ग्रामिण पाणी पुरवठा विभाग
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत, नाशिक जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यातील पाणी पुरवठा विषयक कामे केली जात आहेत. यासाठी एकूण १५ तालुक्यांसाठी खालीलप्रमाणे उपविभाग कार्यरत आहेत.
| अ.क्र. | उपविभागाचे नाव |
| 1 | ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, नाशिक |
| 2 | ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, सुरगाणा |
| 3 | ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग,मालेगाव |
| 4 | ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, येवला |
| 5 | ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, निफाड |
| 6 |
ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, त्र्यंबकेश्वर
|
| 7 |
ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, इगतपूरी
|
| 8 |
ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, कळवण
|
| 9 | ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग पेठ |
| 10 | ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग चांदवड |
| 11 | ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग बागलाण |
| 12 | ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग देवळा |
| 13 | ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग नांदगाव |
| 14 | ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, दिडोरी |
| 15 | ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, सिन्नर |
तसेच ग्रामीण पाणी पुरवठा येाजनांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी पथक कार्यरत आहे व जिल्ह्यातील हातपंप व विद्युत पंप यांचेसाठी उपअभियंता (यां), यांत्रिकी पथक कार्यरत आहे.
पिण्याच्या पाण्याच्या सुविधा अंतर्गत खालील योजना राबविल्या जातात :-
- जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना हा सदरचा कार्यक्रम लोकसहभागावर आधारित आहे.
जलजीवन कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटूंबाला घरगुती नळ जोडणीद्वारे 55 लि. प्रती माणशी दराने शुध्द,शाश्वत, पुरेसे ,नियमित व परवडेल अशा पध्दतीने पाणी उपलब्ध करणे हे मुख्य ध्येय आहे. या योजनेमध्ये प्रामुख्याने पाणी गुणवत्ता ,बाधीत क्षेत्र, अवर्षण प्रवण क्षेत्र, संसद आदर्श ग्राम योजनांतील गांवे यांचा प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक शाळा, अंगणवाडी, संस्था ,ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, व्यायामशाळा, वाचनालये,यासाठी कार्यान्वित नळाद्वारे पाणी पुरवठा करणेचे नियोजन आहे. त्याचबरोबर शाश्वत पाणी मिळण्यासाठी पाणी स्त्रोत, नवीन घेणे व सुधारणा करणे तसेच पाणी पुरवठा सुविधांची निर्मिती करणे व अस्तित्वात योजनांच्या देखभाल दुरुस्तीसाठी प्रोत्साहन करणे हे उदिदष्ट आहे. तसेच या अंतर्गत लाभार्थी ग्रामस्थांना आपली मालकी व उत्तर दायित्वाची जाणीव करुन देण्यासाठी लोकसहभाग असणे आवश्यक असल्याचे सुचीत केले. या कार्यक्रमांतर्गत सुविधा निर्माण करण्यापेक्षा वितरणावर म्हणजेच प्रत्यक्ष शाश्वत नळ जोडणी करण्यावर भर देण्यात आला आहे.
- राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम सदरचा
- शासकीय आश्रमशाळा पाणी पुरवठा योजना
- हातपंप व विद्युत पंपाची कामे
- स्थानिक विकास कार्यक्रम
- ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे
- आदिवासी उपयोजना (खास बाब)
- नाविन पुर्ण योजना
- आदिम जमाती योजना
- खासदार निधी
- आमदार निधी
- देखभाल दुरुस्ती अंतर्गत पेयजल योजनांची दुरुस्ती कामे
- टंचाई अंतर्गत पिण्याच्या पाण्याची सुविधा पाणी टंचाई कार्यक्रमाचा आराखडा हा (१) ऑक्टोबर ते डिसेंबर, (२) जानेवारी ते मार्च आणि (३) एप्रिल ते जुन अशा तिमाहीनुसार, गटविकास अधिकारी यांच्याकडून तयार करुन घेऊन, मा.जिल्हाधिकारी, नाशिक यांचेकडून मंजुरी घेतली जाते. टंचाई अतर्गत खालील नऊ उपाययोजनांतर्गत कामे केली जातात.
१ बुडक्या घेणे
२) विहीर खोल करणे / गाळ काढणे
३) खाजगी विहीर अधिग्रहण करणे
४) टँकर / बैलगाडीने पाणी पुरवठा करणे
५) प्रगतीपथावरील योजना पुर्ण करणे
६) नळ योजनांची विशेष दुरुस्ती
७) विधन विहीरींची विशेष दुरुस्ती
८ नविन विधन विहीर घेणे / कुपनलिका
९) तात्पुरती पुरक नळ योजना
उपरोक्त उपाययोजना राबविण्यासाठी, तालुकास्तरावर तहसिलदार व गटविकास अधिकारी यांचेस्तरावर प्रस्ताव तयार केला जातो व मंजुर आराखड्यानुसार उपाययोजना राबविण्यात येतात.
- जिल्हा परिषदेमार्फत ३ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची देखभाल व दुरुस्ती करण्यात येते.
वरिलपैकी कोणतीही योजना आपल्या गावासाठी राबवावयाची झाल्यास आपल्या तालुक्यातील उप अभियंत, ग्रामीण पाण पुरवठा उपविभाग व गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचेशी संपर्क साधावा