बंद

    पंचायत समिती, नाशिक

    छायाचित्र उपलब्ध नाही
    डॉ. श्रीमती सोनिया रविंद्र नाकाडे

    गट‍ विकास अधिकारी

    छायाचित्र उपलब्ध नाही
    श्री. रघुनाथ म्हाळसा सुर्यवंशी

    सहायक गट विकास अधिकारी

    नाशिक हे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील शहर आहे. नाशिक हे भारतातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. हे ऑटोमोबाईल हब मधील एक प्रमुख औद्योगिक केंद्र आहे.नाशिक हे महाराष्ट्रातील चौथे मोठे शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहरातील लोकसंख्या अंदाजे १४,००,००० आहे. या शहरात नाशिक विभागनाशिक जिल्ह्याचे व नाशिक तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

    येथे मराठी भाषा बोलली जाते. गोदावरी नदीच्या काठावरील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. नाशिक शहराच्या दक्षिणेला त्रिरश्मी बौद्ध लेणी आहे, उत्तरेला चांभार लेणी व रामशेज किल्ला आहे. पश्चिमेस ३५किमी अंतरावर त्र्यंबकेश्वर आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष व कांद्याचे उत्पादन होते. त्याप्रमाणेच वाईन-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे ‘भारताची नापा व्हॅली’ म्हणून आता नाशिक व नजीकचा परिसर नव्याने प्रसिद्ध होत आहे. जगातील सर्वांत पहिले व मोठे मातीचे धरण नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरण येथेच आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (य. च. म. मु. वि.) नाशकातच आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर सिटी अँड इंडस्ट्रीज डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनने सिडको नावाचा शहराचा एक नवीन विभाग वसवला आहे. मुंबई व पुण्याप्रमाणेच येथे नाशिक शहर विकास प्राधिकरण स्थापन झालेले आहे.

    पंचवटी हा सुद्धा नाशिकचा एक भाग आहे. नाशिकमधील अशी धार्मिक स्थळे पाहिल्याबरोबर माणसाला पुरातन काळाचे महत्त्व कळते. नाशिक हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. गोदावरी ही नदी नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथून उगम पावते. नाशिकमधील गोदाघाट प्रसिद्ध आहे. नाशिकमध्ये काळाराम मंदिर आहे. पेशवे काळामध्ये ही या शहराला विशेष धार्मिक स्वरूप प्राप्त झाले. तांब्या पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक हे शहर विशेष प्रसिद्ध आहे. शहराला प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाची दीर्घ परंपरा लाभलेली आहे. (सविस्तर वाचा)

    अनुक्रमांक शीर्षक वर्णन डाउनलोड
    1 माहितीचा अधिकार अधिनियम २००५, कलम ४ नुसार १ ते १७ मुद्यांची माहिती. माहितीचा अधिकार अधिनियम २००५, कलम ४ नुसार १ ते १७ मुद्यांची माहिती-पंचायत समिती, नाशिक (पहा/डाउनलोड करा)