बंद

    पंचायत समिती, दिंडोरी

    image (1)
    श्री.भास्कर सावळेराम रेंगडे

    गट विकास अधिकारी

    वेनदे सर
    श्री. भरत शामराव वेन्दे

    सहायक गट विकास अधिकारी

    दिंडोरी तालुक्यात पूर्व भागात श्रीक्षेत्र जोपुळ हे संत पाटील बाबा महाराजांची जन्मभूमी व कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध प्रेक्षणीय व धार्मिक वारकरी पंथाचे स्थळ आहे. संत पाटील बाबांनी 18 व्या शतकात तालुक्यातील अंधश्रद्धा मोडीत काढून वारकरी संप्रदाय भरभराटीस आणला. संत पाटील बाबांनी निवृत्तीनाथ महाराज समाधीचा शोध लावला.

    1) भौगोलिक स्थान व क्षेत्रफळ : • निर्देशांक: 20°12′00″N 73°49′59″E • Source- “दिंडोरी, भारत”, फॉलिंग रेन जीनोमिक्स, इंक • क्षेत्रफळ-1342km

    2) लोकसंख्या : भारताच्या २०११ च्या जनगणनेनुसार, दिंडोरी तालुक्यात 58271 कुटुंबे आहेत, लोकसंख्या 315709 असून त्यापैकी 161500 पुरुष आणि 154209 महिला आहेत. 0-6 वयोगटातील मुलांची लोकसंख्या 43567 आहे जी एकूण लोकसंख्येच्या 13.8% आहे.

    3) हवामान : येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियस पर्यंत असते. जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते. वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते. वार्षिक पर्जन्यमान १,००० मिमी पर्यंत असते.

    दिंडोरी तालुक्याचे लिंग-गुणोत्तर 929 च्या तुलनेत सुमारे 955 आहे जे महाराष्ट्र राज्यातील सरासरी आहे. दिंडोरी तालुक्याचा साक्षरता दर 66.83% असून त्यापैकी 73.03% पुरुष साक्षर आणि 60.33% महिला साक्षर आहेत. दिंडोरीचे एकूण क्षेत्रफळ १३१८.७५ किमी असून लोकसंख्येची घनता २३९ प्रति चौ.कि.मी

    4) राजकीय माहिती : दिंडोरी विधानसभा मतदारसंघ हा पश्चिम भारतातील महाराष्ट्र राज्यातील २८८ विधानसभा (विधानसभा) मतदारसंघांपैकीएक आहे. हे अनुसूचित जमाती (ST) समुदायासाठीराखीव आहे. दिंडोरी (दिंडोरी) विधानसभा मतदारसंघ हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे, तसेच चांदवड , कळवण , नांदगाव , निफाड आणि येवला या पाच विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे . सर्व मतदारसंघ नाशिक जिल्ह्यात आहेत.

    • प्रधानमंत्री / शबरी / रमाई / इंदिराआवास घरकुल योजना- (अधिक वाचा)
    • महात्मा गांधी  राष्ट्रिय  ग्रामिण रोजगार हमी योजना- (अधिक वाचा)
    • महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान- (अधिक वाचा)  

    • सामान्य प्रशासन विभाग : कार्यालयीन सुशोभिकरण अंतर्गत सर्व पंचायत समिती आवार तसेच कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचारी यांचे सहयोगाने रक्कम रुपये 70,000/- ची कार्यालयीन सुशोभिकरणासाठी फुलझाडे / शोभेची झाडे लावण्यात आली त्यामध्ये एकुण 187 कुंडया आणि 187 रोपे लावण्यात आली.

    • घरकुल विभाग :- प्रधानमंत्री आवास योजना सन  2024-2025 अंतर्गत्‍ दिंडोरी तालुक्यासाठी एकुण 14516 चे उदिदष्ट आले होते. त्यापैकी 13955 लाभार्थ्यांना मंजूरी देणेत आली. तसेच मंजूरी दिलेल्या लाभार्थ्यांपैकी 12040 घरकुल लाभार्थ्यांना रुपये 15000/- प्रमाणे पहिला हप्ता ऑनलाईन वितरीत करणेत आलेला आहे.

    मिशन शुभारंभ कार्यक्रम : दिंडोरी गटातील प्रत्येक ग्रामपंचायतींना 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेणेत येऊन सन्मा. आमदार, खासदार, माजी सभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, तसेच ग्रामपंचायत सरपंच/उपसरपंच/ग्रामपंचायत सदस्य मंजूरी लाभार्थींच्या घरकुलाचा पाया खोदकामाचा कुदळ मारुन मिशन शुभारंभ कार्यक्रम घेणेत आला.
    तसेच प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत  जे भुमिहिन लाभार्थी होते त्या लाभार्थ्यांना ग्रामपंचायतींनी दिलेल्या प्रस्तावानुसार मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जि प नाशिक ज्या घरकुल लाभार्थींना जागा उपलब्ध नव्हती त्या गावठाण मधील  124 लाभार्थींचा प्रस्ताव सादर केला असता  110 घरकुल लाभार्थींना मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक यांनी जागा उपलब्ध दिली आहे.

    • जि.. (लपा)उपविभाग : पाझर तलाव अक्राळे ता.दिंडोरी सुशोभिकरण खोलीकरण जोगींग ट्रक,इत्यादी कामे सी.एस.आर.फंडातुन रिलायंन्स कंपनी कडुन पुर्ण करण्यात आले असुन पाझर तलावा वरील जोगींग ट्रक चा तेथील कंपनी कामगार,स्थानीक नागरीक मोठया प्रमाणात आरोग्यासाठी वापर करित आहेत.सुशोभिकरणामुळे परिसरातील शाळा,महाविद्यालये येथे पर्यटनासाठी येत असतात.

    • एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प,दिंडोरी-1/उमराळे-2

    1) लेक लाडकी योजनेअंतर्गत  993 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.
    2) मुख्यंमंत्री लाडकी बहीण योजेअंतर्गत  84195 महिला लाभार्थ्याना रुपये 1500/- प्रमाणे लाभ देण्यात आला.

    माहितीचा अधिकार कायदा, २००५

    प्रस्तावना
    माहितीचा अधिकार अधिनियम -२००५ या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे शासकीय / निमशासकीय यंत्रणांवर चांगले नियंत्रण आले आहे. तसेच या कायद्यामुळे शासकीय कामकाज कसे होत आहे, शासनाच्या जनकल्याणाच्या विविध योजनांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते, त्यातील विविध स्तरावरील टप्पे / प्रक्रिया याचीही माहिती सर्व सामान्य जनतेला खुली होणार आहे. तसेच शासनाचा कारभार जसजसा पारदर्शक होत जाईल तसतशी जनतेच्या मनातील संदिग्धता कमी होत जाईल. तसेच दप्तर दिरंगाई आणि भ्रष्टाचार यालाही आपोआपच आळा बसेल.

    या अधिकारात खालील बाबींचा समावेश आहे:
    • काम, कागदपत्रे, नोंदी यांची तपासणी करणे.
    • कागदपत्रे किंवा नोंदी यांच्या प्रमाणित प्रती मिळवणे तसेच त्यांची टिपणे काढणे.
    • साहित्याच्या प्रमाणित प्रती मिळवणे.
    • माहिती छापील प्रत (प्रिंटआऊटस्), सीडी, फ्लॉपी, टेप्स, व्हिडिओ रेकॉर्डस् किंवा इतर कोणत्याही ईलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मिळवणे.(सविस्तर वाचा)

     

    माहिती अधिकार अधिनियम २००५, कलम ४ नुसार १ ते १७ मुद्दयाची माहिती- पहा/डाउनलोड करा

    1) गढीचा गणपती : हे गणपतीचे ऐतिहासिक मंदिर आहे. या मंदिराची स्थापना माधवराव पेशवे यांनी केली. हे एक शक्तिशाली/ जागृत गणेश मंदिर आहे.(सविस्तर वाचा)

    2) किल्ले रामसेज : रामसेज किंवा रामशेज किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील दिंडोरीपासून १० किलोमीटर (६.२ मैल अंतरावर असलेला एक छोटासा किल्ला आहे.(सविस्तर वाचा)

    3) श्री क्षेत्र कर्दमा श्रम (करंजी) : श्री क्षेत्र कर्दमाश्रम हे दिंडोरीपासून १० किमी अंतरावर, ओझरखेड धरणापासून ६ किमी अंतरावर आहे. श्री क्षेत्र कर्दमाश्रम हे माता माता अनुसया (दत्तात्रयांचे अजोल) स्थान आहे. भगवान श्री नृसिहसरस्वती यांनी येथे १२ वर्षे तपश्चर्या केली. श्री क्षेत्र कर्दमाश्रम याला प्रति-गाणगापूर असेही म्हणतात.(सविस्तर वाचा)

    4) श्री कोंगाई माता : कोंगाई माता मंदिर हे एक माता भवानी मंदिर आहे ज्याची स्थापना शिवाजीने सुरतच्या लुटीच्या (लूट) दरम्यान केली होती. 6. श्री विंद्यवासिनी माता: हे माता रेणुकाचे मंदिर आहे. हे विद्यवासिनी मातेचे खूप जुने मंदिर आहे

    5) रांताळ : सुरत लुटच्या वेळी छ.शिवाजी राजे आणि मुघल यांच्यातील युद्धाचे ऐतिहासिक ठिकाण आहे.

    6) श्री सप्तशृंगी माता : हे माता दुर्गेचे अर्धशक्तिपीठ आहे. दिंडोरीपासून ५५ किमी अंतरावर आहे.(सविस्तर वाचा)

    •  ई मेल आईडीpanchayatsamitidindori@gmail.com.in
    •  गट विकास अधिकारी यांचा संपर्क क्रमांक– ८८८८६०८११५
    •  सहायक गट विकास अधिकारी यांचा संपर्क क्रमांक– ९४२३१२३७४५
    •  पंचायत समिती यांचे संपर्क क्रमांक– ७९७२४०६१९६