसते. पण एक प्रश्न डोक्यात येऊन राहतो कि दारू कोठार वाड्याच्या इतके जवळ कसे काय? या वाड्याच्या अवशेषांचा रेफ्रेन्स शोधण्याच्या प्रयन्त केला पण काही सापडले नाही. इथून पुढे पायवाटेने आपण डोंगराच्या पलीकडच्या बाजूस पोहचतो. डावीकडे काही मंदिरे दिसतात आणि उजवीकडे थोडे दूर शंकराच्या जटाचे मंदिर दिसत असते. भगवान शंकरांनी या ठिकाणी गुढग्यावर बसून कातळावर जटा आपटल्या आणि गंगेचा इथे उगम झाला अशी अक्खय्यिका आहे .त्या जटा आणि गुढग्यांचे ठसे इथे कातळात पाहता येतात. हा झाला श्रद्धेचा भाग – इथून पुढे एक पाय वाट दुर्ग भांडार गडाकडे जाते. सहसा भाविक या वाटेला जात नाहीत. पायवाट थोडीसी निसरडी आहे तर थोडे जपून , अर्धा तास चाललो कि समोर दुर्ग भांडारचे दर्शन होते, एका नैसर्गिक भिंतीने हा दुर्गभांडार मुख्य ब्रहागिरी पासून वेगळा झालेला दिसतो. या भिंतीवर उतरण्यासाठी कातळात कोरून काढलेल्या पायऱ्या आपल्याला उतारवय लागतात. नाशिक मधील किल्ल्यांचे हे वैशिष्ट , इथे कातळात कोरलेल्या सुबक पायऱ्या जागोजागी पाहायला मिळतात. दुर्ग-भांडारच्या पायऱ्यांचे वैशिष्ट म्हणजे उतरताना आपल्या तीनही बाजूंनी कातळ असतो फक्त डोक्यवरचे छत काय ते उघडे असते. पायऱ्या संपल्या कि थोडे रांगत आपण भिंतीवर येतो, या भिंतीच्या माथ्यवरून चालताना दोन्ही बाजूला दरी दिसते – उजवीकडे त्र्यंबकेश्वर तर डावीकडे हरिहर / भास्करगडचा परिसर पाहत आपण दुर्गभांडार पाशी पोहचतो. इथून पुन्हा तश्याच कातळात कोरलेल्या पायऱ्या चढत आपण गडाच्या माथ्यावर जातो. इथून संपूर्ण ब्रह्मगिरी आपण पाहू शकतो.

    गडाच्या शेवटच्या टोकावर व्यवस्तीत बांधून काढलेला बुरुज पाहून पुन्हा परतीचा मार्ग चालू करावा. पुन्हा महादेवाच्या जटाकडे आलो कि सरळ गंगेच्या ( गोदावरीच्या ) उगम स्थानाकडे जावे, इथे गौतम ऋषींचा आश्रम लागतो आणि अगदी थोड्या अंतरावर गोदावरीचे मंदिर, नदीचा प्रवाह गोमुखातून होतो. ब्रह्मगिरी वरून तीन नद्यांचा उगम होतो त्यातील अहिल्या आणि गोदावरीचा खाली मंदिराजवळ संगम होतो. भाविक शकयतो इथून मागे वळतात, आपण मात्र इथून सरळ सरळ समोर चालत जाणार आहोत, इथे पुढे आपल्याला किल्ल्याचे अवशेष दिसू लागतात, हा मेटघरचा किल्ला. पायवाटेवर चालतना वर ब्रह्मगिरीची पाच शिखरे दिसतात, त्यामुळे ब्रह्मगिरीला पंचलिंगी असेही म्हणले जाते. या शिखरांची नावे – साद्य जटा , वामदेव , अघोर , ईशान आणि तट पुरुष. चालत चालत आपण गडाच्या दरवाज्यापाशी पोहचतो – या दरवाजास हत्ती दरवाजा म्हणतात. समोर तटबंदीचे अवशेष आहेत, दरवाजातून बाहेर पडले कि, घळीतून खाली उतरण्याची वाट आहे तर डाव्या बाजूला शेवटच्या टोकावर बुरुज दिसतो, ऐकीव माहितीप्रमाणे या बुरुजास विनय बुरुज म्हणतात ( reference सापडला नाही ). बांधून काढलेल्या पायऱ्या काही ठिकाणी दिसतात पण वरची तटबंधी ढासळून खाली आल्याने पायऱ्या आणि वाट काही ठिकाणी मोडून गेली आहे. एका ठिकाणी तर लोखंडी शिडी ने खाली उतरावे लागते. गड उतरून खाली आलो कि काही समाध्या आणि वीरगळी दिसतात. इथून पुढे आपण डावीकडे वळतो आणि गडाच्या कातळ भीतीला समांतर चालत समोरच्या खिंडीपाशी येतो. खिंड ओलांडली कि अगदी १५ मिनिटात खाली उत्तरत त्रयम्बकेश्वर पाशी येतो. अश्या प्रकाराने संपूर्ण ब्राह्गिरीची प्रदक्षिणा पूर्ण होते.

     

    ई मेल आईडी: nsktrambak@gmail.com   

    गट विकास अधिकारी यांचा संपर्क क्रमांक: 9881264490

    सहायक गट विकास अधिकारी यांचा संपर्क क्रमांक: 9423697629

    पंचायत समिती यांचे संपर्क क्रमांक: (02594-233812)