पंचायत क्षेत्र विस्तार कायदा १९९६
महाराष्ट्र ग्रामपंचायत उपबंध नियम ४ मार्च २०१४
नाशिक जिल्यातील पेसा क्षेत्रातील तालुके यादी
अ.क्रं | योजनेचे नाव | योजनेचे स्वरुप /माहिती | योजनेत सहभागाच्या अटी/शर्ती/पात्रता |
---|---|---|---|
१ | यात्रास्थळ विकास कार्यक्रम | यात्रास्थळ विकास कार्यक्रमा अंतर्गत नाशिक जिल्हयातील क वर्ग दर्जा असणा-या यात्रा स्थळांच्या ठिकाणी यात्रेच्या वेळी येणा-या भाविकासाठी सोई सुविधा उपलब्ध करुन देणे यात भक्त निवास बांधणे,वाहनतळ बांधणे, स्त्री/पुरष शौचालय बांधणे, पाणी पुरवठा सोय, दिवाबत्ती सोय, संरक्षकभित बांधणे या कामांचा समावेश आहे. |
१) विहीत प्रपत्रात माहिती २) प्रशासकिय मान्यता ३) तांत्रिक मान्यता ४) अंदाजपत्रक व आराखडे नकाशे ५) देखभाल दुरुस्ती/ग्रामपंचायत हमीपत्रक व ग्रामपंचायत ठराव ६) तीर्थक्षेत्र क वर्ग मान्यतेचा आदेश तीर्थक्षेत्राचा दर्जा ७) ज्या जागेवर बांधकाम करावयाचे आहे तेथील ७/१२ उतारा अथवा नमुना ८ जागेचा उतारा जागा ८) जागा संस्थेची/ खाजगी मालकीची असल्यास १०० रुपयाचा स्टॅम्प पेपरवर सदरहु जागा ग्रा.प./जि.प. ला हस्तातंरीत करण्यात बाबतचे संबधितांचे संमतीपत्रक ९) प्रस्तुत काम हे अन्य योजनेतुन प्रस्तावित किवा मंजुर नसल्या बाबत दाखला प्रमाणपत्र १०) प्रस्तावित जागेचा स्थळदर्शक नकाशा ११) गट विकास अधिकारी यांचे शिफारसशी सह प्रस्ताव ग्रा.प. विभाग जि.प. नाशिक कडे सादर करण्यात यावा. |
२ | ग्राम पंचायतींना जन सुविधा योजने अंतर्गत विशेष अनुदान | जन सुविधा योजने अंतर्गत (अ) ग्रामिण भागात दहन/ दफन भुमीची व्यवस्था करणे त्या सुस्थितीत ठेवणे व त्यांचे नियमन करणे यासाठी स्मशानभुमीवर हाती घ्यावयाची कामे दहन/दफन भुमी भुसंपादन,चबुत-यांचे बांधकाम,पोहोच रस्ता,गरजे नुसार कुंपन व भिती घालणे, विद्युतीकरण, आवश्यकते नुसार विद्युत दाहिनी, पाण्याची सोय, स्मृती उद्यान, स्मशान घाट जमिन सपाटीकरण व तळफरशी (ब) ग्रामपंचायत भवन/ कार्यालय बांधकामे. यात ज्या गावांमध्ये ग्रा.प.इमारत नाही अश्या ठिकाणी सदर योजने अंतर्गत नवीन इमारत बांधकाम प्राधान्यााने हाती घेण्यात यावे. या शिवाय जुन्या पडझड झालेल्या ग्रा.प. इमारतीची पुर्नरबांधणी अथवा विस्तार करणे, इमारती भोवती कुपंण घालणे, आवारामध्ये वृक्षारोपण करणे परिसर सुधारणा करणे |
१) या योजने अंतर्गत प्रत्येक कामास प्रशासकिय मान्यता ग्रामसभेच्या सहमती नंतर ग्रा.प. मार्फत घेण्यात यावी. २) तांत्रिक मान्यता सक्षम अधिका-या मार्फत घेण्यात यावी. ३) अंदाजपत्रक व आराखडे नकाशे ४) देखभाल दुरुस्ती/ग्रामपंचायत हमीपत्रक व ग्रामपंचायत ठराव ५) सदर योजने अंतर्गत कामांची निवड जिल्हा नियोजन समिती मार्फत करण्यात येईल. ६) ज्या जागेवर बांधकाम करावयाचे आहे तेथील ७/१२ उतारा अथवा नमुना ८ जागेचा उतारा जागा ७) प्रस्तुत काम हे अन्य योजनेतुन प्रस्तावित किवा मंजुर नसल्या बाबत दाखला प्रमाणपत्र ८) प्रस्तावित जागेचा स्थळदर्शक नकाशा ९) गट विकास अधिकारी यांचे शिफारसशी सह प्रस्ताव ग्रा.प. विभाग जि.प. नाशिक कडे सादर करण्यात यावा. |
३ | मोठया ग्राम पंचायतींना नागरी सुविधा साठी विशेष अनुदान पुरविणे | मोठया ग्रामपंचायतींना नागरी सुविधासाठी विशेष अनुदान या योजने अंतर्गत बाजारपेठ विकास, सार्वजनिक दिबाबत्तीची सोय,बागबगीचे, उद्याने तयार करणे, अभ्यासकेंद्र, गांवअंतर्गत रस्ते करणे व सांडपाणी व्यवस्थापनासाठी भुमीगत नाल्याचे बांधकाम करणे | १) पर्यावरण संतुलितसमृध्द ग्राम योजनेत २०११ च्या जनगणने नुसार ५००० वरील लोकसंख्येच्या पात्र ग्रामपचायतीचे आराखडे शासन मान्य संस्थे कडुन करुन घेणेत यावे. २) तांत्रिक मान्यता सक्षम अधिका-या मार्फत घेण्यात यावी. ३) अंदाजपत्रक व आराखडे नकाशे ४) देखभाल दुरुस्ती/ग्रामपंचायत हमीपत्रक व ग्रामपंचायत ठराव ५) जिल्हयातील ग्रा.प.चा प्राधान्य क्रम ठरविण्याचा अधिकार जिल्हा नियोजन मंडळाकडे असेल ज्या ग्रा.प.ची लोकसंख्या ५००० च्या वर आहेत व ज्या ग्रामपंचायती पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनेत सहभागी होवुन त्या योजनेच्या निकषाची पुर्तता केली असेल त्यामधुनच जिल्हा नियोजन मंडळ प्राधान्यक्रम ठरविल. ६) ज्या जागेवर बांधकाम करावयाचे आहे तेथील ७/१२ उतारा अथवा नमुना ८ जागेचा उतारा जागा ७) प्रस्तुत काम हे अन्य योजनेतुन प्रस्तावित किवा मंजुर नसल्या बाबत दाखला प्रमाणपत्र ८) प्रस्तावित जागेचा स्थळदर्शक नकाशा ९) गट विकास अधिकारी यांचे शिफारसशी सह प्रस्ताव ग्रा.प. विभाग जि.प. नाशिक कडे सादर करण्यात यावा. |
४ | मा.लोक प्रतिनिधीनी सुचविलेल्या ग्रामिण भागातील गावांतर्गत रस्ते गटारे व अन्य मुलभुत सुविधा पुरविणे मुलभुत सुविधा | योजने अंतर्गत गावांतर्गत रस्ते, गटारे, पाऊसपाणी निचरा,दहनभुमी व दफनभुमीची सुधारणा करणे, संरक्षकभित ,ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे, आठवडे बाजारासाठी सुविधा, गावांमध्ये कचरा डेपोसाठी व प्राथमिक प्रक्रियेसाठी सुविधा, सार्वजनिक जागेत वृक्ष लागवड व त्यांचे संरक्षण | १) तांत्रिक मान्यता सक्षम अधिका-या मार्फत घेण्यात यावी. २) अंदाजपत्रक व आराखडे नकाशे ३) देखभाल दुरुस्ती/ग्रामपंचायत हमीपत्रक व ग्रामपंचायत ठराव ४) ज्या जागेवर बांधकाम करावयाचे आहे तेथील ७/१२ उतारा अथवा नमुना ८ जागेचा उतारा जागा ५) प्रस्तुत काम हे अन्य योजनेतुन प्रस्तावित किवा मंजुर नसल्या बाबत दाखला प्रमाणपत्र सदर योजने अंतर्गत काम सुचविणे बाबत लोक प्रतिनिधी यांचे शिफारस पत्र ७) प्रस्तावित जागेचा स्थळदर्शक नकाशा ८) सदर प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत. |
५ | राजीव गांधी पंचायत सक्षमीकरण अभियान (RGPSA) अंतर्गत ग्रा.प. कार्यालय बांधणे | राजीव गांधी पंचायत सक्षमीकरण अभियान योजने अंतर्गत ज्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय नाही अश्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधणे सदर योजनेसाठी केंद्र हिस्सा ७५ % व राज्य हिस्सा २५ % या प्रमाणे रु.१२.०० लक्ष पर्यंत अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते. |
१) तांत्रिक मान्यता सक्षम अधिका-या मार्फत घेण्यात यावी. २) अंदाजपत्रक व आराखडे नकाशे ३) देखभाल दुरुस्ती/ग्रामपंचायत हमीपत्रक व ग्रामपंचायत ठराव ४) ज्या जागेवर बांधकाम करावयाचे आहे तेथील ७/१२ उतारा अथवा नमुना ८ जागेचा उतारा जागा ५) प्रस्तुत काम हे अन्य योजनेतुन प्रस्तावित किवा मंजुर नसल्या बाबत दाखला प्रमाणपत्र ६) प्रस्तावित जागेचा स्थळदर्शक नकाशा ७) गट विकास अधिकारी यांचे शिफारसशी सह प्रस्ताव ग्रा.प. विभाग जि.प. नाशिक कडे सादर करण्यात यावा. |
पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना
१) महाराष्ट्र शासन,ग्रामविकास व जलसंधारण विभाग,शासन निर्णय क्र.व्हीपीएम/२६१०/ प्र.क्र.१ /पंरा-४ मंत्रालय दि.१८ ऑगस्ट २०१०
२) महाराष्ट्र शासन,ग्रामविकास व जलसंधारण विभाग,शासन निर्णय क्र.व्हीपीएम/२६१४/प्र.क्र.३४ /पंरा-४ मंत्रालय दि.१३ जुन, २०१४
योजनेचा उददेश :- लोकसहभागातून चांगल्या प्रकारच्या शासन सहकार्याने उच्च प्रतीच्या मुलभूत सुविधांचा हा कार्यक्रम आहे. पर्यावरणाचे संवर्धन,जतन व संरक्षण करणे ,राज्य शासनाच्या विविध योजनांची सांगड घालून समन्वय करणे , ग्रामीण भागात शहरी भागाप्रमाणे सुविधा निर्माण करणे इ. हा या योजनेचा उद्येश आहे.
ही एक अत्यंत महत्तवाची योजना असुन सर्वांनी यात सहभागी होणे गरजेचे आहे.
पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनेअंतर्गत निवडीचे महत्वाचे निकष
अ.क्र | निकष | प्रथम वर्ष | व्दितीय वर्ष | तृतीय वर्ष |
---|---|---|---|---|
१ | वृक्षारोपण | लोकसंख्येच्या किमान ५०% झाडे लावून जगविण्याची हमी | उर्वरित ५०% वृक्ष लागवड करुन लोकसंख्येच्या ७५ % झाडे जगविणे आवश्यक | लोकसंख्ये इतकी (१००%) झाडे जगविणे आवश्यक |
२ | निर्मल ग्राम | किमान ६० % हगणदारी मुक्त | ७५ % हगणदारी मुक्त | १०० % हगणदारी मुक्त |
३ | करवसुली | थकबाकीसह ६० % | थकबाकीसह ८० % | थकबाकीसह ९० % |
४ | प्रदुषण | ५० मॉयक्रान पेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यावर बंदी,उत्सवातील मूर्तीच्या विसर्जनासाठी प्रदुषण मुक्त उपाय योजना | ५० मॉयक्रान पेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्याचे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन विल्हेवाट लावणे | ५० मॉयक्रान पेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणेस जनतेस परावृत्त करणे व अशा पिशव्याचे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन विल्हेवाट लावणे |
५ | संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान | प्रभावी अंमलबजावणीची हमी | जिल्हा परिषद मतदार संघ स्तरीय किवा त्यावरील तपासणीत किमान ५० % गुण | जिल्हा परिषद मतदार संघ स्तरीय किवा त्यावरील तपासणीत किमान ६० % गुण |
६ | यशवंत पंचायतराज अभियान | प्रभावी अंमलबजावणीची हमी | जिल्हा परिषद मतदार संघ स्तरीय किवा त्यावरील तपासणीत किमान ५० % गुण | जिल्हा परिषद मतदार संघ स्तरीय किवा त्यावरील तपासणीत किमान ६० % गुण |
७ | अपारंपारिक उर्जा | --- | किमान ५० % स्ट्रीट लाईट (सौरउर्जा/सीएफएल/एलईडी,) किमान १ % कुटुंबाकडे बॉयोगॅस | किमान १०० % स्ट्रीट लाईट (सौरउर्जा/सीएफएल/एलईडी,) किमान २५ % कुटुंबाकडे बॉयोगॅस, १० % कुटुंबाकडे सौरउर्जा/सीएफएल/एलईडी चा प्रत्यक्ष वापर |
८ | घनकचरा व्यवस्थापन | --- | १०० % कचरा संकलन किमान ५० % कच-यापासून खत निर्मिती किवा लँडफिल पध्दतीने विल्हेवाट | घन कच-याचे १०० % शास्त्रशुध्द संकलन व व्यवस्थापन आणि सांडपाण्याचे १०० % व्यवस्थापन |
९ | सांडपाणी व्यवस्थापन | --- | ५० % व्यवस्था | ७५ % व्यवस्था |
१० | ई पंचायत | --- | केंद्र शासनाच्या ई पंचायत, संग्राम,आवास सॉफट व मॉडेल अकौन्टीग सिस्टीमसह सर्व संगणकीय अज्ञावलीमध्ये माहिती संकलीत करणे | केंद्र शासनाच्या ई पंचायत, संग्राम,आवास सॉफट व मॉडेल अकौन्टीग सिस्टीमसह सर्व संगणकीय अज्ञावलीमध्ये माहिती संकलीत करणे तसेच ग्रा.प. कडुन वितरीत करण्यात येणारे १ ते १९ प्रकारचे दाखले ग्राम सुविधा केंद्रा मार्फत वितरीत करणे |
११ | विकास कामे | --- | --- | मागील वर्षात मंजुर केलेली सर्व विकास कामे (इंदिरा आवास घरकुलासह पुर्ण करणे) |
निकषानुसार काम करणा-या ग्रामपंचायतींना सुरुवातीस ३ वर्षात कामगिरीच्या सातत्यानुसार खालीलप्रमाणे निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.
अ.क्र | लोकसंख्या | एकूण रक्कम | प्रथम वर्ष | व्दितीय वर्ष | तृतीय वर्ष |
---|---|---|---|---|---|
१ | १०००० पेक्षा जास्त | रु. ३० लाख | रु. १० लाख | रु. १० लाख | रु. १० लाख |
२ | ७००१ ते १०००० | रु. २४ लाख | रु. ८ लाख | रु. ८ लाख | रु. ८ लाख |
३ | ५००१ ते ७००० | रु. १५ लाख | रु. ५ लाख | रु. ५ लाख | रु. ५ लाख |
४ | २००१ ते ५००० | रु. १२ लाख | रु. ४ लाख | रु. ४ लाख | रु. ४ लाख |
५ | १००१ ते २००० | रु. ९ लाख | रु. ३ लाख | रु. ३ लाख | रु. ३ लाख |
६ | १००० पर्यंत | रु. ६ लाख | रु. २ लाख | रु. २ लाख | रु. २ लाख |
टिप :- १०००० पेक्षा जास्त लोकसंख्येच्या तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी असणा-या भाग घेणा-या ग्रामपंचायतींना -प्रत्येकी रु.३६ लाख (दर वर्षी १२ लाख )
ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद, नाशिक अधिकारी/ कर्मचारी आकृतीबंध
|