बंद

    सामान्य प्रशासन विभाग

    • सर्वसाधारण माहिती

    सामान्य प्रशासन विभाग हा जिल्हा परिषदेच्या प्रशासनातील महत्त्वाचा विभाग आहे. जिल्हा परिषदेतील सर्व विभागांना आस्थापनात्मक मुद्दे, प्रकरणे इ.वर मार्गदर्शन सामान्य प्रशासन विभागामार्फत दिले जाते व सर्व विभागांवर प्रशासकीय नियंत्रण ठेवले जाते. उप मुख्य कार्यकारी अधिकारी हे या विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कामकाज पाहतात.

    या विभागाचे कामकाज पूढील प्रमाणे-

    • एकूण पंचायत समित्या – १५

    • नाशिक, बागलाण, चांदवड, देवळा, दिडोरी, ईगतपूरी, कळवण, मालेगाव, नांदगाव, निफाड, पेठ, सिन्नर, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर व येवला.

    • एकूण ग्रामपंचायती संख्या – १३८२

    आस्थापनात्मक

    • महाराष्ट्र विकास सेवा वर्ग-१ व वर्ग २ अधिकारी यांची आस्थापना. तसेच म.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेशाने खातेप्रमुखांची आपना सामान्य प्रशासन विभागाकडे आहे.
    • कक्ष अधिकारी/कार्यालयीन अधिक्षक/वि.अ.सां. सहा.सांख्यिकी यांची आस्थापना. तसेच कार्यालयीन आस्थापना/स्पर्धा परिक्षा घेणे/सेवा प्रवेशोत्तर परिक्षा घेणे.
    • लघुलेखक/ वरिष्ठ सहायक/कनिष्ठ सहायक यांची आस्थापना/अनुशेषाची माहिती.
    • वर्ग-४ कर्मचारी-परिचर कर्मचार्यांयची आस्थापना व वाहन चालक यांची आस्थापना.
    • अनुकंपा प्रकरणे.
    • पदोन्नती –

      जिल्हा परिषदेकडे कार्यरत असणार्या/ कनिष्ठ कर्मचार्यांना शासनाच्या तरतूदींनुसार वरिष्ठ पदावर पदोन्नती पद असेल तेथे पदोन्नती देणे.

    • खातेनिहाय चौकशी –

      (कर्मचारी कार्यरत असतांना त्यांचेकडे सुपूर्द केलेल्या कामामध्ये अनियमीतता, गैरव्यवहार वा अपहार यासारख्या गंभीर स्वरूपाच्या घटना गुन्हे घडतात अशावेळी त्याची पुनरावृत्ती होवू नये व प्रतिबंध बसावा आणि त्यातील सत्य-असत्यता पडताळून जबाबदारी निश्चित करणे व दोषी आढळलेल्या कर्मचार्यां ना गुन्ह्याच्या गांभिर्यानुसार शासनाच्या तरतूदींनूसार शिक्षा निश्चित करणे).

    • नियतकालिक बदल्या –

      शासनाच्या सुचनांप्रमाणे नियतकालिक बदल्या वर्षातून एकदाच सर्वसाधारणपणे माहे एप्रिल ते मे मध्ये केल्या जातात. बदलीपात्र कर्मचार्यांच्या १०टक्के इतक्या बदल्या करता येतात. त्यानुसार सेवाज्येष्ठता यादीप्रमाणे कर्मचार्यांच्या बदल्यांचे कामकाज पाहणे व इतर विभागांना बदल्यांबाबत मार्गदर्शन करणे

    • पदभरती –

    • वर्ग-३ व वर्ग-४ संवर्गातील पदे भरतांना शासनाने विहित केलेल्या तरतूदींनुसार कार्यवाही करणे व जिल्हा परिषदेच्या इतर विभागांना मार्गदर्शन करणे.

    नोंदणी शाखा

    जिल्हा परिषदेकडे म्हणजेच मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नावे येणारे सर्व शासन संदर्भ, विभागीय आयुक्तांकडील संदर्भ, अन्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांकडील संदर्भ, मा.लोक आयुक्त, प्रतिनिधी, मंत्री, खासदार, आमदार इ., पंचायत समित्या, ग्रामपंचायती व सर्वसामान्य नागरीक यांचेकडून प्राप्त होणारे सर्व पत्रव्यवहार या शाखेकडे स्वीकारून एकत्र केले जातात.
    ते संदर्भ उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांचेमार्फत अति. मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे अवलोकनार्थ सादर केले जातात व अवलोकन होऊन आलेनंतर परत नोंदणी शाखेकडे आल्यानंतर त्याचे वर्गीकरण करून, संदर्भांची नोंद करून संबंधीत खातेप्रमुखांकडे कार्यवाहीसाठी पाठविले जातात. या व्यतिरीक्त मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी-सा.प्र. यांचेकडे इतर विभागातून व पंचायत समित्यांकडून येणार्या सर्व नस्त्यांची नोंद नोंदणी शाखेत ठेवली जाते.

    • सभांचे कामकाज

    • सर्वसाधारण सभा

    • जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा दर तीन महिन्यातून एकदा घेणेची तरतूद आहे. तथापि, मा.ना.अध्यक्ष, जिल्हा परिषद यांचे सूचने प्रमाणे कितीहीवेळा ही सभा घेता येऊ शकते. या सभेच्या कामकाजात सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समित्यांचे सभापती सहभाग घेतात. सामान्य प्रशासन विभागाच्या परिषद संकलनामार्फत या सभेचे आयोजन करण्यात येते. सर्वसाधारण सभेसाठी विषय पत्रिका नोटीस सभेपूर्वी १७ दिवस व विशेष सभेची नोटीस १२ दिवस अगोदर पाठविली जाते. सभेचे इतिवृत्त घेवून मा.ना.अध्यक्ष, जि.प. यांचे मान्यतेने अंतिम करून सर्व सन्माननीय सदस्य व सर्व कार्यालय प्रमुख जिल्हा परिषद यांना पाठविले जाते.

    • स्थायी समिती सभा

    • स्थायी समिती सभा दरमहा घेणेची तरतूद आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या परिषद संकलनामार्फत या सभेचे आयोजन करण्यात येते. सभेचे इतिवृत्त घेवून मा.ना.अध्यक्ष, जि.प. यांचे मान्यतेने अंतिम करून सर्व सन्माननीय स्थायी समिती सदस्य व सर्व कार्यालय प्रमुख जिल्हा परिषद यांना पाठविले जाते.

    • समन्वय सभा

    • मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली नाशिक जिल्हा परिषदेकडील सर्व खातेप्रमुख, गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तालुका वैद्य अधिकारी, उप अभियंता यांची दरमहा समन्वय सभा आयोजित केली जाते. या सभेत जिल्हा परिषदेमार्फत राबविणेत असलेल्या विविध योजना व विकास कामे, प्रलंबित प्रकरणे इत्यादींचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले जाते. सामान्य प्रशासन विभागाच्या नियोजन संकलनामार्फत या सभेचे आयोजन करण्यात येते.

    • माहितीचा अधिकार कायदा २००५ अंमलबजावणी

    • शासकीय कारभारात प्रशासन यंत्रणेत पादर्शकता असणे आवश्यक आहे. माहितीचा अधिकार याचा अर्थ कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडे असलेली किवा त्यांच्या नियंत्रणात असलेली व या अधिनियमान्वये मिळवता येण्याजोगी माहिती मिळविण्याचा अधिकार असा आहे.
      त्यामध्ये- एखादे काम दस्तऐवज, अभिलेख यांची माहिती करणे, दस्तऐवजाच्या किवा अभिलेखांच्या टिपण्या, उतारे किवा प्रमाणीत प्रती घेणे, सामग्रीचे प्रमाणीत नमुने घेणे, इलेक्ट्राॅनिक प्रकारातील माहिती मिळविणे इ. उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) हे शासकीय माहिती अधिकारी म्हणून कामकाज पाहतात. तर अपिलीय अधिकारी म्हणून अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे कामकाज पाहतात. सामान्य प्रशासन विभागातील माहितीसेल या संकलनामार्फत हे कामकाज पाहिले जाते.

    • भविष्य निर्वाह निधी व वैद्यकीय बीले

    • जिल्हा परिषद नाशिक अधिनस्त आस्था२-अर्थ या संकलनाकडून जिल्ह्यातील सर्व विभाग व तालुका स्तरावरून या विभागाकडे भविष्य निर्वाह निधी व वैद्यकीय बीले इ.प्रकरणे प्राप्त झालेनंतर या प्रस्तावांची छाननी झालेनंतर मंजूरी दिली जाते.

    • खातेप्रमुख व पंचायत समिती कार्यालयांची तपासणी

    • मा.विभागीय आयुक्त, नाशिक विभाग नाशिक यांचेमार्फत जिल्हा परिषदेची वार्षिक तपासणी करणेत येते. तसेच पंचायत समित्यांची तपासणी सामान्य प्रशासन विभागातील तपासणी संकलनामार्फत केली जाते. यात आस्थापना विषयक बाबींचे कामकाज विहित कालावधीत किवा नमुन्यात होत आहे किवा नाही हे पाहून त्यांना कामकाजामध्ये असणार्याा त्रुटींची पूर्तता करून घेतली जाते. सदर त्रुटींबाबतचे मार्गदर्शन म.मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) हे करतात.

    • नावीन्यपूर्ण उपक्रम

    • आयएसओ ९००१:२०००
    • नाशिक जिल्हा परिषदेस आयएसओ ९००१:२००० हे मानांकन प्राप्त असून दैनंदिन कामकाजात सातत्याने सुधारणा होण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जातात.

    • भरारी पथके

    • शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत असतात. या योजना प्रभावीपणे व परिणामकारकरीत्या राबविल्या गेल्या आहेत वा नाही तसेच येणार्याज अडीअडचणी सोडविण्याकरीता जि.प. नाशिक अंतर्गत तालुका स्तरावरील पंचायत समिती कार्यालये, शैक्षणिक संस्था, ग्रामपंचायती, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपविभाग इ. ठिकाणी अचानक भेटी दिल्या जातात व पाहणी केली जाते.

    • शासन आपल्या दारी

    • या उपक्रमाअंतर्गत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) यांचेसह जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुख महिन्यातून एकदा जिल्ह्यातील कोणत्याही एका तालुक्यात मुक्कामी दौर्याकचे आयोजन केले जाते व प्रत्येक खातेप्रमुखास एका गावाची जबाबदारी दिली जाते. त्याअनुषंगाने ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जातो.

    • बायोमेट्रीक प्रणाली

    • कर्मचार्यांनी कार्यालयीन वेळेत कामावर हजर राहण्यासाठी एप्रिल २०११ पासून जिल्हा परिषद नाशिक येथे बायोमेट्रीक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. कर्मचार्यांयना त्यांच्या उजव्या/डाव्या हाताची तर्जनीद्वारे दैनंदिन हजेरी नोंदवून घ्यावी लागते. कर्मचार्यातच्या येण्या व जाण्याच्या वेळेची नोंद या प्रणालीद्वारे होते.

    • सीसीटीव्ही कॅमेरे

    • जिल्हा परिषदेतील शिक्षण व आरोग्य हे विभाग मोठे व महत्त्वाचे असल्याने येथील कामकाजावर नियंत्रण असणे आवश्यक असल्याने शिक्षण व आरोग्य विभागात सध्या सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली अंमलात आणली आहे. या कॅमेरांचे थेट प्रक्षेपण मा.मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) यांच्या दालनातील संगणकावर होते.