• छापा
 • समाज कल्याण विभाग

  प्रशासकीय
  समिती

  समाज कल्याण विभाग

  समाज कल्याण, जिल्हा परिषद, नाशिक कार्यालयाकडील मंजुर पदे सन-२०१४-१५

  अ.क्र. संवर्गाचे नांव पदनाम मंजुर पदे ( मुख्यालय ) भरलेली पदे( मुख्यालय )रिक्त पदे ( मुख्यालय )
  गट-अ जिल्हा समाज कल्याण अधिकारी
  गट-ब पद मंजुर नाही
  गट-ककर्यालायीन अधीक्षक
  गट-क सहाय्यक लेखाधिकारी
  गट-क वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता
  गट-क सहाय्यक सल्लागार
  गट-क समाज कल्याण निरीक्षक
  गट-क वरिष्ठ लिपीक
  गट-क कनिष्ठ लिपीक
  १० गट-क कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
  ११ गट-ड शिपाई

  अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे

  उदिष्ट :- अनुसूचित जाती व नवबैध्द घटकांच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी प्रत्येक दलित वस्त्यांमध्ये स्वच्छता विषयक सोयी, समाज मंदिर, गटारी, अंतर्गत रस्ते, नळपाणी पुरवठा इत्यादी व्यवस्था करुन अनुसूचित जाती व नवबैध्द वस्तीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ही योजना आहे.

  लाभाचे स्वरुप :- शासन निर्णय दिनांक ०५ डिसेंबर,२०११ अन्वये प्रत्येक अनुसूचित जाती व नवबैध्द घटकांच्या वस्तीला लोकसंख्येच्या प्रमाणात खालील प्रमाणे अनुदान देण्यात येते.

  अ.क्र. लोकसंख्या अनुदान (रु)
  १० ते २५ २.०० लक्ष
  २६ ते ५० ५.०० लक्ष
  ५१ ते १०० ८.०० लक्ष
  १०१ ते १५० १२.०० लक्ष
  १५१ ते ३०० १५.०० लक्ष
  ३०१ च्या पुढे २०.०० लक्ष

  शासन शुध्दीपत्रक दिनांक :- ३१ डिसेंबर, २०११ व दिनांक ०२/०७/२०१२ अन्वये कामांची निवड करण्याचे अधिकार खालील जिल्हा स्तरीय निवड समितीला देण्यात आले आहेत.

  अ.क्र. जिल्हा समिती पदनाम
  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष
  सभापती (समाज कल्याण) सह अध्यक्ष
  कार्यकारी अभियंता (बांधकाम जि.प.) सदस्य
  मुख्य लेखा व वित्त अधिकारी जि.प. सदस्य
  संबंधित पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सदस्य
  जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि.प. सदस्य सचिव

  तथापी शासन शुध्दीपत्रक क्र. दवसु२०१५/प्र.क्र.५९/अजाक९/मुंबई ३२ दिनांक ८ मार्च २०१६ अन्वये लाभार्थी निवड समाजकल्याण समिती जि.प. यांचे मान्यतेने मंजूर करावी. असे शासन निर्णयात नमूद करणेत आलेले आहे.

  अ.क्र. जिल्हा समिती पदनाम
  सभापती (समाज कल्याण) अध्यक्ष
  जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि.प. सदस्य सचिव
  स्वंयसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणा-या मागासवर्गीय अनुदानित वसतिगृहांना सहाय्यक अनुदान

  उदिष्ट :- मागासवर्गीय विद्यार्थ्याना त्यांचा शिक्षणक्रम पूर्ण करता यावा ग्रामीण भागामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यामध्ये शाळा गळतीचे प्रमाणकमी व्हावे आर्थिक दुरवस्थेमुळे मागासवर्गीय पालकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणात अडचणी येऊ नये आणि मागासवर्गीय विद्यार्थ्याचा शैक्षणिक विकास व्हावा या उद्देशाने ही योजना सन- १९५०-५१ पासून कार्यन्वित करण्यात आलेली आहे.

  स्वरुप:-

  १. कर्मचारी मानधन - वसतिगृह अधिक्षक, स्वयंपाकी, मदतनीस व चौकीदार यांना एकत्रित मानधन देण्यात येते.

  २. परिपोषण अनुदान- प्रतिविद्यार्थी प्रतिमहा रु.९००/- प्रमाणे १० महिन्याकरीता शासनाकडून निवासी विद्यार्थ्यासाठी परिपोषण अनुदान देण्यात येते.

  ३. इमारत भाडे- इमारत भाडयापोटी सार्वजनिक बांधकाम विभागने प्रमाणित केलेल्या भाडयाच्या ७५ % भाडे संस्थेस देण्यात येते.

  ४. सोयी सुविधा- निवास,भोजन, अथंरुण, पाघरुण, क्रिडा साहित्य इत्यादी सोयी सुविधा मोफत देण्यात येतात.

  ५. वसतिगृह प्रवेश- अनुदानित वसतिगृहांमध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याबरोबरच मांग,वाल्मिकी, कातकरी व माडीया गोंड या प्रवर्गातील स्थानिक विद्यार्थ्याना आणि अपंग व निराश्रीत विद्यार्थ्याना प्राधान्याने विहित टक्केवारीच्या अधिन राहून प्रवेश देण्यात येतो.

  सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना

  उदिष्ट :- इयत्ता ५ वी ते ७ वी व इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये शिकणा-या मागासवर्गीय मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने सन-१९९६ ते २००३ पासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे.

  अटि व शर्ती :-

  १. उत्पन्न व गुणांची अट नाही.
  २. अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
  ३. सदर योजना ऑनलाईन झालेमुळे इ.सी.एस द्वारे सदरची शिष्यवृत्ती रक्कम संबधीत विद्यार्थीनीच्या बॅक खात्यात जमा करण्यात येते.

  शिष्यवृत्ती स्वरुप :- अनुसूचित जाती मुलींसाठी

  इयत्ता शिष्यवृत्ती दर कालावधी
  इ. ५ वी ते ७ वी रु.६०/- दर महा १० महिने
  इ. ८ वी ते १० वी रु.१००/- दर महा १० महिने

  शिष्यवृत्ती स्वरुप :- वि.जा.भ.ज. व वि.मा.प्रवर्ग

  इयत्ता शिष्यवृत्ती दर कालावधी
  इ. ५ वी ते ७ वी रु.६०/- दर महा १० महिने

  मॅट्रिक पूर्व शिक्षण फी , परिक्षा फी प्रदाने

  उदिष्ट :- दिनांक- २४ डिसेंबर,१९७० च्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील इयत्ता १ ली ते १० वी मध्ये शिकत असणा-या व ज्या विद्यार्थ्याचे पालक महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असतील अशा विद्यार्थ्याचे वय व उत्त्पन्न विचारात न घेता सर्व स्तरावरील मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्याची शक्षणिक शुल्कांची प्रतिपूर्ती प्रमाणित दराने केली जाते.

  शालेय शिक्षण विभागाच्या दि.१३ मार्च,१९९६ च्या शासन निर्णयान्वये प्रमाणित दराने शुल्क आकारणा-या शासन मान्यता प्राप्त व अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित मागासवर्गीय विद्यार्थ्याचे शिक्षण शुल्क व सत्र शुल्क अदा केले जाते.

  उदिष्ट :- खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये इ.१ ली ते १० वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या दारिदय रेषेखालील कुटुंबातील अनुसचित जाती, विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याची शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती सन-२०११-१२ शैक्षणिक वर्षापासुन दरवर्षी १० महिन्याच्या कालावधी करीता पुढील दराने मंजुर करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे.

  अनुसूचित जाती , विजाभज व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याची इयत्ता निहाय प्रतिपुर्ती दर आर्थिक दृष्टया मागासलेले विद्यार्थीकरीता

  अ.क्रइयत्ता विद्यार्थ्याना द्यावयाची दर महा शिक्षणशुल्क + परिक्षा शुल्कांची प्रतिपुर्ती (वर्षातून १० महिने कालावधीसाठी)
  इ. १ वी ते ४ वी रु.१००/- दर महा (१० महिन्यासाठी)
  इ. ५ वी ते ७ वी रु.१५०/- दर महा (१० महिन्यासाठी)
  इ. ८ वी ते १० वी रु.२००/- दर महा (१० महिन्यासाठी)

  इयत्ता ९ वी व १० वी अनुसूचित जातीतील विद्यार्थ्याना भारत सरकार मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती

  योजनेचे स्वरुप :- मान्यता प्राप्त अनुदानित व विनाअनुदानित माध्यमिक शाळेत इ. ९ वी व १० वी मध्ये शिकणा-या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती देय आहे. ही गुणवत्ता शिष्यवृत्ती व्यतिरिक्त राहिल.

  अटी व शर्ती :- १. सदर शिष्यवृत्तीकरीता वार्षिक उत्पन्न रु.२.०० लाखाच्या आत असणे आवश्यक आहे.
  २. जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
  ३. राष्ट्रीयकृत बॅकेत विद्यार्थीचे खाते असणे आवश्यक आहे.
  ४. शाळेतील नियमित उपस्थित आहे.

  लाभाचे स्वरुप :- इ. ९ वी ते १० वी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याना (अनिवासी) प्रति महा रु.१५०/- (१० महिनेसाठी ) व (निवासी) प्रति महा रु.३५०/- (१० महिनेसाठी ) पुस्तके व तदर्थ अनुदान (वार्षिक) अनिवासी रु.७५०/- व निवासी रु.१,०००/-

  माध्यमिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्याना परिक्षा फी

  उदिष्ट :- मान्यताप्राप्त माध्यमिक शाळेत इयत्ता १० वी मध्ये शिक्षण घेणा-या अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती, वि.जा.भ.ज. व विमाप्रवर्ग मधील विद्यार्थी/विद्यार्थीनी परीक्षा फी

  अ.क्र इयत्ता लाभाचे स्वरुप
  इ. १० वी एस.एस.सी. बोर्डाने ठरवून दिलेली परीक्षा फी रु.३३०/-

  माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या मागावर्गीय विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती

  उदिष्ट :- इयत्ता ५ वी ते ७ वी मधील २ गुणवत्ता धारक मागासवर्गीय विद्यार्थ्याना तसेच इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये शिक्षण घेणा-या पहिल्या २ मागासगर्वीय विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती दिली जाते.

  अटि व शर्ती :-

  १. मान्यताप्राप्त प्राथमिक/ माध्यमिक शाळेतील इ. ५ वी ते १० वीच्या वर्गामध्ये शिकणारा मागासवर्गीय विद्यार्थी असावा.

  २. ही शिष्यवृत्ती मागील वार्षिक परिक्षेत कमीत कमी ५० % व त्याहुन अधिक गुण मिळवून मागासवर्गीय विद्यार्थ्यामधुन प्रथम व व्दितीय क्रमांकात उत्तीर्ण झालेल्या गुणवता प्रदान मागासवर्गीय विद्यार्थ्याना मंजुर करण्यात येईल.

  ३. या शिष्यवृत्तीसाठी मागासवर्गीय विद्यार्थ्याना उत्पन्नाची अट राहणार नाही.

  ४. यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या शाळेतील नियमित हजेरी समाधानकारक प्रगती व चांगली वर्तणूक असल्यास मंजूर करण्यात येईल.

  ५. ही शिष्यवृत्ती दरवर्षी शैक्षणिक वर्षाच्या कालमर्यादे पुरतीच म्हणजेच जून ते मार्च या १० महिन्यासाठी मंजुर करण्यात येईल.

  ६.शिष्यवृत्ती मिळण्यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्याना अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

  ७. ही शिष्यवृत्ती मंजुर करण्यासाठी सर्व मान्यताप्राप्त प्राथमिक व माध्यमिक शाळांतून गुणवत्ता प्रदान मागासवर्गीय विद्यार्थ्याची माहिती मागविण्यात येईल.

  ८. सदरहू शिष्यवृत्ती जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद मंजूर करतील.

  शिष्यवृत्ती स्वरुप :- अनुसूचित जाती विद्यार्थीसाठी

  इयत्ता शिष्यवृत्ती दर कालावधी रुपये
  इ. ५ वी ते ७ वी रु.५०/- दर महा १० महिने जून ते मार्च रु ५००/-
  इ. ८ वी ते १० वी रु.१००/- दर महा १० महिने जून ते मार्च रु १,०००/-

  शिष्यवृत्ती स्वरुप :- अनुसूचित जमाती/वि.जा.भ.ज./वि.मा.प्रवर्ग विद्यार्थीसाठी

  इयत्ता शिष्यवृत्ती दर कालावधी रुपये
  इ. ५ वी ते ७ वी रु.५०/- दर महा १० महिने जून ते मार्च रु २००/-
  इ. ८ वी ते १० वी रु.१००/- दर महा १० महिने जून ते मार्च रु ४००/-

  अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या मुलांना मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती

  अस्वच्छ व्यवसायात काम करणारे , अस्वच्छ व्यवसायाशी परंपरेने संबधीत सफाईगार, कातडी सोलणे, कातडी कमावणे या व्यवयात गुंतलेल्या व्यक्तिच्या पाल्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. १ ली ते २ रीच्या वसतिगृहात न राहणा-या विद्यार्थ्याना रु.११०/- दरमहा व तदर्थ अनुदान रु.७५०/- आणि इयत्ता ३ री ते १० वी वसतिगृहात न राहणा-या विद्यार्थ्यासाठी रु.७५०/- दरमहा व तदर्थ अनुदान रु.१,०००/- दिले जाते.

  उदिष्ट :- अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी व त्यांना समाज प्रवाहात आणणे कामी सदर शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे. या शिष्यवृत्ती योजनेमध्ये केंद्र शासनाने सुधारणा केल असून त्याची अंमलबजावणी दिनांक ०१ एप्रिल, २००८ लागू करण्यात आलेली आहे.

  अटि व शर्ती :-

  १. अस्वच्छ व्यवसायात काम करणारे, अस्वच्छ व्यवयासाशी परंपरेने संबधीत सफाईगार, कातडी सोलणे, कातडी कमावणे या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तिच्या पाल्यांना अनुज्ञेय

  २.ही शिष्यवृत्ती सर्व जाती धर्माला लागू आहे.

  ३. ही योजना केंद्र पुरस्कृत असून यासाठी कोणतीही उत्पन्नाची अट नाही.

  ४. अस्वच्छ व्यवसाय करणा-या व्यक्तींना ग्रामसेवक व सरपंच , नगरपालिक मुख्याधिकारी, महानगरपालिक आयुक्त/ उपायुक्त/ प्रभाग अधिकारी यांच्या कडून अस्वच्छ व्यवसाय करीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

  ५. अनुसूचित जातीमध्ये समावेश केलेल्या पालकांच्या पाल्यासाठी जातीचा दाखला आवश्यक आहे.

  ६. सदर योजना ऑनलाईन झालेमुळे इ.सी.एस द्वारे सदरची शिष्यवृत्ती रक्कम संबधीत विद्यार्थीच्या बॅक खात्यात जमा करण्यात येते.

  लाभाचे स्वरुप :-

  इयत्ता लाभाचे स्वरुप तपशिल
  इ. १ वी ते २ री रु.११०/- दर महा (१० महिन्यासाठी) व तदर्थ अनुदान रु.७५०/- वसतिगृहात न राहणारे
  इ. ३ री ते १० वीरु.११०/- दर महा (१० महिन्यासाठी) व तदर्थ अनुदान रु.७५०/- वसतिगृहात न राहणारे
  इ. ३ री ते १० वी रु.११०/- दर महा (१० महिन्यासाठी) व तदर्थ अनुदान रु.७५०/- वसतिगृहात राहणारे

  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याना विद्यावेतन

  उदिष्ट :- अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याना तांत्रिक शिक्षण देऊन त्यांना विविध क्षेत्रात व्यावसायिक संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे.

  अटि व शती :-

  १. विद्यार्थी अनुसूचित जातीचा व नवबौध्द असावा.

  २. विद्यार्थी मान्यता प्राप्त औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत शिकणारा असावा.

  लाभाचे स्वरुप :-

  १. संस्थेच्या वसतिगृहांत राहणा-या ज्या विद्यार्थ्याना तंत्रशिक्षण विभागाकडून दरमहा रु.६०/- विद्यावेतन देण्यात येते त्या विद्यार्थ्याना समाज कल्याण विभागाकडून दरमहा रु.४०/- पुरक विद्यावेतन देण्यात येते.

  २. तंत्रशिक्षण विभागाकडून ज्यांना विद्यावेतन देण्यात येत नाही त्यांना समाज कल्याण विभागाकडून दरमहा रु.१००/- विद्यावेतन देण्यात येते.

  ३. पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.६५,२९०/- पेक्षा जास्त नसावे.

  ४. सदरचे विद्यावेतन हे फक्त प्रशिक्षण सुरु असेपर्यत देण्यात येते

  शालांत पूर्व शिक्षणासाठी अपंग विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती

  उदिष्ट :- अपंग विद्यार्थ्याना शिक्षणासाठी प्रोत्याहित करणे

  निकष :- १. इयत्ता १ ली ते १० वी पर्यतचे शिक्षण घेणारे अंध,अंशतः अंध, कर्णबधीर व अस्थिविकलांग, मतिमंद, मानसिक आजार व कुष्ठरुग्णमुक्त अपंग विद्यार्थ्यास देण्यात येईल.

  २. कर्णबधिर विद्यार्थीच्या बाबतीत पायरी वर्गातील विद्यार्थ्याना या योजनेचा लाभ देण्यात येईल.

  ३. मतिमंद व मानसिक आजार असलेल्या विद्यार्थ्याच्या बाबतीत इयत्तेचा निकष न लावता नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त मतिमंदाच्या विशेष शाळांतील प्रवेशित विद्यार्थ्याना वयाची १८ वर्षे पुर्ण होईपर्यत या शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येईल.

  ४.अर्जदार शासन अनुदानित वसतिगृहात अथवा अनुदानित निवासी शाळेतील निवासी विद्यार्थी नसावा.

  ५.अर्जदार हा सामान्य शाळेत अथवा अपंगांच्या विशेष शाळेत शिक्षण घेत असल्यास त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

  ६. अर्जदार एकाच वर्गात एका वेळापेक्षा जास्त वेळ अनुत्तीर्ण झाल्यास शिष्यवृत्ती बंद करण्यात येईल.

  ७. अर्जा सोबत वार्षिक परीक्षेच्या निकालाची प्रत (गुणपत्रिकेची सत्यप्रत) जोडणे आवश्यक राहिल.

  ८. अर्जदारने अर्जासोबत अपंग व्यक्ती (समान संधी, हक्कांचे संरक्षण आणि संपुर्ण सहभाग) अधिनियम १९९५ प्रमाणे अपंगांसाठी स्थापन करण्यात आलेले वैद्यकीय मंडळाचे अपंग असल्याचे प्रमाणत्राची सत्यप्रत अर्जासोबत जोडलेल असावे.

  ९.अर्जदार गुणवत्ता शिष्यवृत्ती खेरीज इतर कोणतीही शिष्यवृत्ती घेतलेला नसावा.

  १०. या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नची मर्यादा नाही.

  लाभाचे स्वरुप :- शासन निर्णय दि.३० ऑगस्ट,२०१४ नुसार सुधारित दर

  १. नव्याने अर्ज केलेले अर्जदार तसेच इ. ८ वी चे अर्जदार हे नवीन अर्जदार समजून सदर अर्जदारास खालील दराने १० महिन्यांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल.

  २. गत वर्षी शिष्यवृत्ती मिळालेल्या अर्जदारास (नुतीनकरण अर्जदारास) १२ महिन्याची शिष्यवृत्ती खालील दराने प्रदान करण्यात येईल.

  इयत्ता लाभाचे स्वरुप
  इ. १ ली ते ४ थी रु.१००/- दर महा
  इ. ५ वी ते ७ वी रु.१५०/- दर महा
  इ.८ वी ते १० वी रु.२००/- दर महा
  मतिमंद व मानसिक विकलांग (नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त विशेष शाळेतील) दर महा रु.१५०/-

  शालांत परिक्षोत्तर (मॅट्रिकोत्तर) शिक्षणासाठी अपंग विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती

  उदिष्ट :- अपंग विद्यार्थ्याना शिक्षणासाठी प्रोत्याहित करणे

  निकष :- १. अंध, अंशतःअंध, कर्णबधिर, अस्थिविकलांग, मतिमंद, मानसिक आजार व कुष्ठरुग्णमुक्त अपंग विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.

  २.अर्जदार मान्यता प्राप्त संस्थेमध्ये अथवा मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये माध्यमिक शिक्षणानंतरचे शिक्षण घेत असलेला असावा.

  ३.अर्जदार ज्या मान्यता प्राप्त संस्थेमध्ये अथवा विद्यापीठामध्ये शिक्षण घेत आहे त्याचा दर्जा माध्यमिक शिक्षणाशी समकक्ष नसावा. ते माध्यमिक शिक्षणापेक्षा उच्च दर्जाचे असावेत.

  ४.अर्जदाराने जे शिक्षण एकदा पुर्ण केलेले आहे त्याच दर्जाच्या शिक्षणासाठी त्यंानी परत शिक्षणासाठी प्रवेश घेतलातर त्यास हया शिष्यवृत्तीचा लाभ दिलाजाणार नाही. उदा. बी.कॉम उत्तणी झाले नंतर प्रथम वर्षे बी.एस्सी ला प्रवेश घेतला असेल अथवा एका विषयात एम.ए चे शिक्षण पुर्ण करुन पतर एम.ए च्या दुस-या विषयासाठी प्रवेश घेतला असल्यास.

  ५.अर्जदाराने एकदा व्यावसायिक शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यास परत शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार नाही उदा. एल.एल.बी झाल्यानंतर बी.एड साठी अशा प्रकारच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार नाही.

  ६.वैद्यकीय शिक्षणामध्ये पदवीत्तर शिक्षणासाठी विद्यार्थ्याना बाहेर मेडिकल प्रॅक्टीस करावयास बंदी घातली असेल अशाच विद्यार्थ्याना वैद्यकीय शिक्षणासाठी पदवीत्तर शिक्षण घेणा-या विद्यार्थ्याना या योजनेचा लाभ दिला जाईल.

  ७.अर्जदाराने आर्टस, सायन्स, कॉमर्स मधील पदवी अथवा पदवीत्तर शिक्षण अर्धवट सोडून त्यानी जर मान्यताप्राप्त व्यावसायिक शिक्षण/तंत्रशिक्षण प्रमाणपत्र/ पदविका/पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यास या शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येईल मात्र गट-अ वगळता इतर आभ्यासक्रमातमधील विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्यांची शिष्यवृत्ती बंद करण्यात येईल.

  ८.अर्जदार गट अ वगळता प्रत्येक वर्षी उतीर्ण असणे आवश्यक आहे. गट अ अभ्यासक्रमातील अपंग विदयार्थी एक वेळ अनुतीर्ण झाला तर शिष्यवृत्ती पुढे चालु ठेवता येईल. मात्र तो दुस-यांदा अनुतीर्ण झाल्यास शिष्यवृत्ती दिली जाणार नाही.

  ९. जे अर्जदार मान्यता प्राप्त विदयापिठाचा अथवा संस्थेचा पत्रव्यवहाराव्दारे अभ्यासक्रम पुर्ण करतात अभ्यासक्रमासाठी अथवा निरंतर शिक्षणासाठी अर्जदाराला संबंधीत संस्थेचे ना परतावा शुल्क भरावे लागत असल्यास अशा विदयार्थ्याना वार्षिक रुपये ५००/- आवश्यक पुस्तके व साहित्य खरेदी करण्याकरीता अर्थसहाय्य देण्यात येईल.

  १०. जे विदयार्थी पुर्णवेळ नियमित शिक्षण घेत असतील अशाच विदयार्थ्याना शिष्यवृत्ती दिली जाईल. या कालावधीत पुर्ण वेळ नोकरी करणा-या विदयार्थ्याना शिष्यवृत्ती दिली जाणार नाही.

  ११.अर्जदार सदरहू शिक्षणासाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती खेरीज इतर कोणतीही शिष्यवृत्ती अथवा विद्यावेतन घेत नसावा.

  १२. अर्जदार शासनाकडून अनुदान देण्यात येणा-या निशुल्क भोजन व निवासाची सोय असणा-या वसतिगृहात राहत असल्यास जर त्या अर्जदारास पाठयपुस्तिकेवर साहित्यावर खर्च करावा लागत असल्यास अशा अर्जदारास सदरहू खर्चाकरीता वसतिगृहवाशी विद्यार्थ्याच्या १/३ दराने निर्वा भत्ता देण्यात येईल.

  १३.अर्जासोबत वार्षिक परिक्षेच निकालाची प्रत (गुणपत्रिकेची प्रत) जोडणे आवश्यक आहे.

  १४.अर्जदाराने अर्जासोबत अपंग व्यक्ती (समान संधी,हक्कांचे संरक्षण आणि संपुर्ण सहभाग) अधिनियम १९९५ प्रमाणे अपंग व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या वैद्यकीय मंडळाचे अपंगत्व असल्याचे व अपंगत्वाचा लाभ मिळण्यास पात्र प्रमाणपत्र अर्जासोबत जोडलेले असावे.

  १५.जे अपंग विद्यार्थी विद्यालयाच्या, महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या अथवा मान्यताप्राप्त वसतिगृहात राहत असतील व त्यासाठी त्यांना वसगिृहाचे शुल्क द्यावे लागत असल्यास अशा विद्यार्थ्याना वसतिगृहवाशी विद्यार्थ्याच्या दराने शिष्यवृत्ती देण्यात यावी.

  १६.सदरहू शिष्यवृत्ती घेण्यासाठी अपंग अर्जदारास उत्पन्नाची कोणतीही अट राहणार नाही.

  लाभाचे स्वरुप :- शासन निर्णय दि.३० ऑगस्ट,२०१४ नुसार सुधारित दर

  अ.क्र. अभ्यासक्रमाचा गट शिष्यवृत्तीची रक्कम
  वसतिगृहात राहणारे वसतिगृहात न राहणारे
  गट-अ (वैद्यकीय व अभियांत्रिक पदवी शिक्षण, अॅग्रीकल्चर, व्हेटनरी
  मधील पदवी व पदवीत्तर शिक्षण
  रु.१२००/- दरमहा रु.५५०/- दरमहा
  गट-ब (अभियांत्रिकी, तांत्रिक, स्थापत्य, वैद्यक शास्त्र,
  पदवीका आभ्यासक्रम
  रु.८२०/- दरमहा रु.५३०/- दरमहा
  गट-क (कला, विज्ञान, वानिज्य मधील पदवीत्तर अभ्यासक्रम
  तसेच व्यावसासिक पदवीका आभ्यासक्रम
  रु.८२०/- दरमहा रु.५३०/- दरमहा
  गट- इ द्वितीय वर्ष व त्यानंतर चा पदवी पर्यंतचा अभ्यासक्रम रु.५७०/- दरमहा रु.३००/- दरमहा
  गट- इ (अकरावी व १२ वी व पदवी प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम) रु.३८०/- दरमहा रु.२३०/- दरमहा

  शिष्यवृत्तीच्या रक्कमे बरोबर विद्यापीठांनी / शिक्षण शुल्क समितीने मान्य केलेले शिक्षण शुल्क, अंधविद्यार्थ्याना वाचक भत्ता, प्रकल्प टंकलेखन खर्च, अभ्यासदौरा खर्च देण्यात येतो.

  स्वयंरोजगारासाठी अपंग व्यक्तींना वित्तीय सहाय्य (बीजभांडवल)

  उदिष्ट :- अपंग व्यक्तिना लघू उद्योगासाठी वित्तीय सहाय्य उपलब्ध करुन देणे.( सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांक- अपंग २००८/ प्र.क्र.२१२/सुधार-३/ मंत्रालय विस्तार भवन, मुंबई दिनांक- २ जुलै,२०१० अन्वये)

  निकष :-

  १. सदर योजनेसाठी अर्जदाराचे वयोमर्यादा १८ ते ५० वर्षे आहे.

  २. सदर योजनेसाठी शैक्षणिक पात्रता व प्रशिक्षणाची अट नाही.

  ३. अर्जदार हा महाराष्ट्राचा अधिकृत रहिवाशी असला पाहिजे.

  ४. वार्षिक उत्पन्न रु.१.०० लाखापेक्षा कमी असावे.

  ५. जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडील/त्रिसदसीय समितीचे वैद्यकीय प्रमाणपत्र

  ६.अपंग व्यक्ती हा बेरोजगार असावा.

  ७. ज्या व्यवसायासाठी प्रस्ताव सादर करावयाचा आहे. त्या व्यवसायाचे व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र/दरपत्रक (कोटेशन)/ प्रकल्प अहवाल सादर करणे आवश्यक.

  लाभाचे स्वरुप :- रु.१.५० लाखापर्यतच्या व्यवसायाकरीता ८० * बॅकेमार्फत कर्ज व २० * अथवा कमाल मर्यादा ३०,०००/- सबसिडी स्वरुपात अर्थसहाय्य.

  अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने पुरविणे

  उद्देश :- अपंगाचे शारीरिक पुनर्वसन करणे.

  निकष :-

  १. अपंग व्यक्तीचे दरमहा उत्पन्न रु.२,०००/- पेक्षा कमी असावे.

  २. अपंग व्यक्तिचे किमान ४० वा त्यापेक्षा जास्त टक्कयांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र असावे.

  ३.महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.

  ४. उपकरणाची / साधनाची आवश्यता असल्याचे तज्ञांचे शिफारस पत्र असावेत.

  लाभाचे स्वरुप :- अस्थिव्यंग अपंग व्यक्तींना तीनचाकी सायकल, कृत्रिम अवयव, कुबडया, कॅलिपर्स इत्यादी साधने तसेच अंध व्यक्तींना चष्मे, काठया इयत्ता १० पुढील व्यक्तींना शिक्षणासाठी टेपरेकॉर्डर कर्णबंधीरांसाठी वैयक्तिक श्रवणयंत्र इत्यादी साधनासाठी रु.३,०००/- पर्यतचे अर्थ सहाय्य उपलब्ध करुन देणे.

  संपर्क:- महाराष्ट्र राज्य, अपंग वित्त व विकास महामंडळ,मुंबई जिल्हा कार्यालय- सामाजिक न्याय भवन, नासर्डी पुलाजवळ, नाशिक -पुणे रोड,नाशिक.

  अपंग- अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्याहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना

  उद्देश :- समाजातील अपंगत्व असलेल्या व्यक्तीना सर्वसाधारण व्यक्तींप्रमाणे आपले कौटोबिक जीवन व्यतीत करता यावे साठी अपंग व अपंगत्व नसलेल्या व्यक्तींच्या विवाहास प्रोत्याहन दिल्यास निश्चिम पणे अपंग व्यक्तींशी अपंगत्व नसलेल्या व्यक्ती विवाह करण्यास प्रोत्याहित होतात. याकरीता राज्यात आंतरजातीय विवाहाच्या धरतीवर अपंग व अपंगव्यक्तीच्या विवाहास प्रोत्याहन देणे.

  सदर योजनेच्या अटी व शर्ती :-

  १. वधू अथवा वराकडे अपंग व्यक्ती अधिनियप्रमाणे किमान ४०* अथवा त्यापेक्षा जास्त अपंगत्वाचे सक्षम प्राधिका-याने दिलेले प्रमाणपत्र असावे.

  २. अपंग वधू अथवा वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.

  ३. विवाहीत वधू व वराचा प्रथम विवाह असावा. वधू अथवा वर घटस्फोटीत असल्यास अशा प्रकारची मदत यापूर्वी घेतलेली नसावी.

  ४.विवाह हा कायदेशीररित्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदविलेला असावा.

  ५.विवाह झाल्यानंतर किमान एका वर्षाच्या आत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबधीत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे अर्ज करणे आवश्यक आहे.

  लाभाचे स्वरुप :-

  १. रक्कम रु. २५,०००/- चे बचत प्रमाणपत्र

  २. रु. २०,०००/- रोख स्वरुपात.

  ३. रु.४,५००/- संसारपयोगी साहित्य व वस्तु खरेदीसाठी.

  ४. रु.५००/- स्वागत समारंभाच्या कार्यक्रमासाठी असे एकूण रु.५०,०००/-

  आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य

  उदिष्ट :- अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती व विमुक्त जाती, भटक्या जमाती यापैकी एक व्यक्ती आणि सवर्ण हिदू, जैन लिगायत, बौध्द, शिख यापैकी दुसरी व्यक्ती अशांनी विवाह केल्यास त्यास आंतरजातीय विवाह संबोधण्यात येते. शासन निर्णय दि.०६ ऑगस्ट,२००४ अन्वये मागासवर्गातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती , विमुक्त जाती, भटक्या जमाती यामधील आंतर प्रवर्गातील विवाहीतांना सदर योजना लागू करण्यात आली आहे.

  स्वरुप :- शासन निर्णय परिपत्रक दिनांक- १५ मार्च, १९९६ च्या अन्वये ३१ जानेवारी, २०१० पर्यतच्या ज्या आंतरजातीय विवाहीत दांपत्यास विवाह झालेला आहे अशा दांपत्यास प्रोत्साहनपर म्हणून रु.७०००/- धनाकर्ष, रु.७५००/- बचत प्रमाणपत्र, रु.४००/- संसारपयोगी वस्तु व रु.१००/- सत्कार समारंभ असे एकूण रु.१५,०००/- अर्थसहाय्य देय आहे व सुधारित शासन निर्णय दि. ०१ फेब्रुवारी,२०१० नुसार सदर दिनांकापासून पुढील आंतरजातीय विवाहीत झालेल्या दांपत्यास प्रोत्साहनपर रु.५०,०००/- अर्थसहाय्याचा धनाकर्ष पती पत्नीच्या संयुक्त नावाने प्रदाने करण्यात येतो.

  महाराष्ट्र राज्यातील मान्यवर वृध्द साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना

  स्वरुप :- राज्यातील मान्यवर वृध्द साहित्यिक व कलावंत यांना मानधन ही योजना राज्य शासना मार्फत सन- १९५४-५५ पासून राबविण्यात येते.

  अटी व शर्ती :-

  १. साहित्य व कला या क्षेत्रात ज्यांनी मोलाची भर घातली आहे अशी व्यक्ती

  २. कला व वाड.मय क्षेत्रात ज्यांनी किमान १५ ते २० वर्ष इतक्या प्रदिर्घ काळासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली आहे अशी व्यक्ती

  ३. ज्या स्त्री / पुरष कलाकाराचे वय ५० पेक्षा जास्त आहे अशी व्यक्ती

  ४. साहित्यिक व कलावंत यांच्य निधनानंतर त्यांच्या विधवा पत्नी / वधुर पती यांना त हयात मानधन मिळेल.

  ५. जे साहित्यिक व कलावंत अर्धांगवायू / क्षय /कर्करोग / कृष्ठरोग या रोगांनी आजारी असतील तसेच ज्यांना ४० % पेक्षा जास्त शारिरीक व्यंग असेल किवा अपघाताने ४० % पेक्षा जास्त अपंगत्व आले असेल व त्यामुळे ते स्वतःचा व्यवसाय करु शकत नसतील असे साहित्यिक व कलावंत यांच्यासाठी वयाची अट शिथील करण्यात येईल.

  ६. वयाने वडील असणा-या व विधवा / परीतक्त्या वृध्द साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्यासाठी प्राधान्यक्रम देण्यात येईल.

  ७. ज्या साहित्यिक व कलावंताचे सर्व मार्गाने मिळून वार्षिक उत्पन्न मिळून ४८,०००/- पेक्षा जास्त नाही.

  मानधन स्वरुप :-

  अ.क्र कलावंताची वर्गवारी मानधनाची रक्कम (मासिक) मानधनाची रक्कम (वार्षिक)
  अ (राष्ट्रीय कलावंत) रु.२,१००/- रु.२५,२००/
  ब (राज्यस्तरीय कलावंत ) रु.१,८००/ रु.२१,६००/
  क (स्थानिक कलावंत) रु.१,५००/ रु. १८,०००/

  निवड समिती :- प्रत्येक जिल्हयासाठी या योजनेतंर्गत मानधनासाठी साहित्यिक व कलावंत यांना पात्र ठरविण्यासाठी जिल्हास्तरीय निवड समिती गठीत करण्यात येईल. जिल्हा निवड समितीने प्रत्येक आर्थिक वर्षी बैठक घेणे व त्याचप्रमाणे बैठकीत छाननी अंती निकषांची पुर्तता करणा-या पात्र अर्जामधून इष्टांकानुसार ६० साहित्यिक व कलावंत यांची निवड बंधनकारक राहिल.

  इष्टांकानुसार कलाकार निवडीची टक्केवारी:-

  अ.क्र कलावंताची वर्गवारी टक्केवारी
  अ (राष्ट्रीय कलावंत)१० %
  ब (राज्यस्तरीय कलावंत ) ३० %
  क (स्थानिक कलावंत) ६० %

  वृध्दकलावंत निवड समिती :-

  अ.क्र नांव पद
  मा.पालकमंत्री यांनी निवड केलेली व्यक्ती अध्यक्ष
  मा.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य सचिव
  मा.पालकमंत्री विविध कला व साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्ती सदस्य
  जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेला (वर्ग-१ चा अधिकारी) प्रतिनिधी सदस्य

  १३ वने ७ % वनमहसुल अनुदानातुन वन विभागातील / जंगल भागातील लाभार्थीना साहित्य पुरविणे.

  स्वरुप :- जिल्हा परिषदांनी हे अनुदान शासन निर्णयानुसार जंगल क्षेत्रातील आदिवासीच्या विकासाकरीता आवश्यक वाटतील अशा योजनांवर व जंगल क्षेत्राच्या विकासासाठी असणा-या योजनावर खर्च करण्यात येते.

  अटी व शर्ती :-

  १. लाभधारकाचा दारिद्रय रेषेखालील कार्ड धारक अथवा रु.३५,०००/- आत वार्षिक उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार यांचेकडील)

  २. लाभधारक स्थानिक रहिवाशी असलेबाबत दाखला.

  ३. यापुर्वी या योजनेचा लाभ घेतला नाही असा ग्रामसेवकाचा दाखला.

  ४. लाभधारक म.मुख्य वन संरक्षक, नाशिक यांनी पुरविलेल्या यादीतील जंगल/ वनभागातील असावा.

  ५.लाभ धारक हा अनुसूचित जमातीतील असल्याचा सक्षम प्राधिकारी यांचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.

  ६.लाभधारक १० % लाभार्थी हिस्सा भरण्यास तयार असल्याबाबत लेखी पत्र.

  लाभार्थी निवड :- लाभार्थीची निवड ही समाज कल्याण समिती, जिल्हा परिषद यांचे मार्फत करण्यात येत.

  अ.क्र समिती सदस्य हुद्दा
  मा.सभापती, समाज कल्याण समिती अध्यक्ष
  मा.समाज कल्याण समिती सदस्य (सर्व) सदस्य
  मा.जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य सचिव

  समिती वनविभागाने पुरविलेल्या गांवाच्या हद्दितील निकष पात्र लाभार्थीना दयावयाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांची निवड वरील समितीच्या अधिन आहे.

  जिल्हा परिषद २० % सेस मधुन घेण्यात येणा-या योजना

  ९० टक्के अनुदानावर ग्रामीण भागातील मागासवर्गीय बेरोजगारांना व्यवसायासाठी चारचाकी मालवहातुक वाहने पुरविणे

  योजनेचे स्वरुप :- जिल्हा परिषदेच्या प्रत्येक आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात २० % सेस मधून मागासवर्गीयांचे कल्याणासाठी वैयक्तिक स्वरुपाच्या लाभाच्या योजना राबवून त्यांचे राहणीमान व जीवनमान उंचावणे.

  योजनेचे निकष पात्रतेच्या अटी व शर्ती :

  १) लाभार्थी हा मागासवर्गीय असावा (अ.जा/अ.ज/विजाभज)

  २) लाभार्थीचा सक्षम अधिकारी ( तहसिलदार ) यांचेकडीलजातीचा दाखला.

  ३) लाभार्थींचा दारिद्रय रेषा कार्ड क्रमांक अथवा रु.३५,०००/-चे आंत उत्पन्नांचा दाखला ( तहसिलदार यांचेकडील)

  ४) लाभार्थी स्थानिक रहिवाशी असले बाबतचा दाखला (ग्रा.से)

  ५) यापुर्वी या योजनेचा लाभ धेतलेला नाही असा ग्रामसेवक यांचा दाखला.

  ६) कुंटूबातील कोणीही व्यक्ती शासकिय अथवा निमशासकिय सेवेत नाही याबाबतचा

  ७) लाभधारक बेरोजगार व पात्र असलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

  ८) लाभार्थीच्या नांवे चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना ( ड्रायव्हींग लायसन्स)

  ९) लाभार्थी १० टक्के लाभार्थी हिस्सा भरण्यास तयार असले बाबत संमती पत्र.

  १०) वाहन लाभार्थ्याच्या नांवे करणे कामी आर टी ओ टॅक्स/ इन्शुरन्स/ नोंदणी फी लाभार्थी भरणेस तयार असले बाबतचे संमती पत्र

  ग्रामीण भागातील मागासवर्गीय शेतकयांना शेती उपयोगी एच डी पी ई पाईप पुरविणे

  योजनेचे स्वरुप :- जिल्हा परिषदेच्या प्रत्येक आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात २० % सेस मधून मागासवर्गीयांचे कल्याणासाठी वैयक्तिक स्वरुपाच्या लाभाच्या योजना राबवून त्यांचे राहणीमान व जीवनमान उंचावणे.

  योजनेचे निकष पात्रतेच्या अटी व शर्ती :-

  १) लाभधारक हा मागासवर्गीय असलेबाबत सक्षम प्राधिकारी यानी दिलेला जातीचा दाखला आवश्यक आहे.( अ.जा. / अ.ज. / वि.जा.भ.ज. )

  २) दारिद्गयरेषेखालील असलेबाबतचा दाखला ( सन २००२/२००७) अथवा लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये ३५,०००/ च्या आंत असलेबाबतचा दाखला सन २०१५१६

  ३) लाभधारकाच्या कुटुंबातील कोणीही शासकिय सेवेत नसलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

  ४) लाभधारकाने यापूर्वी सदरच्या योजनेचा लाभ घेतला नसलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

  ५) लाभधारक गरजु व पात्र असलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

  ६) लाभधारक स्थानिक रहिवाशी असलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

  ७) एच.डी.पी.ई.पाईप पुरविणेच्या योजनेकरिता लाभधारकाचा ७/१२, खातेउतायावरील जमिनीचे क्षेत्र ३ हेक्टरच्या आंत असणे आवश्यक आहे तसेच लाभधारकाकडे ऑईल इंजिन / इलेक्ट्रीक मोटार असले बाबतचा ग्रासे यांचा दाखला.त्याचप्रमाणे पाणी उपलब्ध साधनाबाबत ७ / १२ उतायावर (विहीर) नोंद आवश्यक आहे.

  ग्रामीण भागातील मागासवर्गीयलाभार्थ्याना ताडपत्री पुरविणे.

  योजनेचे स्वरुप :- जिल्हा परिषदेच्या प्रत्येक आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात २० % सेस मधून मागासवर्गीयांचे कल्याणासाठी वैयक्तिक स्वरुपाच्या लाभाच्या योजना राबवून त्यांचे राहणीमान व जीवनमान उंचावणे.

  योजनेचे निकष पात्रतेच्या अटी व शर्ती :-

  १) लाभार्थी हा मागासवर्गीय असावा. (अ.जा/अ.ज./विजाभज)

  २) लाभार्थीचा सक्षम अधिकारी (तहसीलदार) यांचेकडील जातीचा दाखला. असलेबाबतचा दाखला

  ३) लाभार्थीचा दारिद्गय रेषा कार्ड क्रमांक अथवा रू.३५०००/ चे आंत उत्पन्नाचा दाखला.(तहसीलदार यांचे कडील सन २०१५१६)

  ४) लाभधारकाने यापूर्वी सदरच्या योजनेचा लाभ घेतला नसलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

  ५) यापुर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नाही असा ग्रामसेवक यांचा दाखला.

  ६) कुटुंबातील कोणीही व्यक्ती शासकीय अथवा निम शासकीय सेवेत नाही याबाबतचा ग्रामसेवक यांचा दाखला.

  ७) ताडपत्री पुरविणेच्या या योजनेसाठी लाभ धारकाचा ७/१२ उतारा ३ हेक्टरच्या आंत शेती असणे आवश्यक आहे

  ग्रामीण भागातील मागासवर्गीय होतकरु विद्यार्थ्याना १०० टक्के अनुदानावर संगणक संच पुरविणे

  योजनेचे स्वरुप :- जिल्हा परिषदेच्या प्रत्येक आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात २० % सेस मधून मागासवर्गीयांचे कल्याणासाठी वैयक्तिक स्वरुपाच्या लाभाच्या योजना राबवून त्यांचे राहणीमान व जीवनमान उंचावणे.

  योजनेचे निकष पात्रतेच्याअटी व शर्ती :-

  १) लाभार्थी हा मागासवर्गीय असावा (अ.जा/अ.ज/विजाभज)

  २) दारिद्गय रेषेखालील असलेबाबतचा दाखला ( सन २००२/२००७) अथवा लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये ३५,०००/ च्या आंत असलेबाबतचा दाखला सन २०१५२०१६

  ३) लाभधारकाच्या कुटुंबातील कोणीही शासकिय सेवेत नसलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

  ४) लाभधारकाने यापूर्वी सदरच्या योजनेचा लाभ घेतला नसलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

  ५) लाभधारक गरजु व पात्र असलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

  ६) लाभधारक स्थानिक रहिवाशी असलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

  ७) लाभार्थ्याचा स्वतःच्या घराचा नमुना नं. ८ चा उतारा किंवा जागा भाडयाची असल्यास त्या घरमालकाचा करारनामा जोडणे आवश्यक आहे.

  ८) लाभार्थी १२ वी पास असल्याचे व एमएससीआयटी (MS-CIT)उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

  १०० टक्के अनुदानावर ग्रामीण भागातील मागासवर्गीयांना व्यवसायासाठी पिको फॉल शिलाई मशिन पुरविणे

  योजनेचे स्वरुप :- जिल्हा परिषदेच्या प्रत्येक आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात २० % सेस मधून मागासवर्गीयांचे कल्याणासाठी वैयक्तिक स्वरुपाच्या लाभाच्या योजना राबवून त्यांचे राहणीमान व जीवनमान उंचावणे.

  योजनेचे निकष पात्रतेच्या अटी व शर्ती :-

  १) लाभधारक हा मागासवर्गीय असलेबाबत सक्षम प्राधिकारी यानी दिलेला जातीचा दाखला आवश्यक आहे. ( अ.जा. / अ.ज. / वि.जा.भ.ज. )

  २) दारिद्गय रेषेखालील असलेबाबतचा दाखला ( सन २००२/२००७) अथवा लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये ३५,०००/ च्या आंत असलेबाबतचा दाखला सन २०१५२०१६

  ३) लाभधारकाच्या कुटुंबातील कोणीही शासकिय सेवेत नसलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

  ४) लाभधारकाने यापूर्वी सदरच्या योजनेचा लाभ घेतला नसलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

  ५) लाभधारक गरजु व पात्र असलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

  ६) लाभधारक स्थानिक रहिवाशी असलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

  ७) महीला लाभार्थ्याना प्राधान्य देण्यात यावे.

  ८) व्यवसायासाठी जागा उपलब्ध असल्याचा ग्राम सेवकाचा दाखला

  १०० टक्के अनुदानावर ग्रामीण भागातील मागासवर्गीयांना व्यवसायासाठी शेवया मशिन पुरविणे

  योजनेचे स्वरुप :- जिल्हा परिषदेच्या प्रत्येक आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात २० % सेस मधून मागासवर्गीयांचे कल्याणासाठी वैयक्तिक स्वरुपाच्या लाभाच्या योजना राबवून त्यांचे राहणीमान व जीवनमान उंचावणे.

  योजनेचे निकष पात्रतेच्या अटी व शर्ती :-

  १) लाभधारक हा मागासवर्गीय असलेबाबत सक्षम प्राधिकारी यानी दिलेला जातीचा दाखला आवश्यक आहे. ( अ.जा. / अ.ज. / वि.जा.भ.ज. )

  २) दारिद्गय रेषेखालील असलेबाबतचा दाखला ( सन २००२/२००७) अथवा लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये ३५,०००/ च्या आंत असलेबाबतचा दाखला सन २०१५२०१६

  ३) लाभधारकाच्या कुटुंबातील कोणीही शासकिय सेवेत नसलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

  ४) लाभधारकाने यापूर्वी सदरच्या योजनेचा लाभ घेतला नसलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

  ५) लाभधारक गरजु व पात्र असलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

  ६) लाभधारक स्थानिक रहिवाशी असलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

  ७) महीला लाभार्थ्याना प्राधान्य देण्यात यावे.

  ८) व्यवसायासाठी जागा उपलब्ध असल्याचा ग्राम सेवकाचा दाखला

  १०० टक्के अनुदानावर ग्रामीण भागातील मागासवर्गीयांना व्यवसायासाठी मसाला कांडप यंत्र पुरविणे

  योजनेचे स्वरुप :- जिल्हा परिषदेच्या प्रत्येक आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात २० % सेस मधून मागासवर्गीयांचे कल्याणासाठी वैयक्तिक स्वरुपाच्या लाभाच्या योजना राबवून त्यांचे राहणीमान व जीवनमान उंचावणे.

  योजनेचे निकष पात्रतेच्या अटी व शर्ती :-

  १) लाभधारक हा मागासवर्गीय असलेबाबत सक्षम प्राधिकारी यानी दिलेला जातीचा दाखला आवश्यक आहे.( अ.जा. / अ.ज. / वि.जा.भ.ज. )

  २) दारिद्गय रेषेखालील असलेबाबतचा दाखला ( सन २००२/२००७) अथवा लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये ३५,०००/ च्या आंत असलेबाबतचा दाखला सन २०१५२०१६ दाखला

  ३) लाभधारकाच्या कुटुंबातील कोणीही शासकिय सेवेत नसलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

  ४)लाभधारकाने यापूर्वी सदरच्या योजनेचा लाभ घेतला नसलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

  ५) लाभधारक गरजु व पात्र असलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

  ६) लाभधारक स्थानिक रहिवाशी असलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

  ७) महीला लाभार्थ्याना प्राधान्य देण्यात यावे.

  ८) व्यवसायासाठी लाभार्थ्याकडे स्वताची जागा नमुना ८अ किंवा जागा भाडयाची असल्यास त्याघरमालकांचा करारनामा जोडणे आवश्यक आहे.

  ९) व्यवसायासाठी विद्यृत पुरवठा असल्या बाबत ग्रामसेवक यांचा दाखला जोडणे आवश्यक आहे.

  १०० टक्के अनुदानावर ग्रामीण भागातील मागासवर्गीयांना शेतकयांना विद्यृत पंप पुरविणे

  योजनेचे स्वरुप :- जिल्हा परिषदेच्या प्रत्येक आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात २० % सेस मधून मागासवर्गीयांचे कल्याणासाठी वैयक्तिक स्वरुपाच्या लाभाच्या योजना राबवून त्यांचे राहणीमान व जीवनमान उंचावणे.

  योजनेचे निकष पात्रतेच्या अटी व शर्ती :-

  १) लाभधारक हा मागासवर्गीय असलेबाबत सक्षम प्राधिकारी यानी दिलेला जातीचा दाखला आवश्यक आहे.( अ.जा. / अ.ज. / वि.जा.भ.ज. )

  २) दारिद्गय रेषेखालील असलेबाबतचा दाखला ( सन २००२/२००७) अथवा लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये ३५,०००/च्या आंत असलेबाबतचा दाखला सन २०१५२०१६

  ३) लाभधारकाच्या कुटुंबातील कोणीही शासकिय सेवेत नसलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

  ४)लाभधारकाने यापूर्वी सदरच्या योजनेचा लाभ घेतला नसलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

  ५) लाभधारक गरजु व पात्र असलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

  ६) लाभधारक स्थानिक रहिवाशी असलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

  ७) लाभ धारकांचा ७/१२ खाते उतायावरील जमीनीचे क्षेत्र ३ हेक्टरच्या आंत असणे आवश्यक आहे.

  ८) ७/१२ उतायावर विहीरीची नोंद आवश्यक

  ग्रामीण भागातील मागासवर्गीय लाभार्थ्याना १०० टक्के अनुदानावर झेरॉक्स मशिन पुरविणे

  योजनेचे स्वरुप :- जिल्हा परिषदेच्या प्रत्येक आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात २० % सेस मधून मागासवर्गीयांचे कल्याणासाठी वैयक्तिक स्वरुपाच्या लाभाच्या योजना राबवून त्यांचे राहणीमान व जीवनमान उंचावणे.

  योजनेचे निकष पात्रतेच्या अटी व शर्ती :-

  १) लाभधारक हा मागासवर्गीय असलेबाबत सक्षम प्राधिकारी यानी दिलेला जातीचा दाखला आवश्यक आहे.( अ.जा. / अ.ज. / वि.जा.भ.ज. )

  २) दारिद्गय रेषेखालील असलेबाबतचा दाखला ( सन २००२/२००७) अथवा लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये ३५,०००/च्या आंत असलेबाबतचा दाखला सन २०१५२०१६

  ३) लाभधारकाच्या कुटुंबातील कोणीही शासकिय सेवेत नसलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

  ४)लाभधारकाने यापूर्वी सदरच्या योजनेचा लाभ घेतला नसलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

  ५) लाभधारक गरजु व पात्र असलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

  ६) लाभधारक स्थानिक रहिवाशी असलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

  ७) व्यवसायासाठी लाभार्थ्याकडे स्वतःची जागा नमुना ८अ किंवा जागा भाडयाची असल्यास त्या घरमालकांचा करारनामा जोडणे आवश्यक आहे

  ८) व्यवसायासाठी विद्यृत पुरवठा असल्याबाबत ग्रामसेवक यांचा दाखला जोडणे आवश्यक आहे

  १०० टक्के अनुदानावर ग्रामीण भागातील मागासवर्गीयांना पिठाची गिरणी पुरविणे

  योजनेचे स्वरुप :- जिल्हा परिषदेच्या प्रत्येक आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात २० % सेस मधून मागासवर्गीयांचे कल्याणासाठी वैयक्तिक स्वरुपाच्या लाभाच्या योजना राबवून त्यांचे राहणीमान व जीवनमान उंचावणे.

  योजनेचे निकष पात्रतेच्या अटी व शर्ती :-

  १) लाभधारक हा मागासवर्गीय असलेबाबत सक्षम प्राधिकारी यानी दिलेला जातीचा दाखला आवश्यक आहे.( अ.जा. / अ.ज. / वि.जा.भ.ज. )

  २) दारिद्गय रेषेखालील असलेबाबतचा दाखला ( सन २००२/२००७) अथवा लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये ३५,०००/च्या आंत असलेबाबतचा दाखला सन २०१५२०१६

  ३) लाभधारकाच्या कुटुंबातील कोणीही शासकिय सेवेत नसलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

  ४)लाभधारकाने यापूर्वी सदरच्या योजनेचा लाभ घेतला नसलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

  ५) लाभधारक गरजु व पात्र असलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

  ६) लाभधारक स्थानिक रहिवाशी असलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

  ७) महीला लाभार्थ्याना प्राधान्य देण्यात यावे

  ८) व्यवसायासाठी लाभार्थ्याकडे स्वताची जागा नमुना ८अ किंवा जागा भाडयाची असल्यास त्याघरमालकांचा करारनामा जोडणे आवश्यक आहे

  ९) व्यवसायासाठी विद्यृत पुरवठा असल्या बाबत ग्रामसेवक यांचा दाखला जोडणे आवश्यक आहे.

  जिल्हा परिषद २० % सेस मधुन राबविण्यात येणा-या सर्व योजनांना खालील समिती मध्ये अंतिम मान्यता घेण्यात येते

  अ.क्र समिती सदस्य हुद्दा
  मा.सभापती, समाज कल्याण समिती अध्यक्ष
  मा.समाज कल्याण समिती सदस्य (सर्व) सदस्य
  मा.जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य सचिव
  शीर्षक देवाण दिनांक आकार (KB) डाउनलोड
  - - - -
  शीर्षक देवाण दिनांक आकार (KB) डाउनलोड
  - - - -
  शीर्षक देवाण दिनांक आकार (KB) डाउनलोड
  - - - -
  शीर्षक देवाण दिनांक आकार (KB) डाउनलोड
  सन २०२२-२३ या वर्षांपासुन नाशिक जिल्हयाच्या ग्रामिण भागातील अनु.जाती जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील निवडक गुणवंत आणि होतकरु मागासवर्गीय विदयार्थ्याना कमवा आणि शिका योजना कागदपत्रे पडताळणीअंतीम निवड व प्रतिक्षा यादी 18/07/2022 207
  सन २०२२-२३ या वर्षांपासुन नाशिक जिल्हयाच्या ग्रामिण भागातील अनु.जाती जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील निवडक गुणवंत आणि होतकरु मागासवर्गीय विदयार्थ्याना कमवा आणि शिका योजनेसाठी इच्छुक असलेल्या विदयार्थ्याना स्वारस्य अर्ज करणे 28/06/2022 461
  शीर्षक देवाण दिनांक आकार (KB) डाउनलोड
  शासकीय अंधशाळा, नाशिक या निवासी संस्थेकरीता सन २०२३-२०२४ या वर्षात किराणा, भाजीपाला खरेदी, कापड धुलाई, धान्य दळण, केसकर्तन, स्टशनरी इ. बाबींची दरपत्रके मागविणे बाबत. 10/05/2023 1986
  सन २०२२-२३ या वर्षात अन्नधान्य व किराणा, भाजीपाला, बुध, गणवेश खरेदी, कापड धुलाई, धान्य दळण, केसकर्तन, स्टेशनरी इत्यादी बाबींसाठी दरपत्रके सादर करणेबाबत.. 13/06/2022 1955
  शासकीय अंधाशाळा नाशिक या निवासी संस्थेकरीता सन 2020-2021 या वर्षात भाजीपाला, दुध, गणवेश खरेदी, कापड धुलाई, धान्य दळण, केसकर्तन इ.बाबींसाठी दरपत्रके सादर करणे बाबत. 17/06/2020 1965
  शीर्षक देवाण दिनांक आकार (KB) डाउनलोड
  समाजकल्याण विभाग लेखापरीक्षण अहवाल(Audit Report)-2017-2018 27/08/2019 5180