बंद

    योजना

    • सरोज जगताप
      श्रीमती सरोज आधार जगताप

      शिक्षणाधिकारी (योजना)

      (संपर्क क्र. ९४२२७५१५७७)

    नाशिक जिल्हा शिक्षाणाच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती साधत आहे. सर्व स्तरांवर शिक्षणाची उपलब्धता वाढली असून गुणवत्तापूर्ण शिक्षण व तांत्रिक शिक्षणावर भर दिला जात आहे. सरकारी योजना व शासकीय तसेच खाजगी संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नातुन शैक्षणिक विकासाची गती वाढली आहे. मुलींच्या शिक्षणाप्रती विशेष लक्ष देवून साक्षरतेचा स्तर अधिकाधिक सुधारला जात आहे. यामुळे नाशिक महाराष्ट्रातील शैक्षणिक दृष्टिकोनातुन उन्नत जिल्हांपैकी एक मानला आहे.

    नाशिक जिल्हातील विविध शासकीय व स्वयंप्रेरित योजना विद्यार्थ्यांना शिक्षणात सहकार्य देण्यासाठी राबवल्या जात आहेत. योजना अंतर्गत विद्यार्थी लाभाचा योजना , शालेय पोषण आहार, मोफत शालेय साहित्य, एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती योजना, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रि.मॅट्रीक शिष्यवृत्ती, राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, भारत सरकारची संस्कृत विषयाची योजना,  राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान, योजना, सर्वांना मोफत शिक्षण तसेच अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी व विद्यार्थींनीसाठी मराठी भाषा फाऊंडेशन योजना, बेगम हजरत महल शिष्यवृत्ती  इत्त्यादी. केंद्र व राज्यशासनाच्या विविध योजना दिल्या जातात. यामुळे शैक्षणिक साक्षरता सूधारत असून , सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकांच्या विद्यार्थ्यांनाही शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होत आहे.

    विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना

    • राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती योजना
    • राष्ट्रीय भारतीय सैनिक महाविद्यालय डेहराडून येथील सरकारी शिष्यवृत्ती
    • उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना (इ. 5 वी व इ. 8 वी शिष्यवृत्ती योजना)
    • धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी असलेली केंद्र्पुरस्कृत मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना.
    • धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थीनीसाठी बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना
    • दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना
    • कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या शासकीय खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना
    • आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना
    • संस्कृत शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना भारत सरकाराच्या शिष्यवृत्त्या
    • मराठी भाषा फाऊंडेशन योजना
    • 12 व्या पंचवार्षिक योजनेत केंद्र पुरस्कृत बहु क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत मान्यता प्राप्त राज्यातील संबंधित 09 जिल्ह्यातील 08 गट व 06 शहराकरिता सायबर ग्राम योजना
    • प्राथमिक शाळेतील पुस्तकपेढी योजना
    • माध्यमिक पुस्तकपेढी योजना
    • राज्यातील शैक्षणिकदृष्ट्रया मागासलेल्या 103 विकास गटांतील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांमधील् इयत्ता 1 ली ते 4 थी मधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके
    • जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांना विशेष सुविधा (मोफत गणवेश व लेखन साहित्य)
    • राज्यातील शैक्षणिकदृष्ट्रया मागासलेल्या 120 विकास गटांतील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांमधील इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व लेखन साहित्य पुरवठा करणे.
    • इयत्ता 1 ली ते 4 थी मधील प्राथमिक शाळेत शिकणा-या मुलींना उपस्थिती भत्ता (योजनेतर योजना)
    • जिल्हा बालभवन योजना (योजनेतर योजना).
    • माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती (योजनेतर योजना).
    • स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती (योजनेतर योजना).
    • प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना विहीत आर्थिक दराने मदत करणे.
    • राज्यातील अनुदानित / उच्च माध्यमिक शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या सर्व स्तरावर (इ. 1 ली ते पदव्युत्तर स्तर) विहित्व दराने शैक्षणिक अर्थसहाय्य.
    • इयत्ता 10 वी पर्यंतचे सर्वांना मोफत शिक्षण .
    • इयत्ता 11 वी, 12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण.
    • ज्यांचे किंवा ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एउपये 100000 पेक्षा अधिक नाही. अशा इ. 11 वी व 12 वी मध्ये शिकत आहे अशा विद्यार्थ्यांना फी माफी (योजनेतर योजना)
    • आदिवासी विद्यार्थ्यांना विद्यावेतन
    • मा. पंतप्रधान व मा. मुख्यमंत्री यांनी घोषित केलेले विशेष पॅकेज अंमलबजावणी विदर्भातील शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांतर्गत द्यावयाचा शैक्षणिक सवल्टी.
    • टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी/ प्रतीपूर्ती.
    • राजीव गांधी विद्यार्थी सानुग्रह अनुदान योजना .
    • अल्पसंख्यांक समाजाच्या संस्था/ शाळांसाठी पायाभूत विकास योजना.
    • मदरसांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे योजना.
    • अल्पसंख्यांक समाजाच्या संस्था/ मदरसांकरिता शिक्षण देणेबाबत योजना.
    • केंद्रपुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रम.

     

     गणेश मंडळांना प्रत्येकी ५० प्रौढांना साक्षर करण्याचे लक्ष्य नवभारत साक्षरता कार्यक्रम

    गणरायापुढे भरणार वर्ग लोकमत न्यूज नेटवर्क दिवसातच आगमन होणार आहे. याच भक्ती सोहळ्यात प्रौढ निरक्षरांना साक्षरतेचे धडे 68 नाशिक : लाडक्या गणरायाचे दोन देण्यासाठी गावोगावच्या गणेशोत्सव मंडळांना ‘टार्गेट’ दिले जाणार आहे. एका मंडळाने किमान ५० प्रौढांना साक्षर करावे, असे नियोजन राज्याच्या हजार १५२ असाक्षरांना परीक्षेला बसवायचे टाट. योजना शिक्षण संचालनालयाने केले असून, त्याबाबत सर्व योजना जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आली आहेत.

    पत्रात म्हटले आहे की, गणेश मंडळांच्या सदस्यांनी गावातील प्रौढ निरक्षरांची नोंद घ्यावी. तसेच साक्षरता कार्यक्रमाचे स्वयंसेवक म्हणून या प्रौढांना साक्षरतेचे धडे द्यावेत, गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्र उत्सवातही हा उपक्रम राबविला जावा, अशी अपेक्षा गणेश मंडळांनी हे करावे… उत्सव काळात साक्षरतेचे बॅनर मंडळा- भोवतीलावावेत. साक्षरतेवर आधारित देखावे साकारावेत. साक्षरतेशी संबंधित रांगोळी,चित्रकला, गायन स्पर्धा घ्याव्यात. नवसाक्षरांच्या मुलाखती घ्याव्यात. भाविकांमध्ये साक्षरता कार्यक्रमाच्या पत्रकाचे वाटप करावे. आहे. २७ ऑगस्टला गणेशाची प्रतिष्ठापना होणार आहे. या उत्सवात ‘उल्लास नवभारत साक्षरता’ कार्यक्रमाचा प्रचार, प्रसार मंडळामार्फत करणे शक्य आहे. गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळांनी साक्षरतेच्या थीमवर देखाव्यासह उपक्रम घ्यावेत, असे आवाहन केले आहे. राज्यातील असाक्षरतेचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.

    तसेच यंदाच्या गणेशोत्सवापासूनच या उपक्रमाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. प्रौढ शिक्षणाऐवजी ‘सर्वांसाठी शिक्षण अशी संज्ञा आता वापरली जात आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी शालेय शिक्षण विभागाच्या सहकार्याची तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या कृतियुक्त सहभागाची आवश्यकता आहे. सरोज जगताप, शिक्षणाधिकारी योजना, जिल्हा परिषद नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान शासकीय आकडेवारीनुसार राज्यात १कोटी ६३ लाख प्रौढ निरक्षर आहेत. त्यातील १२ लाख ४० हजार निरक्षरांना मागील वर्षात साक्षर करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, ४ लाख ५ हजार निरक्षर परीक्षेला बसले. त्यातील ४ लाख २५ हजार उत्तीर्ण • झाले. आता २०२४-२५ या व उर्वरित म्हणजेच आठ लाख निरक्षराज साक्षरता परीक्षेसाठी नोंदणीचे टार्गेट केंद्राने महाराष्ट्राला दिले आहे. गणेशोत्सवासहनवरात्रोत्सवाचा आधारघेतला जाणार आहे.जिल्ह्यात यावर्षीचे ३२,७३६ आणि मागील वर्षीचे १२,४१६ असे ४५,१५२ असाक्षरांना परीक्षेला बसवायचे टार्गेट आहे.

     

     

     

    प्रस्तावना
    माहितीचा अधिकार अधिनियम–२००५ या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे शासकीय / निमशासकीय यंत्रणांवर चांगले नियंत्रण आले आहे. तसेच या कायद्यामुळे शासकीय कामकाज कसे होत आहे, शासनाच्या जनकल्याणाच्या विविध योजनांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते, त्यातील विविध स्तरावरील टप्पे / प्रक्रिया याचीही माहिती सर्व सामान्य जनतेला खुली होणार आहे. तसेच शासनाचा कारभार जसजसा पारदर्शक होत जाईल तसतशी जनतेच्या मनातील संदिग्धता कमी होत जाईल. तसेच दप्तर दिरंगाई आणि भ्रष्टाचार यालाही आपोआपच आळा बसेल.

    या अधिकारात खालील बाबींचा समावेश आहे:
    • काम, कागदपत्रे, नोंदी यांची तपासणी करणे.
    • कागदपत्रे किंवा नोंदी यांच्या प्रमाणित प्रती मिळवणे तसेच त्यांची टिपणे काढणे.
    • साहित्याच्या प्रमाणित प्रती मिळवणे.
    • माहिती छापील प्रत (प्रिंटआऊटस्), सीडी, फ्लॉपी, टेप्स, व्हिडिओ रेकॉर्डस् किंवा इतर कोणत्याही ईलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मिळवणे.

     

    • माहिती अधिकार अधिनियम, 2005 चे कलम 4 (ख) नुसार 1 ते17 मुद्यांची माहिती.  (पहा/डाउनलोड करा)

                                            संपर्क

    • ई मेल आयडीeoschemenashik@gmail.com
    • शिक्षणाधिकारी (योजना) यांचा संपर्क क्रमांक– 9422751577
    • उपशिक्षणाधिकारी यांचा संपर्क क्रमांक- 9423786876
    • सहाय्यक योजना अधिकारी यांचा संपर्क क्रमांक- 9623395355
    • लघुलेखक यांचा संपर्क क्रमांक- 9422571011