स्वच्छ भारत अभियान - पार्श्वभूमी
स्वच्छ भारत अभियान काय आहे ?
स्वच्छ भारत अभियानाचे घटक -
१) स्वच्छ व शुध्द पाण्याची उपलब्धता
२) वैयक्तिक स्वच्छता
३) परिसर स्वच्छता/ गावाची स्वच्छता
४) घर व अन्न पदार्थांची स्वच्छता
५) सांडपाण्याची व्यवस्था
६) घनकचर्याचे योग्य व्यवस्थापन
७) मानवी विष्ठेचे व्यवस्थापन (वैयक्तिक शौचालय)
वैयक्तिक शौचालय
घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन कार्यक्रम
सार्वजनिक शौचालय
अभियानाची प्रमुख उद्यीष्टे -
१) देशाच्या ग्रामीण भागातील जीवनमानाची गुणवत्ता उंचावणे
२) देशाच्या ग्रामीण भागात स्वच्छता कार्यक्रमाची व्यापकता वाढविणे
३) जाणीव जागृती आणि आरोग्य शिक्षण यातून स्वच्छतेच्या सुविधांची मागणी निर्माण करणे
४) देशाच्या ग्रामीण भागातील शाळा आणि अंगणवाडयातून स्वच्छतेच्या सुविधा निर्माण करणे. तसेच विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक शिक्षण देणे व स्वच्छतेच्या सवयी लावणे.
५) स्वच्छतेच्या कमी खर्चाच्या सुविधा निर्माण करणे आणि योग्य प्रोत्साहन देणे.
६) पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे व अन्नपदार्थांचे होणारे प्रदुषण कमी करण्यासाठी उघडयावर मलमूत्र विसर्जन करण्याच्या पध्दतीचे निर्मुलन करणे.
अभियानाची भूमिका -
१) हे अभियान लोकाभिमूख व लोकसहभागावर आधारीत करणेशालेय स्वच्छता व आरोग्य शिक्षण - हेतू
१) शाळेतील वातावरण स्वच्छ व आरोग्यदायी होण्यास आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणे.हागणदारी मुक्त गावांची संकल्पना -
१) आपले उद्यीष्ट संडास बांधणे नाही तर उघड यावर संडासाला जाण्याची सवय नष्ट करणे आहे. प्रश्न उघडयावरील विष्ठेचा आहे.निर्मलग्राम पुरस्कार -
या अभियानाची अंमलबजावणी अधिक कार्यक्षम होण्यासाठी निर्मल ग्राम पुरस्कार ही योजना केंद्र शासनाने सुरु केली आहे . राष्ट्रपतींच् या हस्ते ग्रामपातळीवर देण्यात येणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे. निर्मलग्राम पुरस्कारासाठी पुढील बाबींचा अंतर्भाव आहे.
पुरस्कारासाठी पात्रता -
१) प्रत्येक कुटुंबांकडे शौचालयाची व्यवस्था असून त्याचा नित्य वापर असणे.निर्मलग्रामसाठीचे बक्षीस -
प्रोत्साहनपर निधीचे रक्कम लोकसंख्येवर आधारीत आहे. त्याचे निकष पुढीलप्रमाणे.
१) १००० पर्यत लोकसंख्या असल्यास ५० हजार रुपयेनिर्मलग्राम पुरस्काराच्या रकमेचा उपयोग -
१) बाजारपेठा, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधता येतील
संपूर्ण स्वच्छता अभियानापूर्वीची परिस्थिती -
नाशिक जिल्हयात सप्टेंबर २००५ पासून संपूर्ण स्वच्छता अभियानास प्रारंभ झाला. तत्पूर्वी जिल्हयाची परिस्थिती स्वच्छतेच्या बाबतीत समाधानकारक नव्हती.केवळ मोठ मोठी शहर व गावात सेप्टिक पध्दतीची वैयक्तिक शौचालय उपलब्ध होती. अभियानापूर्वी जिल्हयात ८७,२४७ कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय होती. स्वच्छतेविषयी जनजागृती नसल्याने खेडयांची व गावांची अवस्था अत्यंत गलिच्छ आणि अस्वच्छ अशी होती. अनेक गावांच्या प्रवेशालाच परंपरागत हगणदारीची पध्दत सुरु होती.
सकाळी किवा सायंकाळी गावात प्रवेश करणे म्हणजे दिव्याचेच काम होते. गावातील अस्वच्छता, उघडयावरची हगणदारी, गलिच्छपणा याचा गावकर्यांच्या आरोग्यावर परिणाम होत होता. दरवर्षी अनेक गावांमध्ये गॅस्ट्रो, डायरिया, मलेरियाची साथ तर ठरलेलीच असायची. उघडयावर शौचविधी करावा लागत असल्याने महिलांची तर मोठया प्रमाणात कुचंबणा होत होती.
तसेच उघडयावर शौचाला गेल्यावर सर्पदंश, विचू दंश आणि अपघाताच्या घटनाही घडत होत्या. हागणदारी व गावातील अस्वच्छतेमुळे गावातील पाण्याचे स्त्रोत दुषित झाल्याने गावकर्यांना विविध रोगांना बळी पडावे लागत होते.
केंद्र शासनामार्फत १९८४ साली ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम तर युती शासनाच्या काळातही शौचालय बांधण्यासाठी अनुदान देण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला.
पण स्वच्छतेविषयी जनजागृती न करता केवळा पुरवठा आधारीत कार्यक्रम राबविल्याने या कार्यक्रमांना फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे गावागावातील उघडयावरील हगणदारी, गलिच्छपणा, अस्वच्छता यात बदल झाला नाही.
अभियान अंमलबजावणीचे नियोजन व अंमलबजावणी -
राज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरु झाल्यावर मोठया प्रमाणात स्वच्छतेबाबत वातावरण निर्माण झाले. या अभियानातून प्रेरणा घेत केंद्र शासनाने २००३ पासून देशात संपूर्ण स्वच्छता अभियान सुरु केले. नाशिक जिल्हयात २००४ पासून या अभियानास प्रारंभ झाला.जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदेमार्फत या अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या अधिपत्याखाली उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं), विविध विषयातील तज्ञ, गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी व ग्रामसेवक अशा प्रकारची यंत्रणा तयार करुन या अभियानाच्या अंमलबजावणीचे नियोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचाही सहभाग घेण्यात आला.
गावागावात वैयक्तिक स्वच्छता, शोषखडयांचे शौचालय, परिसर स्वच्छता, शालेय व अंगणवाडी स्वच्छतागृह, स्वच्छतादूत उपक्रम याविषयी जनजागृती करण्यात आली. रात्रीच्या ग्रामसभा, महिलांच्या ग्रामसभा घेण्यात आल्या. मुंबई पोलिस अधिनियमाबाबत जनजागृती करण्यात आली. उघडयावर शौचास बसणार्या व्यक्तींचे छायाचित्रण करण्याचा उपक्रमही राबविण्यात आला.
गवंडी प्रशिक्षण, स्वच्छतादूत प्रशिक्षण, जिल्हा व तालुकास्तरावर विविध साधन व्यक्तींच्या कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. लोकसहभाग मिळविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय, महिला मंडळ, भजनी मंडळ, युवा मंडळ यांचा सहभाग घेवून गाव पातळीवर अभियानाबाबत मोठया प्रमाणात जनजागृती व वातावरण निर्मिती करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या प्रभातफेर्या, स्वच्छतादूत उपक्रम राबवून जनजागृती करण्यात आली. आजही जिल्हयात वरीलप्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
अभियानांतर्गत प्रगती व जिल्हयाची वेगळी ओळख -
सप्टेंबर २००५-०६ पासून जिल्हयात संपूर्ण स्वच्छता अभियानास प्रारंभ झाल्यानंतर जिल्हयातील अनेक गावांनी यास उत्तम प्रतिसाद दिला. दुस-या बाजुने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानही जोमाने सुरु असल्याने हळुहळु जिल्हयाची स्वच्छतेची व्याप्ती वाढू लागली. आदिवासी तालुक्यातही मोठया प्रमाणात स्वच्छतेची व्याप्ती वाढू लागली.संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत २०७२ शाळा व २०७२ अंगणवाडयांना स्वच्छतागृहांची सोय उपलब्ध करुन देण्यात आली. ग्रामीण स्वच्छता साहित्य विक्री केंद्रासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन दिल्याने शौचालयाची भांडी सहज उपलब्ध होवू लागली. स्वच्छ, सुंदर व हगणदारीमुक्त गावास निर्मलग्राम पुरस्कार मिळणार असल्याने अनेक गावांनी त्यासाठी तयारी सुरु केली.
जिल्हयात २००५-०६ मध्ये १३, २००६-०७ मध्ये ४१ तर २००७-०८ मध्ये तब्बल १२६ गावांनी निर्मलग्राम पुरस्कार मिळवून आदर्श निर्माण केला. सन २०१३- १४ मध्ये जिल्हयातील २१ पैकी १२ ग्रापंनी पुरस्कार मिळविला आहे. आतापर्यत जिल्हयातील २२७ गावांना निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे.
स्वच्छता अभियान व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत बागलाण तालुक्यातील किकवारी व चाफयाचा पाडा या गावांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे. दोन्ही अभियानांतर्गत पुरस्कार मिळवून आजही या गावांनी सातत्य टिकवून ठेवले आहे.
चाफयाचा पाडा या चिमुकल्या गावाने तर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्य स्तरावरील तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवून जिल्हयाचा नावलौकीक वाढविला आहे.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या तसेच निर्मलग्राम पुरस्काराने सन्मानित झालेल्या बागलाण तालुक्यातील वटार या गावाने तर हगणदारीमुक्त गावातच मुलगी देवू व हगणदारीमुक्त गावातीलच मुलगी सुन म्हणून करु असा संकल्प करुन त्यांची यशस्वीपणे अंमलबजावणी केलेली आहे.
दिडोर तालुक्यातील लोखंडेवाडी ग्रापंच्या ग्रामसेवकाने हागणदारीमुक्त गाव होईपर्यत संकल्प करुन तब्बल दिड वर्ष अनवाणी राहून लोकांमध्ये मतपरिवर्तन घडवून आणले आहे.
या गावालाही निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे. निफाड तालुक्यातील थेरगाव, गोंडेगाव या गावांनी आजही आपला निर्मलग्रामचा दर्जा टिकवून ठेवला आहे.
याच तालुक्यातील करंजगाव ग्रापंने संत गाडगेबाबा अभियानात जिल्हयात प्रथम येवून गावाचा कायापालट केला आहे. निर्मलग्राम पुरस्कार मिळविण्याचा संकल्प या गावाने केलेला आहे.
निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती - २२७
सन २०१२ च्या पायाभूत सर्वेक्षणनान्नुसार जिल्हयातील स्वच्छतेची माहिती
शौचालय असलेले कुटुंब | २३८४४८ |
शौचालय नसलेले कुटुंब | ३५६७४६ |
एकुण कुटुंब | ५९५१९४ |
सन २०१२ पासून आतापर्यत झालेले बांधकाम (मे २०१५)
दारिद्रयरेषेवरील कुटुंब | २९९५१ |
दारिद्रयरेषेखालील कुटुंब | २३६७८ |
एकुण कुटुंब | ५३६२९ |
शिल्लक बांधकाम (उद्दीष्ट)
शौचालय असलेले कुटुंब | २९२०७७ |
शौचालय नसलेले कुटुंब | ३०३११७ |
एकुण कुटुंब | ५९५१९४ |
शीर्षक | देवाण दिनांक | आकार (KB) | डाउनलोड |
---|---|---|---|
- | - | - | - |
शीर्षक | देवाण दिनांक | आकार (KB) | डाउनलोड |
---|---|---|---|
- | - | - | - |
शीर्षक | देवाण दिनांक | आकार (KB) | डाउनलोड |
---|---|---|---|
- | - | - | - |
शीर्षक | देवाण दिनांक | आकार (KB) | डाउनलोड |
---|---|---|---|
- | - | - | - |
शीर्षक | देवाण दिनांक | आकार (KB) | डाउनलोड |
---|---|---|---|
- | - | - | - |