विभाग प्रमुख-
श्रीमती वैशाली तुळशीराम ठाकरे (प्रतिनियुक्ती )
जिल्हा जलसंधारण अधिकारी, (ल.पा.)
जिल्हा परिषद, नाशिक
९४२२७०२६८०
विभागाद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध योजना:
योजना |
योजनेचा उददेश |
पाझर तलाव व गावतलाव बांधणे | योजनेचा उददेश – वाहुन जाणारे पाणी मातीचा भराव टाकून अडविणे व त्यायोगे जमिनीत मुरवणे. त्यामुळे तलावाच्या खालील बाजुच्या विहिरीच्या पाण्याची पातळी वाढते. काही तलावात सहा महिन्यांपेक्षा जास्त पाणी असलेने तलावात मासेमारी व्यवसायाव्दारे उत्पन्न व स्थानिक लोकांना रोजगार निर्मीती होते. पाझर तलावातील पाणी पाझरुन भुगर्भातील जलस्तर वाढण्यास मदत होते. त्यामुळे तलावाखालील विहिरींची पाणीपातळी वाढण्यास मदत होते. पाझर तलावामुळे होणारे सिंचन हे अप्रत्यक्ष सिंचन असते. योजनेचे निकष – स्थानिक नाला असावा. त्याच्या वरील बाजूस साधारण बशीसारखी भूरचना असल्यास पाणीसाठा होतो. नाला फार मोठा नसावा. अन्यथा सांडव्याचा खर्च वाढून योजना मापदंडाच्या बाहेर जाते. योजनेसाठी शासनाने आर्थिक मापदंड निश्चित केलेला असून तो पुढीलप्रमाणे आहे. अ सर्वसाधारण क्षेत्र – 162768/- ब डोंगरी क्षेत्र व अवर्षण प्रवण क्षेत्र – 162768/- योजनेची कार्यपध्दती – एखादे ठिकाणी तलावासाठी योग्य जागा ग्रामस्थांना आढळल्यास ग्रामपंचायतीमार्फत जिल्हा परिषदेकडे तलावाची मागणी केली जाते. मागणी प्राप्त झाल्यानंतर प्रस्तावित जागेची पाहणी केली जाते. जागा योग्य आढळल्यास सखोल सर्वेक्षण करुन त्याप्रमाणे अंदाजपत्रक तयार केले जाते व मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे सादर केले जाते. जिल्हा परिषदेकडे अंदाजपत्रक प्राप्त झाल्यानंतर निधीच्या उपलब्धतेनुसार आराखडयास मा.जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची मंजुरी घेणेत येते व त्यानुसार सक्षम प्राधिका-याची प्रशासकिय मान्यता घेण्यात येते. |
साठवण बंधारे |
योजनेचा उददेश – ज्या ठिकाणी भुस्तर पायासाठी पक्या खडकाचा आहे त्याठिकाणी शक्यतो 1.50 ते 3.00 मी उंची पर्यंत काँक्रिटचा बांध घालून पाणी अडविले जाते. त्यामुळे लाभ क्षेत्रातील लाभधारक शेतक-यांना जलसिंचनाचा लाभ घेता येतो. योजनेचे निकष – पाणी साठविल्यानंतर लाभ धारकांना शेतीच्या सिंचनासाठी बंधा-यातील पाणी अप्रत्यक्ष सिंचनाव्दारे घेता येईल; अशा ठिकाणी साठवण बंधारा प्रस्तावित केला जातो. योजनेसाठी शासनाने आर्थिक मापदंड निश्चित केलेला असून तो पुढीलप्रमाणे आहे. अ सर्वसाधारण क्षेत्र – 138324/- ब डोंगरी क्षेत्र व अवर्षण प्रवण क्षेत्र – 178810/- योजनेची कार्यपध्दती – एखादे ठिकाणी तलावासाठी योग्य जागा ग्रामस्थांना आढळल्यास ग्रामपंचायतीमार्फत जिल्हा परिषदेकडे तलावाची मागणी केली जाते. मागणी प्राप्त झाल्यानंतर प्रस्तावित जागेची पाहणी केली जाते. जागा योग्य आढळल्यास सखोल सर्वेक्षण करुन त्याप्रमाणे अंदाजपत्रक तयार केले जाते व मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे सादर केले जाते. जिल्हा परिषदेकडे अंदाजपत्रक प्राप्त झाल्यानंतर निधीच्या उपलब्धतेनुसार आराखडयास मा.जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची मंजुरी घेणेत येते व त्यानुसार सक्षम प्राधिका-याची प्रशासकिय मान्यता घेण्यात येते.
|
विहिर /गाव तलाव/ पाझर तलाव/ पारंपारिक पाणीसाठी तलावातील गाळ काढणे | यामध्ये पाणी साठयाचे खालील प्रकार अनुज्ञेय आहेत. 1) सर्वतलाव (लघुपाटबंधारे / पाझ्ररतलाव / पारंपारिकतलाव). 2) सर्वबंधारे. (यामध्येपिण्याच्यापाण्याच्याविहीरीलाप्राधान्यदयावे.) जिल्हापरिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतीयांच्या मालकीची तसेच खाजगी मालकीच्या विहीरीतील गाळ काढण्यास अनुमती आहे. एकाच हंगामामध्ये पावसाळा सुरु होणे पूर्वी गाळ काढणेचा आहे. गाळ काढणेचे कामपूर्णत: अकुशलस्वरुपाचे असून अंदाजपत्रकात कोणत्याही कुशल कामाचा समावेश करु नये. |
कोल्हापूर पध्दतीचे बंधारे | योजनेचा उददेश – ज्या ठिकाणी भुस्तर पायासाठी पक्या खडकाचा आहे त्याठिकाणी शक्यतो 1.50 ते 3.00 मी उंची पर्यंत काँक्रिटचा बांध घालून पाणी अडविले जाते. त्यामुळे लाभ क्षेत्रातील लाभधारक शेतक-यांना जलसिंचनाचा लाभ घेता येतो. योजनेचे निकष – ज्या ठिकाणी बंधा-यातील पाणी साठविल्यानंतर लाभ धारकांना शेतीच्या सिंचनासाठी बंधा-यातील साठलेले पाणी पाटाव्दारे किंवा ग्रॉव्हिटी व्दारे घेता येत नाही अशा ठिकाणी को.प.बंधारे घेऊन त्याव्दारे उपसासिंचनाचे माध्यमातुन पाणी उचलून क्षेत्र ओलिताखाली आणले जाते. योजनेसाठी शासनाने आर्थिक मापदंड निश्चित केलेला असून तो पुढीलप्रमाणे आहे. अ सर्वसाधारण क्षेत्र – 138324/- ब डोंगरी क्षेत्र व अवर्षण प्रवण क्षेत्र – 178810/- योजनेची कार्यपध्दती – एखादे ठिकाणी तलावासाठी योग्य जागा ग्रामस्थांना आढळल्यास ग्रामपंचायतीमार्फत जिल्हा परिषदेकडे तलावाची मागणी केली जाते. मागणी प्राप्त झाल्यानंतर प्रस्तावित जागेची पाहणी केली जाते. जागा योग्य आढळल्यास सखोल सर्वेक्षण करुन त्याप्रमाणे अंदाजपत्रक तयार केले जाते व मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे सादर केले जाते. जिल्हा परिषदेकडे अंदाजपत्रक प्राप्त झाल्यानंतर निधीच्या उपलब्धतेनुसार आराखडयास मा.जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची मंजुरी घेणेत येते व त्यानुसार सक्षम प्राधिका-याची प्रशासकिय मान्यता घेण्यात येते. |
झरा तलाव, बंधाऱ्यातील गाळ काढणे | योजनेचा उद्देश 1 पावसाचे पाणी अडविणे – भूपृष्ठीय पाणी साठवण Surface water storage व भूजल पुनर्भरण करणे. 2 भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण करणे – गाळ काढल्यामुळे उपलब्ध होणा-या पाणीसाठयामुळे पुनर्भरणासाठी अतिरिक्त पाणी व अवधी Retention period मिळाल्याने परिसरातील भूजल पातळीत वाढ करणे. पर्यायाने त्या परिसरात मान्सूनोत्तर काळात अधिक कालावधीपर्यंत भूजल उपलब्ध करणे. 3 नाला पात्रामध्ये गाळ साचलेने नाल्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी होते व पुरस्थितीत प्रवाहाचे पाणी मुळ नाला पात्राबाहेरील भागात पसरुन लगतच्या शेतातील मातीचा सुपीक थर वाहुन जातो. गाळ काढून या समस्येचे निराकरण करणे. 4 गावांमधील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण करणे. 5 अशा ल.पा. योजना पुनर्जिवित करून त्या परिसरात नव्याने बंधारे बांधणेचा खर्च वाचविणे. 6 ग्रामीण भागातील लोकांचे उदर्निर्वाह मध्ये परिवर्तन घडवून आणणे. योजनेची कार्यपध्दती :- 0 ते 100 हे. सिंचनक्षमता असलेल्या पाझर तलाव/गावतलाव /को.प./साठवण/ वळण बंधारा यातील गाळ काढणे प्रक्रिया ही लोकसहभाग, सीएसआर, एनजिओ मार्फत करणेबाबत शासनाचे निर्देश आहेत. गाळ काढणे साठी कुठलाही शासकिय निधी उपलब्ध नाही. दरवर्षी पावसाळयामध्ये पावसाच्या पाण्याबरोबर मोठया प्रमाणावर गाळ वाहुन येवुन ल.पा. योजनांमध्ये जमा होत असतो. पावसाळयामध्ये दरवर्षी गाळाचे थर तलावात साचत जातात. त्यामुळे पाझर तलाव /गावतलाव /को.प. /साठवण / वळण बंधारा यांची पाणी साठवण्याची क्षमता कमी होते. पर्यायाने सिंचनक्षमता खालावली जाते. नाला पात्रामध्ये गाळ साचलेने नाल्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी होते व पुरस्थितीत प्रवाहाचे पाणी मुळ नाला पात्राबाहेरील भागात पसरुन लगतच्या शेतातील मातीचा सुपीक थर वाहुन जातो. अशा गाळ साचलेल्या ल.पा. योजनांमधील गाळ काढल्यास भूपृष्ठीय पाणी साठवण क्षमता Surface water storage व भूजल पुनर्भरण होवून सिंचन क्षमता पुनर्स्थापित व वाढ Rejuvenation and augmentation होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होते. सदर योजनेतून लोकसहभागातून गाळ काढणेत येऊन शेतकऱ्याच्या शेतात पसरविला जातो. |