बंद

आरोग्य विभाग

विभाग प्रमुख-

मोरे
डॉ. श्री. सुधाकर वामनराव मोरे

जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा परिषद, नाशिक
७५८८९३०३३८

भारतात आरोग्य सेवा पध्दती ब्रिटीश राजवटीपासून सुरु झाली. सुरवातीस आरोग्य सेवेची उद्दिष्ट सैनिक व युरोपीयन नागरी नोकरांना सेवा देणे हे होते
व साथरोग नियंत्रण, उदा. प्लेग, कॉलरा, देवी हे स्थानिक स्वराज्य सांस्थाांच्या मदतीने प्राधान्याने ग्रामीण भागात सुरु केली. ब्रिटीश राजवटी पाश्चात पध्दतीचे औषधोपचार सुरु केल्यामूळे
अस्तित्वात असलेल्या पारंपरिक औषधोपचार व आयुर्वेदिक उपचार याकडे दुर्लक्ष झाले. सुरवातील मोठया शहरात हॉस्पिटल व दवाखाने याांच्यामार्फत उपचारात्मक सेवा देणे सुरु केले.
नियोजन समितीने १९४०  साली ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणेची सूचना केली व १००० लोकसंख्येला ०१ आरोग्य सेवक व प्रमाणात आरोग्य सेवकांना आरोग्य सेवा देण्यासाठी प्रशिक्षण आयोजित केले पहिले प्राथमिक आरोग्य केंद्ग १९४२ साली कलकत्याजवळ (पश्चिम बांगाल) शिंगूर या गावी सुरु केले. त्याला ग्रामीण आरोग्य पथक असे सांबोधण्यात आले. ग्रामीण
आरोग्य सेवा डॉ.जेम्स ग्रॅड, संचालक, अखिल भारतीय स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य संस्था याांच्या मार्गदर्शनाखाली  हा कार्यक्रम राबविला आहे. त्याचसुमारास मुंबई  प्रांत सरकारच्या
आर्थिक सहाय्याने आरोग्य सेवा पदध्ती महाराष्ट्र राज्यात सुरु करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थाांचे दवाखाने राज्यात सोयीच्या ठिकाणी  सुरु करण्यात आले त्यालाच नागरी
दवाखाने म्हणत.  नंतर हे सर्व दवाखाने जिलहस परिषदेमध्ये वर्ग करण्यात आले. १९७७  साली झालेल्या १३ व्या जागतीक आरोग्य परिषदेमध्ये आरोग्य संघटना व त्याचे सभासद देश याांनी
समाजाचे आरोग्य एका ठराविक पातळीवर संवादाचे मुख्य उद्दिष्ट  हेच २०००  साली सर्वाना आरोग्य या नावाने प्रसिद्ध झाले. या उद्दिष्ट पूर्तीसाठी प्राथमिक आरोग्य सेवा हीच खरी
गुरुकिल्ली आहे हे स्वीकृत करण्यात आले.

विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या योजना व विभाग हयाबद्दल सविस्तर माहितीपहा