बंद

    पंचायत समिती, नाशिक

    • Soniya Mam
      डॉ. श्रीमती सोनिया रविंद्र नाकाडे

      गट‍ विकास अधिकारी (उ.श्रे.)

      (संपर्क क्र. ९६३७७५४५५५)

    • छायाचित्र उपलब्ध नाही
      श्री. रघुनाथ म्हाळसा सुर्यवंशी

      सहायक गट विकास अधिकारी

      (संपर्क क्र. ९९२२९२०६८१)

    नाशिक हे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील शहर आहे. नाशिक हे भारतातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. हे ऑटोमोबाईल हब मधील एक प्रमुख औद्योगिक केंद्र आहे.नाशिक हे महाराष्ट्रातील चौथे मोठे शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहरातील लोकसंख्या अंदाजे १४,००,००० आहे. या शहरात नाशिक विभागनाशिक जिल्ह्याचे व नाशिक तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

    येथे मराठी भाषा बोलली जाते. गोदावरी नदीच्या काठावरील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. नाशिक शहराच्या दक्षिणेला त्रिरश्मी बौद्ध लेणी आहे, उत्तरेला चांभार लेणी व रामशेज किल्ला आहे. पश्चिमेस ३५किमी अंतरावर त्र्यंबकेश्वर आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष व कांद्याचे उत्पादन होते. त्याप्रमाणेच वाईन-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे ‘भारताची वाईन व्हॅली’ म्हणून आता नाशिक व नजीकचा परिसर नव्याने प्रसिद्ध होत आहे. जगातील सर्वांत पहिले व मोठे मातीचे धरण नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरण येथेच आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (य. च. म. मु. वि.) नाशिकमध्येच आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर सिटी अँड इंडस्ट्रीज डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनने सिडको नावाचा शहराचा एक नवीन विभाग वसवला आहे. मुंबई व पुण्याप्रमाणेच येथे नाशिक शहर विकास प्राधिकरण स्थापन झालेले आहे.

    पंचवटी हा सुद्धा नाशिकचा एक भाग आहे. नाशिकमधील अशी धार्मिक स्थळे पाहिल्याबरोबर माणसाला पुरातन काळाचे महत्त्व कळते. नाशिक हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. गोदावरी ही नदी नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथून उगम पावते. नाशिकमधील गोदाघाट प्रसिद्ध आहे. नाशिकमध्ये काळाराम मंदिर आहे. पेशवे काळामध्ये ही या शहराला विशेष धार्मिक स्वरूप प्राप्त झाले. तांब्या पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक हे शहर विशेष प्रसिद्ध आहे. शहराला प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाची दीर्घ परंपरा लाभलेली आहे. (सविस्तर वाचा)

     

    नाशिक तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत कार्यालये-

    • ग्रामपंचायत  (67)
    • अंगणवाडी (203)
    • प्राथमिक आरोग्य केंद्र  (5)

     

     

                                                  राबविण्यात येणाऱ्या योजना

    • कृषी विभाग, पंचायत समिती नाशिक अंतर्गत योजना माहिती :
    • डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सदर योजना अनुसूचित जातीच्या संवर्गाकरिता राबविण्यात येते योजनेअंतर्गत
    • नवीन सिंचन विहीर पॅकेज
    • जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज
    • शेततळे अस्तरीकरण पॅकेज चा लाभ प्रामुख्याने देण्यात येतो

     

    • बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (क्षेत्राअंतर्गत) व (क्षेत्राबाहेरील) सदर योजना ही अनुसूचित जमातीच्या संवर्गाकरिता राबविण्यात येते यामध्ये-
    • नवीन सिंचन विहीर पॅकेज
    • जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज
    • शेततळे अस्तरीकरण पॅकेज चा लाभ प्रामुख्याने देण्यात येतो.
    • योजनेच्या अटी व शर्ती-
    • शेतकऱ्याकडे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा सक्षम प्राधिकार्‍याचा जातीचा दाखला असणे आवश्यक
    • शेतकऱ्याकडे किमान क्षेत्र 0.40 ते जास्तीत जास्त 6.0 हे. असावे
    • अधिक संपर्कासाठी कृषी अधिकारी (विघयो) पंचायत समिती सिन्नर यांच्याशी संपर्क करावा
    • जिल्हा परिषद सेस योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50% किंवा मर्यादित अनुदानावरती कृषी अवजारे बी बियाणे डीबीटी द्वारे खरेदी अनुदान योजना
    • राष्ट्रीय बायोगॅस विकास व खत व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत बायोगॅस सयंत्रास अनुदान देणे
    • नैसर्गिक आपत्ती जळीत झालेल्या शेतकऱ्यांना लाभ जिल्हा परिषद सेस अंतर्गत मर्यादित अनुदान योजना.

     

    • प्रधानमंत्री / रमाई/ आवास घरकुल योजना पंचायत समिती,नाशिक
    अ.क्र. कार्यक्रमाचे नाव रमाई घरकुल योजना
     

    ) सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडील दिनांक १५ नोव्हेंबर २००८ च्या शासननिर्णयान्वये राज्यात अनुसुचित जाती नवबौध्दा घटकांसाठी घरकुल येाजना जाहिर करण्यात आली.

    ) शासननिर्णय दिनांक ९  मार्च २०१० अन्वये घरकुल योजनेची प्रत्याक्ष अंमलबजावणी सुरु झाली.

    ) शासननिर्णय दिनांक १९ नोव्हेंबर २०११ अन्वये अनुसुचित जाती नवबौध्दा घटकांसाठी घरकुल येाजना या योजनेसरमाई आवास योजनाअसे नाव देण्यात आले.

      1 लाभार्थी पात्रते संबंधी अटी व शर्ती ग्रामसभे द्वारे मंजुरी देण्यात आलेले लाभार्थी ज्यांच्याकडे पक्के घर उपलब्ध नाही तसेच यापूर्वी कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
    2 पात्रता ठरविणे साठी आवश्यक असलेली कार्यपद्धती १) लाभार्थी अनुसूचित जातीचा असावा. लाभार्थ्यांचे मासिक उत्पन्न १००००/- पेक्षा कमी असावे ३) कुटुंबात यापूर्वी कोणासही लाभ मिळालेला नसावा ४) लाभार्थ्यांस ग्रामपंचायतीने ग्रामसभेवर मंजुरी देण्यात यावी. ५ स्वतःचे मालकीची मिळकत असावी किंवा संमती पत्र दाखल करण्यात यावे
     3 लाभ मिळविण्याची कार्यपद्धती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील दिनांक ३०  सप्टेंबर २०१६ रोजीच्या शासननिर्णयान्वये लाभार्थी निवड निकष निश्चित करण्यात येउुन पात्र लाभार्थीना त्यांच्या ग्रामपंचायतीस प्राप्त उद्दिष्ट्याप्रमाणे ग्रापंचायत निहाय प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर प्राप्त झाल्यानंतर मा. सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग, नाशिक यांचेकडून प्रस्तावत पासून लाभार्थी पात्र करण्यात येतो त्यानंतर म. प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा, नाशिक यांचेकडून प्रशासकीय मंजुरी दिल्यानंतर लाभार्थ्यास रक्कम रुपये १२००००/- (अक्षरी रुपये एक लाख वीस हजार मात्र) तीन हप्त्यामध्ये पंचायत समिती कार्यालयामार्फत वाटप करण्यात येते.
    4 कार्यक्रमा मध्ये विस्तृत माहिती मिळणाऱ्या लाभाची  माहिती रुपये १२००००/- (अक्षरी रुपये एक लाख वीस हजार मात्र) घरकुल बांधकाम करण्यासाठी शासनामार्फत अदा करण्यात येते. त्याच प्रमाणे प्रति दिन २४६ रुपये याप्रमाणे ९० दिवसांची मजुरी रुपये २२००००- अक्षरी रुपये बावीराहजार मात्र) मजुरी शासनामार्फत अदा करण्यात येते
    5 अनुदान वाटपाची कार्यपद्धती

    प्रथम हप्ता अनुदान House Sanctioned

    व्दितीय हप्ता अनुदान Plinth Level

    तृतीय हप्ता अनुदान Lintal Level

    6 सक्षम अधिकाऱ्याचे पदनाम चौथा हप्ता / अंतिम हप्ता अनुदान Completed
    7 विनंती अर्जासोबत लागणारे शुल्क निशुल्क
    8 कार्यपद्धती संदर्भात तक्रारी निवारणासाठी गट विकास अधिकारी. पंचायत समिती .नाशिक
    9 संबंधित अधिकाऱ्याचे पदनाम गट विकास अधिकारी. पंचायत समिती . नाशिक
    • प्रधानमंत्री / शबरी / पारधी/ आवास घरकुल योजना पंचायत समिती,नाशिक
    अ.क्र. कार्यक्रमाचे नाव                 शबरी  घरकुल योजना
     

     ) आदिवासी विकास विभागाकडील दिनांक २८ मार्च २०१३ च्या शासननिर्णयान्वये राज्यात अनुसुचित जमाती  पात्र लाभार्थ्यांना घरकुल देणेकरीतशबरी आवास योजनाराबविण्यात येते.

    ) आदिवासी विकास विभागाकडील दिनांक 7 मे २०१6 च्या शासननिर्णयान्वयेपारधी विकास कार्य  क्रमाखालीमंजूर केलेली घरकुले   “शबरी आदिवासी  घरकुल योजनानिकषानुसार बांधणेत येतात.

    ) आदिवासी विकास विभागाकडील दिनांक फेब्रुवारी २०१७  च्या शासननिर्णयान्वये राज्यात आदिम जमाती   विकास कार्यक्रमाखाली पात्र लाभार्थ्यांना घरकुल देणेकरीतशबरी आवास योजनाराबविण्यात येते.

    1 लाभार्थी पात्रते संबंधी अटी व शर्ती ग्रामसभे द्वारे मंजुरी देण्यात आलेले लाभार्थी ज्यांच्याकडे पक्के घर उपलब्ध नाही तसेच यापूर्वी कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
    2 पात्रता ठरविणे साठी आवश्यक असलेली कार्यपद्धती १) लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा. २) कुटुंबात यापूर्वी कोणासही लाभ मिळालेला नसावा ३) लाभार्थ्यांस ग्रामपंचायतीने ग्रामसभेवर मंजुरी देण्यात यावी. ४) स्वतःचे मालकीची मिळकत असावी किंवा संमती पत्र दाखल करण्यात यावे.५) अनुसूचित जमाती संवर्गातील ५% घरकुले अंपग लाभार्थ्यांसाठी राखीव असतात.
    3 लाभ मिळविण्याची कार्यपद्धती आदिवासी विकास विभागा कडील दिनांक १५ मार्च २०१६ रोजीच्या शासननिर्णयान्वये सामाजिक/आर्थिक जात सर्वैक्षण  लाभार्थी निवड निकष निश्चित करण्यात येउुन पात्र लाभार्थीना त्यांच्या ग्रामपंचायतीस प्राप्त उद्दिष्ट्याप्रमाणे ग्रामपंचायत निहाय प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर प्राप्त झाल्यानंतर गट विकास अधिकारी यांचेमार्फत अंतिम मंजुरीसाठी जिल्हास्तरीय सिमितीकडे पाठविण्यात येते.
    4 कार्यक्रमा मध्ये विस्तृत माहिती मिळणाऱ्या लाभाची माहिती रुपये १२००००/- (अक्षरी रुपये एक लाख वीस हजार मात्र) घरकुल बांधकाम करण्यासाठी शासनामार्फत अदा करण्यात येते. त्याच प्रमाणे प्रति दिन २४६ रुपये याप्रमाणे ९० दिवसांची मजुरी रुपये २२००००- अक्षरी रुपये बावीराहजार मात्र) मजुरी शासनामार्फत अदा करण्यात येते
    5 अनुदान वाटपाची कार्यपद्धती

    प्रथम हप्ता अनुदान House Sanctioned

    व्दितीय हप्ता अनुदान Plinth Level

    तृतीय हप्ता अनुदान Lintal Level

    6 सक्षम अधिकाऱ्याचे पदनाम चौथा हप्ता / अंतिम हप्ता अनुदान Completed
    7 विनंती अर्जासोबत लागणारे शुल्क निशुल्क
    8 कार्यपद्धती संदर्भात तक्रारी निवारणासाठी गट विकास अधिकारी. पंचायत समिती .नाशिक
    9 संबंधित अधिकाऱ्याचे पदनाम गट विकास अधिकारी. पंचायत समिती . नाशिक
    • प्रधानमंत्री / आदिम आवास घरकुल योजना पंचायत समिती,नाशिक
    अ.क्र. कार्यक्रमाचे नाव                 आदिम  घरकुल योजना
       आदिवासी विकास विभागाकडील दिनांक फेब्रुवारी २०१७  च्या शासननिर्णयान्वये राज्यात आदिम जमाती   विकास कार्यक्रमाखाली पात्र लाभार्थ्यांना घरकुल देणेकरीत “आदिम आवास योजनाराबविण्यात येते.
      1 योजनेचा उद्देश राज्यातील कातकरी/माडिया गोंड व कोलाम जमातीसाठी घरकुल योजना
      2 पात्रता ठरविणे साठी आवश्यक असलेली कार्यपद्धती १) लाभार्थी आदिम  जमातीचा असावा. २) कुटुंबात यापूर्वी कोणासही लाभ मिळालेला नसावा. ३) लाभार्थ्यांस ग्रामपंचायतीने ग्रामसभेवर मंजुरी देण्यात यावी. ४) स्वतःचे मालकीची मिळकत असावी किंवा संमती पत्र दाखल करण्यात यावे.५) आदिम जमाती संवर्गातील ५% घरकुले अंपग लाभार्थ्यांसाठी राखीव असतात.
     3 लाभ मिळविण्याची कार्यपद्धती आदिवासी विकास विभागा कडील दिनांक १५ मार्च २०१६ रोजीच्या शासननिर्णयान्वये सामाजिक/आर्थिक जात सर्वैक्षण  लाभार्थी निवड निकष निश्चित करण्यात येऊन पात्र लाभार्थीना त्यांच्या ग्रामपंचायतीस प्राप्त उद्दिष्ट्याप्रमाणे ग्रामपंचायत निहाय प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर प्राप्त झाल्यानंतर गट विकास अधिकारी यांचेमार्फत अंतिम मंजुरीसाठी जिल्हास्तरीय सिमितीकडे पाठविण्यात येते.
    4 कार्यक्रमा मध्ये विस्तृत माहिती मिळणाऱ्या लाभाची माहिती घरकुल बांधकामाकरीता साधारण क्षेत्रात रुपये १२००००/- (अक्षरी रुपये एक लाख वीस हजार मात्र)  व नक्षलग्रस्त/ डोंगराळ लाभार्थ्यांना १३००००/- प्रति लाभार्थी अर्थसहाय्य अनुज्ञेय आहे.
    5 विनंती अर्जासोबत लागणारे शुल्क निशुल्क
    6 कार्यपद्धती संदर्भात तक्रारी निवारणासाठी गट विकास अधिकारी. पंचायत समिती .नाशिक
    7 संबंधित अधिकाऱ्याचे पदनाम गट विकास अधिकारी. पंचायत समिती . नाशिक

     

    ·         महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियान
    अ.क्र. कार्यक्रमाचेनाव अनुदान नियम वअटी कार्यपद्धती
    १) महाराष्ट्रराज्य ग्रामीण जीवनोन्नतीअभियान (MSRLM) खेळतेभांडवल समूहाच्या मूल्यांकनानुसार- १.समूहकिमान ३ माहिने जुना असावा गावातील कार्यरत ICRP मार्फत व प्रभाग समन्वयक समुहाचे मुल्यांकन करून प्रस्ताव तालुका कक्षाला मागणी सदर केली जाते.त्या नंतर जिल्हा कक्षावरून थेट समूहाच्या खात्यातनिधी वर्ग केला जातो
      राज्य शासन -१५०००

    २.कागदपत्रे

    गटाचेपासबुक

    आधारकार्डवयक्तिकपासबुक ई.RF मुल्यांकनफार्म

      केंद्रशासन-१५०००  
    समूहांनाकर्ज पुरवठा किमान १लाख कमाल २० लाखापर्यंत १ कर्जमागणी अर्ज गावातीलकार्यरत ICRP मार्फत व प्रभाग समन्वयक समुहाचे मुल्यांकन करून प्रस्ताव तालुका कक्षाला कर्ज मागणी सदर केली जाते.नंतर समुहाचे बँक कर्ज प्रस्ताव पोर्टल वरऑनलाईन केले जातात.व त्यानंतर समूहाच्या ऐपती नुसार बँक समूहाला कर्ज देते
        २.समुहाचेबँक पासबुक
        ३.आधारकार्ड
        ४.वयक्तिकपासबुक
        ५.पासपोर्टसाईझफोटो
        ६.ग्रुपफोटो
        ७.समुहाचेलेखे
    समुदायगुंतवणूक निधी (CIF) समुदायगुंतवणूक निधी-६००००/- सूक्ष्मगुंतवणूक आराखडा (MIP) ग्राम संघातून ६ महिने जुन्या समुहाचे सूक्ष्म गुंतवणूक आराखडा तयार केला जातो.संबंधित समूह ग्राम संघाकडे CIF निधी मागणी आर्ज करतो .ग्राम संघाची MIP उपसमिती मागणी प्रस्ताव तपासून ग्राम संघाच्या मासिक सभेत मान्यते साठी ठेवते.ग्राम संघाची मान्यता मिळाल्यावर सदर ग्राम संघ प्रभाग संघास मागणी सादरकरतो.प्रभाग संघाच्या मासिक सभेत मंजुरी मिळाल्यावर तालुका अभियान कक्षाकडेमागणी सादर केली जाते.नंतर तालुका कक्षातून ऑनलाईन पद्धतीने CIF मागणी जिल्हा कक्षाला सादर केली जाते.जिल्हा कक्ष प्रभाग संघाच्या बँक खात्यात निधी वर्गकरतो.त्यानंतर प्रभाग संघ संबंधित ग्राम संघाच्या बँक खात्यात निधी वर्गकरतो.ग्राम संघातून समूहाला व समुहातून समूह सदस्याला निधी वर्ग केला जातो.

     

     

    • पशुसंवर्धन विभाग योजना, पंचायत समिती,नाशिक
    1. योजनेचे नावराज्य स्तरीय नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत राज्यातील ग्रामीण
    2. भागात दुध उत्पादनास चालना देण्यासाठी दुधाळदेशी / दुधाळ संकरीत गायी/ म्हशींचे गट वाटप करणे
    • लाभार्थी प्राधान्य :महिला बचत गटातील लाभार्थी,अल्पभूधारक, सुशिक्षित बेरोजगार
    • लाभ :-२दुधाळदेशी /२ दुधाळसंकरीत गायी / २म्हशींचे ,सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थीना गटाच्या किंमतीच्या ५० टक्केआणिअनुसूचित जाती वजमातींच्या लाभार्थीना गटाच्या किंमतीच्या ७५टक्के अनुदान,
    • गटकिंमत:-रु.७०,०००/-प्रती गाय, रु.८०,०००/-प्रती म्हैस २दुधाळ देशी /२ दुधाळ संकरीत गायी-रु. १५६८५०/-२म्हशींचा गटरु.१७९२५८/-

     

    1. योजनेचे नावराज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत अंशत: ठाणबद्ध पद्धतीने शेळी /मेंढीपालनाव्दारे शेतकयांना पूरक उत्पन्न मिळवून देणे.
    • योजनाकालावधी :२०११तेआजपर्यंत, २५.०५.२०२१पासून सुधारित स्वरुपात
    • लाभार्थीप्राधान्यदारिद्र्यरेषेखालील, अत्यल्पभूधारक, अल्पभूधारक,सुशिक्षित बेरोजगार,महिला बचतगटातील लाभार्थी
    • लाभ१०शेळ्या/ मेंढ्या व १ बोकड/ नर मेंढायांचे गट वाटप, सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थीना गटाच्या किंमतीच्या ५० टक्के आणि अनुसूचित जाती व जमातींच्या लाभार्थीना गटाच्या किंमतीच्या ७५ टक्केअनुदान, उस्मानाबादी /संगमनेरी या जातीच्या शेळ्या व बोकड तसेच मडग्याळ किंवा दख्खनी मेंढ्या अथवा अन्य स्थानिक मेंढ्या गटांचे वाटप करण्यात येते.
    • गटकिंमत:-उस्मानाबादी/ संगमनेरी शेळी रु.१०३५४५/-,स्थानिक शेळी रु.७८२३१/-,मडग्याळ मेंढ्या रु.१२८८५०/-, दख्खनी व स्थानिक मेंढ्यारु.१०३५४५/-

     

    1. योजनेचे नाव१०००मांसल कुक्कुट पक्षी संगोपानाद्वारे कुक्कुट पालन व्यवसायसुरु करणे
    • योजना कालावधी : २०१३ ते आजपर्यंत
    • लाभार्थी प्राधान्य:अत्यल्प भूधारक, अल्प भूधारक,सुशिक्षित बेरोजगार, महिला बचत गट किंवा उपरोक्त तीन मधील वैयक्तिक महिला लाभार्थी
    • लाभएकूण प्रकल्पाची किंमतरु. २,२५,०००/-, पक्षीगृह (१०००चौ.फूट) स्टोररूम,पाण्याची टाकी,निवासाची सोय,विद्युतीकरण इ.साठी एकूण किंमत रु. २,००,०००/-तर उपकरणे, खाद्याची /पाण्याची भांडी, ब्रुडर इ.बाबत रक्कमरु. २५,०००/-सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थीना गट किंमतीच्या ५० टक्के आणि अनुसूचित जाती व जमातींच्या लाभार्थीना प्रकल्प किंमतीच्या ७५ टक्के अनुदान

     

     

    1. योजनेचे नाव: जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत अनु .जाती उपयोजना (विघयो)/आदिवासी उपयोजना/आदिवासि क्षेत्राबाहेरील उपयोजना अंतर्गत दुभत्यागाई /म्हशी गट वाटप करणे
    • योजना कालावधी : २०११ते आजपर्यंत, २७.०४.२०२३पासून सुधारती स्वरुपात
    • लाभार्थी प्राधान्य: दारिद्र्य रेषेखालील, अत्यल्प भूधारक, अल्पभूधारक,सुशिक्षित बेरोजगार महिला बचत गटातील लाभार्थी.
    • लाभ-२ दुधाळदेशी / २ दुधाळ संकरीत गायी / २म्हशींचे गट वाटप करणे, अनुसूचित जाती व जमातींच्या लाभार्थीना गटाच्या किंमतीच्या ७५ टक्के अनुदान,
    • गट किंमत: रु.७०,०००/-प्रतीगाय, रु.८०,०००/-प्रती म्हैस २ दुधाळदेशी /२ दुधाळ संकरीत गायी- रु. १५६८५०/- २म्हशींचा गट रु. १७९२५८/-

     

    1. योजनेचे नावजिल्हा वार्षिक योजने अंतर्गत अनु .जाती उपयोजना (विघयो)/आदिवासी उपयोजना/आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना अंतर्गत अंशतःठाणबंद पद्धतीने १०शेळी +१बोकड / १०मेंढ्या + १नर मेंढा गट वाटप करणे
    • योजना कालावधी :२०११ते आजपर्यंत, २५.०५.२०२१ पासून सुधारित स्वरुपात
    • लाभार्थी प्राधान्य -दारिद्र्य रेषे खालील, अत्यल्पभूधारक, अल्पभूधारक, सुशिक्षित बेरोजगार,महिला बचत गटातील लाभार्थी
    • लाभ१० शेळ्या/मेंढ्या व १ बोकड/ नर मेंढयांचे गट वाटप, अनुसूचित जाती व जमातींच्या लाभार्थीना गटाच्या किंमतीच्या ७५ टक्के अनुदान,उस्मानाबादी/संगमनेरी या जातीच्या शेळ्या व बोकड तसेच माडग्याळ किंवा दख्खनी मेंढ्या अथवा अन्य स्थानिक, स्थानीक यांचे गटांचे वाटप करण्यात येते.
    • गटकिंमत:-उस्मानाबादी / संगमनेरी शेळी रु.१०३५४५/- स्थानिक शेळी रु.७८२३१/-,माडग्याळ मेंढ्या रु.१२८८५०/-दख्खनी व स्थानिक मेंढ्या रु.१०३५४५/-

     

    1. योजनेचे नाव :जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजने अंतर्गत एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम: १०० एक दिवसीय पिल्ले वाटप
    • योजना कालावधी :-२०१०तेआजपर्यंत, २०.०१.२०२३पासून सुधारित स्वरुपात
    • लाभार्थीप्राधान्य – दारिद्र्य रेषेखालील, भूमिहीन शेतमजूर, मागासवर्गीय, अल्प व अत्यल्प भूधारक
    • लाभसर्व प्रवर्गांसाठी ५०% अनुदान, एकदिवसीय १०० पिल्ले वाटप गट किंमतरु.२९,५००/-

     

    1. योजनेचे नाव : जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजने अंतर्गत एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम: २५+ तलंग गट वाटप
    • योजना कालावधी: २०१०तेआजपर्यंत, २०.०१.२०२३पासून सुधारित स्वरुपात
    • लाभार्थी प्राधान्य – दारिद्र्य रेषेखालील, भूमिहीन शेतमजूर, मागासवर्गीय, अल्प व अत्यल्प भूधारक
    • लाभसर्व प्रवर्गांसाठी ५०% अनुदान, २५ + ३तलंगा गट वाटप -गट किंमत रु.१०,८४०/-A

     

    • तालुका आरोग्य विभाग पंचायत समिती नाशिक

    आरोग्य विभागाशी संबंधित योजना :

    • कुटुंब नियोजन: या योजनेत, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर महिला आणि पुरुषांच्या टीएल शस्त्रक्रिया केल्या जातात. यामध्ये महिला लाभार्थ्यांना (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील) रु.६००/-, इतर सामान्य लाभार्थ्यांना रु.२५०/- आणि पुरुष लाभार्थ्यांना रु.१५००/- मानधन म्हणून दिले जाते.

    २)     आयुष्मान भारत: या योजनेअंतर्गत, आशा स्वयंसेविका मार्फत गाव पातळीवरील सर्व लोकांना आयुष्मान कार्ड दिले जातात. या योजनेअंतर्गत जर तुम्ही खाजगी रुग्णालयात उपचार घेतले तर तुम्हाला ५,००,०००/- रुपये दिले जातात आणि औषधोपचार आणि शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात.

    ३)मातृत्व अनुदान योजना: ही योजना आदिवासी भागात राबविली जाते, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील इतर श्रेणीतील गर्भवती मातांना रु. ४००/- मानधन दिले जाते.

    ४)जननी सुरक्षा योजना: या योजनेअंतर्गत ज्या गर्भवती मातांची प्रसूती संस्थात्मक आहे त्यांना ७००/- रुपये आणि ज्यांची प्रसूती घरी आहे त्यांना ५००/- रुपये अनुदान दिले जाते.

    एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नाशिक

    नाविन्यपूर्ण उपक्रम

    अ.क्र. नाविन्यपूर्ण संकल्पना                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                            राबविलेले उपक्रम
    टाकाऊ पासून टिकाऊ THR च्या रिकाम्या गोन्यांपासून बालकाच्या नावाने स्वतंत्र पिशवी तयार करणे
    बाहुली घर सामाजिक भावनेचा विकास
    बाल कोपरा कमी वजनाच्या बालकांच्या वजनवाढी साठी प्रयत्न
    स्तनपाना बाबत प्रशिक्षण IIT चे प्रशिक्षण व्हिडीओ दाखून मार्गदर्शन करणे
    परसबाग परसबागेद्वारे शेवगा भाजीपाला लाऊन पोषण आहारात वापर करणे
    स्त्री जन्माचे स्वागत स्त्री जन्म वृद्धीसाठी मुलगी जन्माला आलेल्या मातेचे स्वागत करणे,कौतुक करणे
    आहार प्रशिक्षण THR पासून आहाराचे प्रशिक्षण करून दाखविणे
    पाक कृती प्रदर्शन पाक कृती प्रदर्शनाद्वारे विविध रानभाज्यांचे महत्व पटवून देणे

     

    अनुक्रमांक शीर्षक वर्णन डाउनलोड
    1 माहितीचा अधिकार अधिनियम २००५, कलम ४ नुसार १ ते १७ मुद्यांची माहिती. माहितीचा अधिकार अधिनियम २००५, कलम ४ नुसार १ ते १७ मुद्यांची माहिती-पंचायत समिती, नाशिक (पहा/डाउनलोड करा)

    ई मेल आईडी: bdonashik@gmail.com

    पंचायत समिती यांचे संपर्क क्रमांक: (0253-2578423)