विभाग प्रमुख-
श्री. दिपक शामराव पाटील
प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन
जिल्हा परिषद, नाशिक
८३२९०१७२६२
- विभागाची माहिती – स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-2
सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रशासकीय मान्यता व अनुदान वाटप
सार्वजनिक शौचालय प्रशासकीय मान्यता व अनुदान वाटप
वैयक्तिक शौचालय प्रशासकीय मान्यता व अनुदान वाटप
प्लॅस्टिक व्यवस्थापन युनिट
गोबरधन प्रकल्प
पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रम
- विभागाने राबविलेले महत्वपुर्ण उपक्रम –
स्वच्छ भारत अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यात राबवलेले विविध स्वच्छता उपक्रम
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नाशिक जिल्ह्यात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी खालील उपक्रम राबविण्यात आले. शाश्वत स्वच्छ गाव ठेवणे, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, शौचालय वापर, प्लास्टिक व्यवस्थापन, तसेच वैयक्तिक स्वच्छता यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
१. स्वच्छता ही सेवा उपक्रम
- १ ऑगस्ट २०२४ ते २ ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत जिल्हयात स्वच्छतेविषयी जनजागृती वाढवण्यासाठी स्वच्छता ही सेवा मोहिम राबविण्यात आली.
- संपूर्ण जिल्ह्यात श्रमदान, स्वच्छता मोहिमा आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
- या मोहिमेंतर्गत गृहभेट उपक्रम, खाऊ गल्लींमध्ये स्वच्छतेविषयक जनजागृती, पथनाटय कार्यक्रम, स्वच्छता प्रतिज्ञा, रॅली, सवच्छ भारत अभियानाच्या उपांगांची दुरुस्ती, स्वच्छता ज्योत, टाकाऊ पासून टिकाऊ उपक्रम, एक झाड आईच्या नावे उपक्रम, चित्रकला व रांगोळी स्पर्धा आदि उपक्रम राबविण्यात आले.
- यावर्षी शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीमधील २ अस्वच्छ ठिकाणे निवडून त्यांची कायमस्वरुपी स्वच्छता करण्याचे निर्देश दिले होते.
- त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमधील २ ठिकाणांची निवड करुन शासनाच्या पोर्टलवर त्यांचे इव्हेंट क्रियेट करण्यात आले.
- २ ऑक्टोंबर रोजी स्वच्छ भारत साजरा करण्यात येऊन या सर्व ठिकाणांची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली.
- गावोगावी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी सहभाग घेतला.
- दैनंदिन स्वरुपात स्वच्छतेविषयक जनजागृती करण्यात आली.
२. मंदिर स्वच्छता मोहीम
- जिल्हयात १७-१-२०२४ ते १९-१-२०२४ या कालावधीत मंदिर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात राबविण्यात आलेल्या या अभियानात मंदिराची साफसफाई करणे, मंदिर परिसराची स्वच्छता करणे, प्रमुख मंदिरामध्ये रोषणाई करणे यासारखे उपक्रम राबविण्यात आले. जिल्हयातील ग्रामीण भागातील सर्व गावांमध्ये सदरचे अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले.
- जिल्हयातील ग्रामीण भागातील सर्व मंदिरांची स्वच्छता करण्यासाठी जिल्हयात मंदिर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
- धार्मिक स्थळे व मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
- या मोहिमेत जिल्हयातील सर्व ग्रामंपंचायतींनी सहभागी होऊन मंदिरांची स्वच्छता केली.
- या मोहिमेला जिल्हयात चांगला प्रतिसाद मिळाला.
- मंदिराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ व प्लास्टिकमुक्त करण्यात आला.
- मंदिरांना रंगरंगोटी व विद्यूत रोषणाई करण्यात आली.
- यामध्ये १७ व १८ जानेवारी २०२४ या कालावधीत जिल्हयातील प्रत्येक गावातील मंदिराची ग्रामस्थ, वारकरी मंडळ, भजरी मंडळ, मंदिर व्यवस्थापन समिती यांच्या सहभागातून स्वच्छता करण्यात आली.
जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेले उपक्रम:
- शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जल जीवन मिशन योजनेबाबत प्रचार प्रसिध्दी व्हावी या साठी निंबध,चित्रकला आणि वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
- जल रथ उपक्रम : पाण्याची बचत करणेबाबत जल रथ संपुर्ण जिल्हयात पाणी बचत,पाण्याचे जतन,जल पुर्नभरण याबाबतचे संदेश असणारी माहिती देण्यात आली
- डीजीटल वॉल उपक्रम : पाणी बचत जल जीवन मिशन योजना व स्वच्छ भारत प्रचार प्रसिध्दी साठी संपुर्ण जिल्हयात डीजीटल वॉल पेंटीगव्दारे उपक्रम राबविण्यात आले.
- जल जीवन मिशन कार्यशाळा गुरुदक्षिणा हॉल येथे आयोजित करण्यात आली
- विविध पुरस्कारर्थींना पारितोषिक प्रदान करण्यात आली
- माझी वसुंधरा कार्यशाळा गुरुदक्षिणा हॉल येथे आयोजित करण्यात येऊन माझी वसुंधरा बाबत जल,वायु,अग्नि,आकाश,पृथ्वी या घटकांबाबत उपक्रमांची माहिती मा.विभागीय आयुक्त यांचे कार्यालयामार्फत देण्यात आली.
- विधी न्याय प्राधिकरण यांच्या वतीने आयोजित शिबीरामध्ये पाणी गुणवत्ता संनियत्रण आणि जल जीवन मिशन योजना याबाबत स्टॉल लाऊन प्रचार प्रसिध्दी करण्यात आली.
- पाणी गुणवत्ता व ग्रामपाणीपुरवठा व स्वच्छता समिती या बाबत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
- संत गाडगेबाबत ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करुन सन 20-21,21-22,22-23,23-24 चे पुरस्कार वितरीत करण्यात आले.
- जागतिक जल दिन तसेच जागतिक शौचालय दिन साजरा करण्यात आले.