ग्रामीण पाणी पुरवठा विभाग
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत, नाशिक जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यातील पाणी पुरवठा विषयक कामे केली जात आहेत. यासाठी एकूण १५ तालुक्यांसाठी खालीलप्रमाणे उपविभाग कार्यरत आहेत.
अ.क्र. | उपविभागाचे नाव | उपविभागाच्या कार्यक्षेत्रातील तालुके |
---|---|---|
१ | ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, नाशिक | नाशिक ,त्र्यंबकेश्वर ,इगतपूरी |
२ | ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, सुरगाणा | सुरगाणा ,पेठ, कळवण |
३ | ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग,मालेगाव | मालेगाव ,चांदवड ,बागलाण,देवळा |
४ | ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, येवला | येवला ,नांदगाव |
५ | ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, निफाड | निफाड ,दिडोरी |
तसेच सिन्नर तालुक्यातील पाणी पुरवठा येाजनांविषयक कामकाज, उपअभियंता, जि.प. ल.पा. उपविभाग, सिन्नर यांच्यामार्फत पाहिले जात आहे.
तसेच ग्रामीण पाणी पुरवठा येाजनांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी पथक कार्यरत आहे व जिल्ह्यातील हातपंप व विद्युत पंप यांचेसाठी उपअभियंता (यां), यांत्रिकी पथक कार्यरत आहे.
पिण्याच्या पाण्याच्या सुविधा अंतर्गत खालील योजना राबविल्या जातात :-
- राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम सदरचा कार्यक्रम लोकसहभागावर आधारित असून, मागणी आधारित आहे.
- शासकीय आश्रमशाळा पाणी पुरवठा योजना
- हातपंप व विद्युत पंपाची कामे
- स्थानिक विकास कार्यक्रम
- ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे
- देखभाल दुरुस्ती अंतर्गत पेयजल योजनांची दुरुस्ती कामे
टंचाई अंतर्गत पिण्याच्या पाण्याची सुविधा पाणी टंचाई कार्यक्रमाचा आराखडा हा
- ऑक्टोबर ते डिसेंबर
- जानेवारी ते मार्च आणि
- एप्रिल ते जुन अशा तिमाहीनुसार, गटविकास अधिकारी यांच्याकडून तयार करुन घेऊन, मा.जिल्हाधिकारी, नाशिक यांचेकडून मंजुरी घेतली जाते. टंचाई अतर्गत खालील नऊ उपाययोजनांतर्गत कामे केली जातात.
- बुडक्या घेणे
- विहीर खोल करणे / गाळ काढणे
- खाजगी विहीर अधिग्रहण करणे
- टँकर / बैलगाडीने पाणी पुरवठा करणे
- प्रगतीपथावरील योजना पुर्ण करणे
- नळ योजनांची विशेष दुरुस्ती
- विधन विहीरींची विशेष दुरुस्ती
- नविन विधन विहीर घेणे / कुपनलिका
- तात्पुरती पुरक नळ योजनाउपरोक्त उपाययोजना राबविण्यासाठी, तालुकास्तरावर तहसिलदार व गटविकास अधिकारी यांचेस्तरावर प्रस्ताव तयार केला जातो व मंजुर आराखड्यानुसार उपाययोजना राबविण्यात येतात.