वैशिष्ट्ये :
सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेल्या या तालुक्यात १०० टक्के आदिवासी लोक राहतात. उंच सखल डोंगराळ भाग असून पश्चिमेस गुजरात राज्याची सीमा आहे. मुख्य व्यवसायशेती असून गिरणा, पुनद, बेहडी व तांबडी नद्यांनी सुजलाम् सुफलाम् केले आहे. येथे चणकापूर,पुनद धनोली भेगू ही धरणे असून नागली, भात, मका, गहू, कांदा बरोबरच भाजीपाला यांचे उत्पादन घेतले जाते. सामाजिक वनीकरणाच्या साह्याने डोंगराळ भागात वृक्षराजी दिसून येतात. शेती बरोबरच मासेमारी, हस्तकला, व्यापार, पशुपालन याद्वारे विकास होत आहे. आई सप्तशृंगी मातेची छाया तालुक्यावर आहे. मुख्यत्वे येथे आदिवासी समाज. पण सर्व धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात. प्रत्येक समाजाची काही खास वैशिष्ट्ये आहेत. अहिराणी, कोकणी, भिलावू, ह्या भाषा तर दिवाळी, होळी, पोळा, डोंगरी देव हे प्रमुख सण आहेत. लोक कष्टाळू व अंधश्रद्धाळू आहेत. महिला बचतगट, बँका, पोस्ट, दवाखाना, याद्वारे जीवनमान उंचावत आहे. कलापथके, भजनीमंडळे, लोकनाट्य याद्वारे सामाजिक जागृती होत आहे. सप्तशृंगी गडावर चैत्री शुद्ध प्रतिपदा ते पौर्णिमा व नवरात्रात कोजागिरी पर्यंत यात्रा भरते. नवरात्रात गावोगावी चक्रपूजा केली जाते. कलावती आई, स्वामी समर्थ केंद्र हे समाजप्रबोधन कार्य करतात. हिंदू, मुस्लिम गुण्या गोविंदाने नांदतात. एक गाव एक पानवठा राबविला जातो. त्यामुळे जातीभेद पाळत नाहीत, भोवाडा पद्धतीत सोंगे नाचवून रामलीला, पांडव प्रताप दाखवतात. विविधतेने नटलेली भूमी आहे. पेशवे कालीन रघुनाथराव यांना अटक करून शिक्षा दिली तो धोडप किल्लाजवळच आहे. चाचेर किल्ल्यापासून भुयारी मार्गाने धोडप किल्ल्यावर जात असत. जयदरचे सिद्धेश्वर मंदिर, देवळी कराडचे हेमाडपंथी महादेव मंदिर, खेडगावचा स्वयंभू गणेश मदिर, भेंडी येथील दत्तमंदिर, पेमगीर डोंगरावर शिवकालीन तलाव व पुरातन मंदिर आहे. स्वातंत्र्यासाठी व जंगल सत्याग्रह करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक चणकापूर येथे आहे. सप्तशृंग गडावर शितकडा,कालीकुंड, सूर्यकुंड प्रसिद्ध आहेत. जवळच मार्कंड ऋषींचे मंदिर प्रसिद्ध आहे.
धरणे : कळवण तालुक्या पासून २४ ते २५ कि.मी अंतरावर अभोण्या जवळून ५ ते ६ की.मी दूर चनकापूर हे धरण आहे फार प्राचीन काळापासून हे धरण बांधण्यात आले आहे व थोड्याच अंतरावर स्वर्गवासी माजी आमदार कळवण तालुक्याचे पानदेव कै.ए. टी.पवार यांनी लोकांसाठी बांधलेला अर्जुन सागर हा धरण जयदर जवळ सुपले गावाजवळ आहे या धरणाला स्वतः ए. टी.पवार अर्जुन तुळशीराम पवार यांचं नाव अर्जुन सागर म्हणून देण्यात आलेलं आहे.
कळवण तालुका हा नाशिक जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेला नैसर्गिक सौंदर्याने नटलेला तालुका आहे. हा तालुका मुख्यत्वे आदिवासी लोकसंख्येचा असून, येथे सप्तशृंगी देवीचे प्रसिद्ध मंदिर व धोडप किल्ला, मोहंदर किल्ला यांसारखी धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे आहेत. तालुक्यातील भूभाग उंचसखल असून, पश्चिमेला गुजरात राज्याची सीमा आहे. येथील लोकसंख्येचा प्रमुख व्यवसाय शेती व शेतीपूरक उद्योग आहे. ग्रामीण विकास, सामाजिक न्याय, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, कृषी व महिला-बालकल्याण या क्षेत्रात पंचायत समिती कळवण महत्त्वाची भूमिका बजावते.
भौगोलिक स्थान:
- कळवण नाशिकपासून सुमारे ८० किलोमीटर अंतरावर आहे.
- हा तालुका सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेला आहे.
- येथील भूभाग उंचसखल आणि डोंगराळ आहे.
- येथे बेहाडी आणि गिरणा नद्यांचा संगम होतो.
लोकसंख्या आणि संस्कृती:
- या तालुक्यात १०० टक्के आदिवासी लोक राहतात.
- २०११ च्या जनगणनेनुसार, तालुक्यात १५२ महसुली गावे आहेत.
- कळवण तालुक्याचे क्षेत्रफळ 86400 हे.
- कळवण तालुक्यात एकुण 86 ग्रामपंचायती आहेत.
- कळवण तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र 09 व उपकेंद्र 49 आहेत.
- कळवण तालुक्यात पशु चिकीत्सालय श्रेणी 01- 10 व प्रथम उपचार पशु केंद्र श्रेणी 02 चे 04आहेत.
- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 203 आहेत.
लोकसंख्या : भारताच्या २०११ च्या जनगणनेनुसार
|
लोकसंख्या |
पुरुष | स्त्री | एकुण | |
| 106130 | 102232 | 208362 | ||
| अ) अनु.जाती | 7095 | |||
| ब) अनु.जमाती | 143667 | |||
| क) इतर | 57600 | |||
| एकुण | 208362 | |||
सप्तशृंगी गड : हे सप्तशृंगी देवीचे एक प्रसिद्ध धार्मिक देवस्थान असून, कळवणपासून सुमारे २२ किमी अंतरावर आहे.
धोडप किल्ला : हा एक लोकप्रिय गिर्यारोहण स्थळ आणि महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर आहे.
राजकीय माहिती : कळवण / सुरगाणा विधानसभेचा क्रमांक 117 आहे; विधानसभेची स्थापना 1962 मध्ये झाली. कळवण हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

