मांगी तुगी मंदीर
मांगी तुगी मंदीर नाशिक पासुन 125 कि.मि. अंतरावर सटाणा तालुक्यात आहे.समुद्रसपाटीपासुन 4343 फुट उंचीवर मांगी शिखर तर समुद्र सपाटीपासून 4366 उंचीवर तुंगी शिखर आहे. मांगी तुंगी हे प्रसिध्द धार्मिक स्थळ आहे. मांगी तुंगीच्या पायथ्याशी ‘’भिलवाडी’’ हे गांव आहे. येथे साधना केल्याणे मोक्ष प्राप्ती मिळते असे मानले जाते.
मांगी
मांगी शिखराची उंची जास्त नसली तरी येथे सराईत गिर्यारोहकच चढु शकतात. शिखराच्या पायथ्याशी भगवान महावीर, अदिनाथ, पार्श्वनाथ, हनुमान, वाली, सुग्रीव इ. यांच्या 356 कोरीव मुर्ती आहेत. गुफांमध्ये देखील काही कोरीव काम आढळते. या ठिकाणी “ मांगीगिरी मंदीर ‘’ आहे.
तुंगी
तुंगी शिखर मांगी शिखरापेक्षा उंच आहे. या शिखराला देखील तुंगी शिखरासारखीच प्रदक्षिणा करता येते. प्रदक्षिणा मार्गावर तीन गुंफा आहे. त्या पैकी एका गुंफेत “ तुंगीगिरी मंदीर ‘’ असून. भगवान बुध्दांच्या 99 कोरीव मुर्ती येथे आहेत.
संपर्क तपशील
पत्ता: नाशिक, महाराष्ट्र

कसे पोहोचाल?
विमानाने
सर्वात जवळचे विमानतळ ओझर नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ शहराच्या मध्यभागीपासून सुमारे 24 किलोमीटर अंतरावर आहे.
रेल्वेने
जवळचे रेल्वे स्थानक नाशिकरोड 130 किमी आहे
रस्त्याने
नाशिक सेंट्रल बस स्थानकापासून 125 कि.मी. आहे