बंद

    अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे.

    • तारीख : 30/01/2025 -

    उदिष्ट :- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी प्रत्येक अनुसूचित जाती व नवबौध्द वस्त्यांमध्ये नळ पाणी पुरवठा,गठारे,स्वच्छताविषयक सोयी,जोड रस्ते,अंतर्गत रस्ते,समाज मंदीर व समाज मंदीर दुरूस्ती,पेव्हर ब्लॅाक इ.पायाभूत व्यवस्था करुन त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ही योजना आहे.

    लाभाचे स्वरूप :-

    अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेतंर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीच्या लोकस्ंख्येच्या निकषानुसार मुलभूत गरजा भागविण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात अनुदान वाटप करण्यात येते.

    शासन निर्णय दि. 5 डिसेंबर 2011 व शासन निर्णय दि. 6 ऑक्टोंबर 2021 नुसार अनु.जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे अंतर्गत लोकसंख्येच्या प्रमाणात खालील प्रमाणे अनुदान देय आहे.

    अ.क्र. लोकसंख्या शा.नि.दि.5 डिसेंबर 2011 नुसार अनुदान रक्कम रूपये (लाखात) शा.नि.दि. 6 ऑक्टोंबर 2021 नुसार अनुदान रक्कम रूपये (लाखात)
    1 10 ते 25 2.00 4.00
    2 26 ते 50 5.00 10.00
    3 51 ते 100 8.00 16.00
    4 101 ते 150 12.00 24.00
    5 151 ते 300 15.00 30.00
    6 301 च्या पुढे 20.00 40.00
    सदर योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीत पाणीपुरवठा, मलनि:स्सारण, वीज, गटर, अंतर्गत रस्ते, पोहोच रस्ते,पर्जन्य पाण्याचा निचरा (Rain Water Harvesting), समाजमंदिर व समाजमंदिर दुरुस्ती, पेव्हर ब्लॉक,इत्यादी कामे घेतली जातात.

    सामाजिक न्याय व विशेष सहाय्य्‍ शासन शुध्दीपत्रक क्र.दवसु-2015/प्र.क्र.59/अजाक-1 दि.8.03.2016 अन्वये सदर योजनेतंर्गत कामे जिल्हा परिषद समाज कल्याण समितीच्या मान्यतेने मंजुर करण्यात येते.

    शासन शुध्दीपत्रक क्र. दवसु2015/प्र.क्र.59/अजाक9/मुंबई 32 दिनांक 8 मार्च 2016 अन्वये लाभार्थी निवड समाजकल्याण समिती जि.प. यांचे मान्यतेने मंजूर करावी. असे शासन निर्णयात नमूद करणेत आलेले आहे.

    अ.क्रं जिल्हा समिती पदनाम
    1 सभापती (समाज कल्याण) अध्यक्ष
    2 जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि.प. सदस्य सचिव

    लाभार्थी:

    अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेतंर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीच्या लोकस्ंख्येच्या निकषानुसार मुलभूत गरजा भागविण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात अनुदान वाटप करण्यात येते.

    फायदे:

    सदर योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीत पाणीपुरवठा, मलनि:स्सारण, वीज, गटर, अंतर्गत रस्ते, पोहोच रस्ते,पर्जन्य पाण्याचा निचरा (Rain Water Harvesting), समाजमंदिर व समाजमंदिर दुरुस्ती, पेव्हर ब्लॉक,इत्यादी कामे घेतली जातात.

    अर्ज कसा करावा

    ऑनलाइन