बंद

    लघु पाटबंधारे विभाग

    • WhatsApp Image 2025-04-01 at 13.24.42_fb1eb6e1
      श्रीमती वैशाली तुळशीराम ठाकरे

      जिल्हा जलसंधारण अधिकारी

      (संपर्क क्र. ९४२२७०२६८०)

    शासनाच्या धोरणानुसार सन 1972 मध्ये जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाची वेगळयाने स्थापना करण्यात आली. स्थानिक स्तरीय 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षमतेपर्यतच्या अप्रत्यक्षसिंचन योजना जसे सिमेंट काँक्रीट बंधारे , पाझर तलाव, गाव तलाव तसेच कोल्हापुरी पध्दतीचे बंधारे, या कामांचे सर्वेक्षण होवून तांत्रिक व आर्थिक दृष्टया सफल अंदाजपत्रकानुसार त्या कामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी या विभागामार्फत करण्यात येते. जिल्हयाचे भौगोलिक परिस्थितीचा विचार करता पाझर तलाव, गाव तलाव, साठवण बंधारे व इतर स्थानिक स्तरीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी मोठा वाव आहे. अशा प्रकारच्या कामांच्या सर्वेक्षणाची कामे हाती घेण्यात येतात.

                                                                नियंत्रणाची साखळी

    अ क्र विभागाचे नाव संकलनाचे नाव संचिका / नस्ती मान्यतेस्तव सादर करावयाचे स्तर
    1 ला स्तर 2 रा स्तर 3 रा स्तर 4 था स्तर
    1 लघुपाटबंधारे विभाग तांत्रिक 1 जलसंधारण अधिकारी जिल्हा जलसंधारण अधिकारी
    2 लघुपाटबंधारे विभाग तांत्रिक 2 जलसंधारण अधिकारी जिल्हा जलसंधारण अधिकारी
    3 लघुपाटबंधारे विभाग तांत्रिक 3 जलसंधारण अधिकारी जिल्हा जलसंधारण अधिकारी
    4 लघुपाटबंधारे विभाग तांत्रिक 4 जलसंधारण अधिकारी जिल्हा जलसंधारण अधिकारी
    5 लघुपाटबंधारे विभाग लेखा 1 वरिष्ठ सहायक सहा. लेखाधिकारी जिल्हा जलसंधारण अधिकारी
    6 लघुपाटबंधारे विभाग लेखा 2 कनिष्ठ सहायक सहा. लेखाधिकारी जिल्हा जलसंधारण अधिकारी
    7 लघुपाटबंधारे विभाग लेखा 3 कनिष्ठ सहायक सहा. लेखाधिकारी जिल्हा जलसंधारण अधिकारी
    8 लघुपाटबंधारे विभाग बजेट वरिष्ठ सहायक लेखा सहा. लेखाधिकारी जिल्हा जलसंधारण अधिकारी
    9 लघुपाटबंधारे विभाग आस्था कनिष्ठ सहायक कनिष्ठ प्रशासन अधिकारी सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी जिल्हा जलसंधारण अधिकारी

                                         लघुपाटबंधारे विभाग, नाशिक जिल्हा परिषद, नाशिक.

    1.ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील शासन निर्णय आस्थाप-2016/प्र.क्र.88 (भाग-9)/जल-2 दिनांक 31 मे, 2017 नुसार मृद व जलसंधारण विभागाची निर्मीती आणि आकृतीबंध मंजुर करण्यात आला आहे.

    2.मृद व जलसंधारण विभागाकडील शासन निर्णय आस्थाप-2022/प्र.क्र.140/जल-2 दिनांक 28 जुन, 2022 नुसार जिल्हा परिषदा अंतर्गत उपविभागांची निर्मीती करण्यात आली आहे.

    जिल्हा जलसंधारण अधिकारी, लघुपाटबंधारे विभाग जिल्हा परिषद नाशिक
    जिल्हा स्तरावरील रचना उपविभागीय स्तरावरील रचना
    पदनाम मंजुर पदांची संख्या जिल्हा परिषद ल.पा. उपविभाग अंतर्गत तालुके / कार्यक्षेत्र पदनाम मंजुर पदांची संख्या
    1.जिल्हा जलसंधारण अधिकारी (कार्यालय प्रमुख) 1 1.मालेगाव मालेगाव, नांदगाव 1.उपविभागीय जलसंधारण अधिकारी, (कार्यालय प्रमुख) 1
    2.सहा. जिल्हा जलसंधारण अधिकारी 1 2.येवला येवला 2.जलसंधारण अधिकारी / कनिष्ठ अभियंता 5
    3.जलसंधारण अधिकारी / कनिष्ठ अभियंता 4 3.दिंडोरी दिेंडोरी, पेठ 3.स्था. अभियांत्रिकी सहायक 1
    4.अधिक्षक (कनिष्ठ प्रशासन अधिकारी) 1 4.कळवण सुरगाणा, कळवण 4.वरिष्ठ लिपीक 1
    5.विभागीय लेखापाल (सहा.लेखाअधिकारी) 1 5.इगतपुरी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर 5.कनिष्ठ लिपीक 2
    6.वरिष्ठ सहायक लेखा 1 6.सटाणा सटाणा, देवळा 6.अनुरेखक 1
    7.वरिष्ठ सहायक 1 7.नाशिक नाशिक, सिन्नर 7.वाहनचालक 1
    8.कनिष्ठ लिपीक 3 8.निफाड निफाड 8.परिचर-शिपाई 2
    9.आरेखक 1 9.चांदवड चांदवड 9.परिचर-चौकीदार 1
    10.कनि. आरेखक 1 जिल्हा जलसंधारण अधिकारी, सहा. जिल्हा जलसंधारण अधिकारी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, जलसंधारण अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, आरेखक आणि कनि. आरेखक यांची नियुक्ती मृद व जलसंधारण विभागामार्फत केली जाते. व जिल्हा परिषदेत प्रतिनियुक्तीने दिले जातात.
    11.वाहनचालक 1
    12.परिचर-शिपाई 2
    13.परिचर-चौकीदार 1
    • योजना
    • योजनेचा उददेश
    • पाझर तलाव व गावतलाव बांधणे
    योजनेचा उददेश – वाहुन जाणारे पाणी मातीचा भराव टाकून अडविणे व त्यायोगे जमिनीत मुरवणे. त्यामुळे तलावाच्या खालील बाजुच्या विहिरीच्या पाण्याची पातळी वाढते. काही तलावात सहा महिन्यांपेक्षा जास्त पाणी असलेने तलावात मासेमारी व्यवसायाव्दारे उत्पन्न व स्थानिक लोकांना रोजगार निर्मीती होते. पाझर तलावातील पाणी पाझरुन भुगर्भातील जलस्तर वाढण्यास मदत होते. त्यामुळे तलावाखालील विहिरींची पाणीपातळी वाढण्यास मदत होते. पाझर तलावामुळे होणारे सिंचन हे अप्रत्यक्ष सिंचन असते. योजनेचे निकष – स्थानिक नाला असावा. त्याच्या वरील बाजूस साधारण बशीसारखी भूरचना असल्यास पाणीसाठा होतो. नाला फार मोठा नसावा. अन्यथा सांडव्याचा खर्च वाढून योजना मापदंडाच्या बाहेर जाते. योजनेसाठी शासनाने आर्थिक मापदंड निश्चित केलेला असून तो पुढीलप्रमाणे आहे. अ सर्वसाधारण क्षेत्र – 162768/- ब डोंगरी क्षेत्र व अवर्षण प्रवण क्षेत्र – 162768/- योजनेची कार्यपध्दती – एखादे ठिकाणी तलावासाठी योग्य जागा ग्रामस्थांना आढळल्यास ग्रामपंचायतीमार्फत जिल्हा परिषदेकडे तलावाची मागणी केली जाते. मागणी प्राप्त झाल्यानंतर प्रस्तावित जागेची पाहणी केली जाते. जागा योग्य आढळल्यास सखोल सर्वेक्षण करुन त्याप्रमाणे अंदाजपत्रक तयार केले जाते व मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे सादर केले जाते. जिल्हा परिषदेकडे अंदाजपत्रक प्राप्त झाल्यानंतर निधीच्या उपलब्धतेनुसार आराखडयास मा.जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची मंजुरी घेणेत येते व त्यानुसार सक्षम प्राधिका-याची प्रशासकिय मान्यता घेण्यात येते.
    • साठवण बंधारे

    योजनेचा उददेश – ज्या ठिकाणी भुस्तर पायासाठी पक्या खडकाचा आहे त्याठिकाणी शक्यतो 1.50 ते 3.00 मी उंची पर्यंत काँक्रिटचा बांध घालून पाणी अडविले जाते. त्यामुळे लाभ क्षेत्रातील लाभधारक शेतक-यांना जलसिंचनाचा लाभ घेता येतो. योजनेचे निकष – पाणी साठविल्यानंतर लाभ धारकांना शेतीच्या सिंचनासाठी बंधा-यातील पाणी अप्रत्यक्ष सिंचनाव्दारे घेता येईल; अशा ठिकाणी साठवण बंधारा प्रस्तावित केला जातो. योजनेसाठी शासनाने आर्थिक मापदंड निश्चित केलेला असून तो पुढीलप्रमाणे आहे. अ सर्वसाधारण क्षेत्र – 138324/- ब डोंगरी क्षेत्र व अवर्षण प्रवण क्षेत्र – 178810/- योजनेची कार्यपध्दती – एखादे ठिकाणी तलावासाठी योग्य जागा ग्रामस्थांना आढळल्यास ग्रामपंचायतीमार्फत जिल्हा परिषदेकडे तलावाची मागणी केली जाते. मागणी प्राप्त झाल्यानंतर प्रस्तावित जागेची पाहणी केली जाते. जागा योग्य आढळल्यास सखोल सर्वेक्षण करुन त्याप्रमाणे अंदाजपत्रक तयार केले जाते व मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे सादर केले जाते. जिल्हा परिषदेकडे अंदाजपत्रक प्राप्त झाल्यानंतर निधीच्या उपलब्धतेनुसार आराखडयास मा.जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची मंजुरी घेणेत येते व त्यानुसार सक्षम प्राधिका-याची प्रशासकिय मान्यता घेण्यात येते.

     

    • विहिर /गाव तलाव/ पाझर तलाव/ पारंपारिक पाणीसाठी तलावातील गाळ काढणे
    यामध्ये पाणी साठयाचे खालील प्रकार अनुज्ञेय आहेत. 1) सर्वतलाव (लघुपाटबंधारे / पाझ्ररतलाव / पारंपारिकतलाव). 2) सर्वबंधारे. (यामध्येपिण्याच्यापाण्याच्याविहीरीलाप्राधान्यदयावे.) जिल्हापरिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतीयांच्या मालकीची तसेच खाजगी मालकीच्या विहीरीतील गाळ काढण्यास अनुमती आहे. एकाच हंगामामध्ये पावसाळा सुरु होणे पूर्वी गाळ काढणेचा आहे. गाळ काढणेचे कामपूर्णत: अकुशलस्वरुपाचे असून अंदाजपत्रकात कोणत्याही कुशल कामाचा समावेश करु नये.
    • कोल्हापूर पध्दतीचे बंधारे
    योजनेचा उददेश – ज्या ठिकाणी भुस्तर पायासाठी पक्या खडकाचा आहे त्याठिकाणी शक्यतो 1.50 ते 3.00 मी उंची पर्यंत काँक्रिटचा बांध घालून पाणी अडविले जाते. त्यामुळे लाभ क्षेत्रातील लाभधारक शेतक-यांना जलसिंचनाचा लाभ घेता येतो. योजनेचे निकष – ज्या ठिकाणी बंधा-यातील पाणी साठविल्यानंतर लाभ धारकांना शेतीच्या सिंचनासाठी बंधा-यातील साठलेले पाणी पाटाव्दारे किंवा ग्रॉव्हिटी व्दारे घेता येत नाही अशा ठिकाणी को.प.बंधारे घेऊन त्याव्दारे उपसासिंचनाचे माध्यमातुन पाणी उचलून क्षेत्र ओलिताखाली आणले जाते. योजनेसाठी शासनाने आर्थिक मापदंड निश्चित केलेला असून तो पुढीलप्रमाणे आहे. अ सर्वसाधारण क्षेत्र – 138324/- ब डोंगरी क्षेत्र व अवर्षण प्रवण क्षेत्र – 178810/- योजनेची कार्यपध्दती – एखादे ठिकाणी तलावासाठी योग्य जागा ग्रामस्थांना आढळल्यास ग्रामपंचायतीमार्फत जिल्हा परिषदेकडे तलावाची मागणी केली जाते. मागणी प्राप्त झाल्यानंतर प्रस्तावित जागेची पाहणी केली जाते. जागा योग्य आढळल्यास सखोल सर्वेक्षण करुन त्याप्रमाणे अंदाजपत्रक तयार केले जाते व मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे सादर केले जाते. जिल्हा परिषदेकडे अंदाजपत्रक प्राप्त झाल्यानंतर निधीच्या उपलब्धतेनुसार आराखडयास मा.जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची मंजुरी घेणेत येते व त्यानुसार सक्षम प्राधिका-याची प्रशासकिय मान्यता घेण्यात येते.
    • झरा तलाव, बंधाऱ्यातील गाळ काढणे. 
    योजनेचा उद्देश 1 पावसाचे पाणी अडविणे – भूपृष्ठीय पाणी साठवण Surface water storage व भूजल पुनर्भरण करणे. 2 भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण करणे – गाळ काढल्यामुळे उपलब्ध होणा-या पाणीसाठयामुळे पुनर्भरणासाठी अतिरिक्त पाणी व अवधी Retention period मिळाल्याने परिसरातील भूजल पातळीत वाढ करणे. पर्यायाने त्या परिसरात मान्सूनोत्तर काळात अधिक कालावधीपर्यंत भूजल उपलब्ध करणे. 3 नाला पात्रामध्ये गाळ साचलेने नाल्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी होते व पुरस्थितीत प्रवाहाचे पाणी मुळ नाला पात्राबाहेरील भागात पसरुन लगतच्या शेतातील मातीचा सुपीक थर वाहुन जातो. गाळ काढून या समस्येचे निराकरण करणे. 4 गावांमधील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण करणे. 5 अशा ल.पा. योजना पुनर्जिवित करून त्या परिसरात नव्याने बंधारे बांधणेचा खर्च वाचविणे. 6 ग्रामीण भागातील लोकांचे उदर्निर्वाह मध्ये परिवर्तन घडवून आणणे. योजनेची कार्यपध्दती :- 0 ते 100 हे. सिंचनक्षमता असलेल्या पाझर तलाव/गावतलाव /को.प./साठवण/ वळण बंधारा यातील गाळ काढणे प्रक्रिया ही लोकसहभाग, सीएसआर, एनजिओ मार्फत करणेबाबत शासनाचे निर्देश आहेत. गाळ काढणे साठी कुठलाही शासकिय निधी उपलब्ध नाही. दरवर्षी पावसाळयामध्ये पावसाच्या पाण्याबरोबर मोठया प्रमाणावर गाळ वाहुन येवुन ल.पा. योजनांमध्ये जमा होत असतो. पावसाळयामध्ये दरवर्षी गाळाचे थर तलावात साचत जातात. त्यामुळे पाझर तलाव /गावतलाव /को.प. /साठवण / वळण बंधारा यांची पाणी साठवण्याची क्षमता कमी होते. पर्यायाने सिंचनक्षमता खालावली जाते. नाला पात्रामध्ये गाळ साचलेने नाल्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी होते व पुरस्थितीत प्रवाहाचे पाणी मुळ नाला पात्राबाहेरील भागात पसरुन लगतच्या शेतातील मातीचा सुपीक थर वाहुन जातो. अशा गाळ साचलेल्या ल.पा. योजनांमधील गाळ काढल्यास भूपृष्ठीय पाणी साठवण क्षमता Surface water storage व भूजल पुनर्भरण होवून सिंचन क्षमता पुनर्स्थापित व वाढ Rejuvenation and augmentation होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होते. सदर योजनेतून लोकसहभागातून गाळ काढणेत येऊन शेतकऱ्याच्या शेतात पसरविला जातो.

     

     

    प्रस्तावना
    माहितीचा अधिकार अधिनियम–२००५ या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे शासकीय / निमशासकीय यंत्रणांवर चांगले नियंत्रण आले आहे. तसेच या कायद्यामुळे शासकीय कामकाज कसे होत आहे, शासनाच्या जनकल्याणाच्या विविध योजनांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते, त्यातील विविध स्तरावरील टप्पे / प्रक्रिया याचीही माहिती सर्व सामान्य जनतेला खुली होणार आहे. तसेच शासनाचा कारभार जसजसा पारदर्शक होत जाईल तसतशी जनतेच्या मनातील संदिग्धता कमी होत जाईल. तसेच दप्तर दिरंगाई आणि भ्रष्टाचार यालाही आपोआपच आळा बसेल.

    या अधिकारात खालील बाबींचा समावेश आहे:
    • काम, कागदपत्रे, नोंदी यांची तपासणी करणे.
    • कागदपत्रे किंवा नोंदी यांच्या प्रमाणित प्रती मिळवणे तसेच त्यांची टिपणे काढणे.
    • साहित्याच्या प्रमाणित प्रती मिळवणे.
    • माहिती छापील प्रत (प्रिंटआऊटस्), सीडी, फ्लॉपी, टेप्स, व्हिडिओ रेकॉर्डस् किंवा इतर कोणत्याही ईलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मिळवणे.

     

    संपर्क, लघुपाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद नाशिक

    क्रमांक              नाव         पदनाम    भ्रमणध्वनी विभाग / उपविभाग      ई-मेल
    1 श्रीमती वैशाली तुळशीराम ठाकरे जिल्हा जलसंधारण अधिकारी 94227 02680 जिल्हा परिषद नाशिक vtthakare20@gmail.com
    2 श्री. रघुनाथ विठ्ठल गवळी सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी 80104 23549 जिल्हा परिषद नाशिक raghunathgawali16@gmail.com
    3 श्री रविंद्र काशिनाथ सूर्यवंशी उपविभागीय जसलंधारण अधिकारी 9689100990 जि.प. उपविभाग मालेगाव

    ravindraks20@gmail.com

     

    4 श्री गणेश भगवंतराव रहाटळ उपविभागीय जसलंधारण अधिकारी 9922937789 जि.प. उपविभाग येवला rahatal52@gmail.com
    5 श्री. रघुनाथ विठ्ठल गवळी

    उपविभागीय जसलंधारण अधिकारी

    (अतिरिक्त कार्यभार)

    80104 23549 जि.प. उपविभाग दिंडोरी raghunathgawali16@gmail.com
    6 श्री नंदराज दत्तात्रय धुम

    उपविभागीय जसलंधारण अधिकारी

    (प्रभारी)

    9404538253 जि.प. उपविभाग कळवण nanandrajdhum@gmail.com
    7 श्री.दिपक विजय महाजन उपविभागीय जसलंधारण अधिकारी प्रभारी 8149479468 जि.प. उपविभाग इगतपुरी

    deepak93.mahajan@gmail.com

     

    8 श्री.शशिकांत निवृत्ती वाघ

    उपविभागीय जसलंधारण अधिकारी

    (प्रभारी)

    8600481509 जि.प. उपविभाग सटाणा waghshashikant6025@gmail.com
    9 श्री. दिलीप एकनाथ खराटे उपविभागीय जसलंधारण अधिकारी 9689195354 जि.प. उपविभाग नाशिक dilip.kharate27@mah.gov.in
    10 श्री आशिष सुनिल साळी

    उपविभागीय जसलंधारण अधिकारी

    (प्रभारी)

    8087568407 जि.प. उपविभाग निफाड ashishsali1489@gmail.com
    11 श्री प्रसाद देवेद्र सोनवणे उपविभागीय जसलंधारण अधिकारी 9422578889 जि.प. उपविभाग चांदवड

    prasadsonawane1822@gmail.com